AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

धरणातून सोडलेल्या पाण्यात सासू-सून वाहून गेल्या, जळगावातील वाघूर धरण क्षेत्रात थरार

वाघूर धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यात आज (30 जुलै) सकाळी सासू-सून वाहून (Two women carried away in Jalgaon) गेल्या.

धरणातून सोडलेल्या पाण्यात सासू-सून वाहून गेल्या, जळगावातील वाघूर धरण क्षेत्रात थरार
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Edited By: | Updated on: Jul 30, 2020 | 5:24 PM
Share

जळगाव : वाघूर धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यात आज (30 जुलै) सकाळी सासू-सून वाहून (Two women carried away in Jalgaon) गेल्या. ही धक्कादायक घटना जळगाव जिल्ह्यातील साकेगाव येथे घडली. वाहून गेलेल्या दोन्ही सासू-सूनेचा ग्रामस्थांकडून शोध घेतला जात आहे. सिंधुबाई अशोक भोळे (वय अंदाजे 65) आणि योगिता राजेंद्र भोळे (वय सुमारे 35) अशी वाहून गेलेल्या (Two women carried away in Jalgaon) सासू-सूनेची नावं आहेत.

वाघूर नदीच्या पात्रात सध्या तुलनेत कमी पाणी आहे. काही दिवसांपूर्वी नदी पात्र दुथडी भरून वाहत असले तरी सध्या पाऊस नसल्याने पात्रात कमी पाणी आहे. या पार्श्वभूमिवर साकेगाव येथील सिंधुबाई आणि योगिता या दोघी महिला आज सकाळी नदी पात्रात गेल्या होत्या.

त्या दोघी काही दिवसांपूर्वीच बांधण्यात आलेल्या नवीन पुलाच्यावरील बाजूस गेल्या होत्या. या दोघी दररोज या भागात जाऊन वाळू गाळण्याचे काम करत होत्या. यानुसार आजही दोघीजणी सकाळी वाळू गाळण्यासाठी गेल्या होत्या. यावेळी धरणातून पाणी सोडल्यामुळे अचानक नदीच्या पात्रातील पाण्याचा प्रवाह वाढू लागला. यामुळे त्या घाबरून उंच ठिकाणी असणार्‍या भागावर जाऊन मदतीसाठी धावा करू लागल्या. पण पाण्याचा प्रवाह मोठ्या प्रमाणात वाढल्याने त्या वाहून गेल्या.

यावेळी पुलावर असणार्‍या काही जणांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला असला तरी यात त्यांना यश आले नाही. अवघ्या काही मिनिटांमध्ये त्या पाण्याच्या जोरदार प्रवाहासोबत वाहून गेल्या. ही माहिती गावात मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. या दोन्ही महिलांचा शोध घेण्याचे काम आता सुरू करण्यात आले आहे.

संबंधित बातम्या :

चार दिवसांपूर्वी कोरोना संशयित म्हणून रुग्णालयात, स्वॅब घेण्यापूर्वी बेपत्ता, जळगावातील धक्कादायक प्रकार

Jalgaon Corona | जळगावात 5 डॉक्टर, 3 लॅब असिस्टंट यांना कोरोना

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...