पाकिस्तानातील गुरुद्वारावर दगडफेक, काँग्रेसला अजून पुरावे हवेत का? भाजपचा सवाल

पाकिस्तानात ननकाना साहिब गुरुद्वाराबाहेर शुक्रवारी दगडफेक (stone pelting on nankana sahib gurdwara) केली गेली. या दगडफेकीवरुन भाजप आणि काँग्रेस यांच्यात ट्विटरवॉर सुरु झाला आहे.

पाकिस्तानातील गुरुद्वारावर दगडफेक, काँग्रेसला अजून पुरावे हवेत का? भाजपचा सवाल
Follow us
| Updated on: Jan 04, 2020 | 4:30 PM

नवी दिल्ली : पाकिस्तानच्या लाहोर येथील ननकाना साहिब गुरुद्वारावर काही लोकांनी दगडफेक (stone pelting on nankana sahib gurdwara) केली. ही घटना शुक्रवारी संध्याकाळी 7 वाजेच्या सुमारास घडली. दगडफेकीदरम्यान काही भक्त गुरुद्वारमध्ये अडकले होते. या घटनेनंतर परिसरात अजूनही तणावाचे वातावरण आहे. दरम्यान, या घटनेचे (stone pelting on nankana sahib gurdwara) तीव्र पडसाद भारतातील राजकारणावर पडताना दिसत आहे. या घटनेवरुन भाजप आणि काँग्रेस यांच्यात ट्विटरवॉर सुरु झाला आहे.

भाजपचे प्रवक्ता संबित पात्रा यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला. पाकिस्तानमध्ये शुक्रवारी ननकाना साहिब गुरुद्वाराबाहेर झालेल्या दगडफेकीसंदर्भात हा व्हिडिओ होता. ‘ननकाना साहिबमध्ये एकही शीख राहू देणार नाहीत’, अशाप्रकारची धमकी इस्लामच्या नावाने आपल्या शीख बांधवांना दिल्या जात आहे. पाकिस्तानात अल्पसंख्यांकांचा छळ होतोय. काँग्रेसला आणखी किती पुरावे हवे आहेत? असा सवाल संबिता पात्रा यांनी केला.

संबित पात्रा यांच्या या ट्विटवर छत्तीसगड काँग्रेसने प्रत्युत्तर दिले. ‘मित्रांनो दोन दिवसांपूर्वी भाजपचा एक प्रवक्ता काँग्रेसचा नेता म्हणत खोटा व्हिडिओ ट्विट करतो. त्यानंतर आज पाकिस्तानचे पंतप्रधान एक खोटा व्हिडिओ ट्विट करत भारतची बदनामी करण्याचा प्रयत्न करतात. तो व्हिडिओ खोटा असल्याचे समोर येताच ते तो व्हिडिओ डिलिटही करतात.’ भाजप आणि पाकिस्त्तानमध्ये ही नेमकी कोणत्या प्रकारची जुगलबंदी आहे? असा सवाल काँग्रेसने केला.

याशिवाय ‘कोणत्याही भाषेत अनुवाद करण्याची काहीच आवश्यकता नाही. ही संघी भाषा आहे. काही दिवसांपूर्वी याच भाषेत इंडिया गेटवर ‘गोली मारो’ असे नारे दिले गेले होते. दोघांकडून एकसारखेच खोटे व्हिडिओ ट्विट केले जात आहेत. दोन्ही एकच भाषा बोलत आहे’, असे देखील काँग्रेसने ट्विट केले.

काँग्रेसच्या या ट्विट नंतर संबित पात्रा यांनी ट्वीट केले. ‘काँग्रेसचा दृष्टपणा बघा. काँग्रेस म्हणत आहे की, ननकाना साहिब येथे शिखांविरोधात जे बोलले गेले त्याला ‘संघ’ जबाबदार आहे. हा व्हिडिओ खोटा आहे, असेही काँग्रेस म्हणत आहे. याचा अर्थ असा की, आई आणि मुलाच्या आदेशानुसार कोणत्याही किंमतीत पाकिस्तानला वाचवायचे आहे, या गोष्टीचा धिक्कार आहे’, असे संबित पात्रा म्हणाले.

काँग्रेसच्या ट्विटला प्रतिक्रिया देताना संबित पात्रा यांनी एक व्हिडिओ देखील ट्विट केला. या व्हिडिओसोबत ते म्हणाले, काँग्रेसचे नेते म्हणत आहे की, आम्ही अगोदर मुसलमान आहोत त्यानंतर आम्ही हिंदुस्तानी आहोत. इस्लामसाठी आम्ही संविधानाला देखील आम्ही मानणार नाही, आम्ही या देशाचे वफादार नाहीत. वफादार तर कुत्रे असतात. कुठे गेले दोन्ही भाऊ-बहिण? राहुल गांधी आणि प्रियंका गांधी तुमच्यासाठी एवढा पुरावा भरपूर आहे का की अजू काही पुरावे हवे आहेत? असा प्रश्न संबित पात्रा यांनी उपस्थित केला.

काय आहे ननकाना साहिब दगडफेक प्रकरण?

ननकाना साहिब गुरुद्वार हे पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील लाहोर येथे आहे. या गुरुद्वाराच्या जागेवर १४६९ साली शीख धर्माचे संस्थापक गुरुनानक देव यांचा जन्म झाला होता. गुरुवारी या गुरुद्वारात शीख बांधवांनी गुरु गोविंद सिंह जयंती साजरी केली होती. त्यानंतर शुक्रवारी गुरुद्वारवर दगडफेक करण्यात आली.

गुरुद्वारावर दगडफेक करणाऱ्यांचे नेतृत्व मोहम्मद हसनचे कुटुंब करत होते. हसनने एका शीख मुलीशी लग्न करुन तिचे धर्म परिवर्तन केले. ही मुलगी गुरुद्वाराच्या पंथींची कन्या आहे. या धर्मपरिवर्तनानंतर हसनला पोलिसांनी मारले. मात्र, हसनच्या कुटुंबियांचे म्हणणे आहे की, मुलीने आपल्या इच्छेनुसार धर्म परिवर्तन केले आहे. ती मुलगी कितीही दबाव टाकला तरी शीख धर्म स्विकारायला तयार नाही. हसन मारहाण झाल्यामुळे त्याच्या कुटुंबियांना राग आला आणि त्यांच्या नेतृत्वाखाली गुरुद्वारावर शुक्रवारी दगडफेक केली गेली.

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.