चार दिवसांपूर्वी कोरोना संशयित म्हणून रुग्णालयात, स्वॅब घेण्यापूर्वी बेपत्ता, जळगावातील धक्कादायक प्रकार

कोव्हिड सेंटरमध्ये 4 दिवसांपूर्वी कोरोना संशयित म्हणून दाखल केलेला एक रुग्ण स्वॅब घेण्यापूर्वीच बेपत्ता झाला आहे.

चार दिवसांपूर्वी कोरोना संशयित म्हणून रुग्णालयात, स्वॅब घेण्यापूर्वी बेपत्ता, जळगावातील धक्कादायक प्रकार

जळगाव : जिल्ह्यातील अमळनेर येथील प्रताप महाविद्यालयात (Jalgaon Corona Suspect Missing) उभारण्यात आलेल्या कोव्हिड सेंटरमधील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या कोव्हिड सेंटरमध्ये 4 दिवसांपूर्वी कोरोना संशयित म्हणून दाखल केलेला एक रुग्ण स्वॅब घेण्यापूर्वीच बेपत्ता झाला आहे. संतापजनक बाब म्हणजे, या प्रकाराबाबत कोव्हिड रुग्णालय प्रशासनाला कोणत्याही प्रकारची माहिती नाही (Jalgaon Corona Suspect Missing).

बेपत्ता रुग्णाचा पुतण्या विचारपूस करण्यासाठी आल्यानंतर हा प्रकार उघड झाला आहे. दरम्यान, या प्रकारची दखल घेऊन विधानपरिषदेच्या माजी आमदार स्मिता वाघ यांनी सोमवारी इन्सिडेंट कमांडर सीमा अहिरे यांना जाब विचारत त्यांना चांगलेच धारेवर धरले.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

नेमकं प्रकरण काय?

अमळनेर शहरातील ब्रम्हे गल्लीतील एका कुटुंबातील पती-पत्नीसह त्यांचा मुलगा कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आल्याने कोव्हिड सेंटरमध्ये 6 जुलैला क्वारंटाईन झाले होते. त्यात पत्नीचा अहवाल पॉझिटिव्ह आला तर पती आणि मुलाचा अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना डिस्चार्ज मिळाला होता. याच कुटुंबातील एका वृद्धाचा स्वॅब त्यावेळी घेतला नव्हता. म्हणून त्या वृद्धाला 9 जुलै रोजी कोव्हिड सेंटरमध्ये दाखल केले होते. मात्र, स्वॅब घेण्यापूर्वीच ती वृद्ध व्यक्ती बेपत्ता झाली (Jalgaon Corona Suspect Missing).

11 जुलै रोजी संबंधित वृद्धाचा पुतण्या काकांच्या चौकशीसाठी रुग्णालयात आला. मात्र, तेव्हा संबंधित वृद्ध रुग्णालयात आढळून आले नाही. याबाबत वृद्धाच्या पुतण्याने रुग्णालय प्रशासनाला विचारणा केली. मात्र, तेथील कर्मचाऱ्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. रुग्ण कुठे गेला, आम्हाला माहिती नाही. ते काम पोलीस प्रशासनाचे आहे. आम्ही कुठे कुठे लक्ष ठेवू, असे त्यांना सांगण्यात आले.

दरम्यान, या प्रकारानंतर 2 दिवस बेपत्ता वृद्धाचा कुटुंबातील लोकांनी सर्वत्र शोध घेतला पण ते सापडले नाहीत. त्यानंतर पोलिसांनी देखील या प्रकरणाची दखल घेतली नाही.

Jalgaon Corona Suspect Missing

संबंधित बातम्या :

CORONA | राज्याची परिस्थिती गंभीर होतेय, देवेंद्र फडणवीसांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र

Pune Lockdown | पुण्यात कडकडीत लॉकडाऊन, आयटी, दूरसंचार कंपन्या, एमआयडीसी क्षेत्र सुरुच राहणार

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *