AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दुर्दैवी घटना| इंद्रायणी नदीत दोन लहान मुले बुडाली

मुलांच्या शोधासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिका व पी एम आर डी एचे अग्निशामन दल घटनास्थळी दाखल झाले असून शोधकार्य सुरू आहे. त्यांना मदतीसाठी  एनडीआरएफच्या जवानांना देखील बोलावण्यात आलेले आहे.

दुर्दैवी घटना| इंद्रायणी नदीत दोन लहान मुले बुडाली
प्रातिनिधिक छायाचित्र
| Edited By: प्राजक्ता ढेकळे | Updated on: Nov 26, 2021 | 3:06 PM
Share

देहूगाव – इंद्रायणी नदीत दोन लहान मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची दुदैवी घटना घडली आहे. साहील विजय गौड ( वय 10 वर्षे ) व अखिल विजय गौड ( वय 8 वर्षे, सध्या राहणार देहूगाव,मुळगाव, गोरखपूर) आहे. मृत मुले सकाळी इंद्रायणी नदीकाठी गेली होती. नदीतील पाण्याचा अंदाज न आल्याने ही मुले नदीच्या पाण्यात बुडाली आसावित असा प्राथमिक अंदाज आहे. या घटनेची माहिती मिळताच सुरुवातीला मुलांच्या वडिलांनी व इतर बांधकाम कामगारांनी पाण्यात शोधाशोध केली. मात्र त्यांचे मृतदेह हाती लागले नाहीत. या घटनेमुळे कुटुंबावर मोठी शोककळा पसरली आहे.

कार्तिकी एकादशी असल्याने पाटबंधारे विभागाच्या वतीने नदीला पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे नदीतील पाण्याची पातळी वाढली आहे. मृत मुलाचे वडील इंद्रायणी पुला नजिक असलेल्या बांधकाम साईटवर कामगार म्हणून काम करतात. मजुरीच्या कामासाठी उत्तरप्रदेशातील गोरखपूर येथून हे कुटुंब देहूमध्ये आले आहे.

मुलांच्या शोधासाठी पोलीस घटनास्थळी दाखल

घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रताप दळवी हे तातडीने घटनास्थळी दाखल झाले. मुलांच्या शोधासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिका व पी एम आर डी एचे अग्निशामन दल घटनास्थळी दाखल झाले असून शोधकार्य सुरू आहे. त्यांना मदतीसाठी  एनडीआरएफच्या जवानांना देखील बोलावण्यात आलेले आहे. हवेली तहसिलदार गीता गायकवाड व तलाठी अतुल गिते देखील घटनास्थळाकडे रवाना झाले आहेत.नदीमध्ये शोधकार्यास सुरुवात करण्यात आली आहे. मात्र दअद्याप मुलांचा शोध लागलेला नाही.

लवकरच मुंबईतील आठ मॉल्स रात्री कार पार्किंगला परवानगी देणार, मुंबईकरांची पार्किंगची समस्या कमी होणार

भाजप पदाधिकारी अमोल इघे हत्या प्रकरण, संशयित आरोपी महिन्याभरापूर्वीच भाजपातून राष्ट्रवादीत?

Jalna | जालना एपीएमसी कार्यालयावर ईडीचा छापा, 10 ते 12 ठिकाणी ईडीची छापेमारी

Follow Us
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय...
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
शिवसेनेच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट! हायकोर्टही पक्षाची नोंदणी रद्दचे...
शिवसेनेच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट! हायकोर्टही पक्षाची नोंदणी रद्दचे आदेश आयोगाला देऊ शकत नाही, मग...
अपात्र होणाऱ्या... एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढल्या? कपिल सिब्बल...
अपात्र होणाऱ्या... एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढल्या? कपिल सिब्बल यांनी नेमका युक्तिवाद काय लढवला?
मोठी बातमी! निकाल कोणाच्या बाजून झुकतोय? सिब्बल यांचा नेमक्या...
मोठी बातमी! निकाल कोणाच्या बाजूने झुकतोय? सिब्बल यांचा नेमक्या मुद्यावर युक्तिवाद, कोर्टाचं निदर्शन काय?
कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान
शिवसेना पक्षचिन्ह प्रकरण: कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान
पेगलवाडी रस्त्याची पाहणी. विद्यार्थ्यांशी साधला संवाद.
आदित्य ठाकरे यांच्याकडून त्र्यंबकेश्वरमधील पेगलवाडी रस्त्याची पाहणी. विद्यार्थ्यांशी साधला संवाद.
कोर्टातील निकालाच मोठा परिणाम हा... शिंदेंच्या गट नेत्याचं मोठं विधान
कोर्टातील निकालाच मोठा परिणाम हा... एकीकडे कोर्टात सुनावणी सुरू दुसरीकडे शिंदेंच्या गट नेत्याचं मोठं विधान
विरोधकांच्या गोंधळामुळे संसदेचं 61% कामकाज ठप्प
विनोद तावडे: विरोधकांच्या गोंधळामुळे संसदेचं 61% कामकाज ठप्प
कंगना राणावत यांची टीका: गृह मंत्रालयाबाबत दुहेरी भूमिका
राहुल गांधींच्या भूमिकेवर कंगना राणावत यांची टीका: गृह मंत्रालयाबाबत दुहेरी भूमिका
रायगडचा पालकमंत्री मीच, लवकरच निर्णय
भरत गोगावले यांची घोषणा: रायगडचा पालकमंत्री मीच, लवकरच निर्णय