Viral video : महिला घेत होती उंटासोबत सेल्फी, मग असं काही झालं की…, पाहा उंटाने नेमकं काय केलं?
सोशल मीडियावर अनेक मजेशीर व्हिडीओ व्हायरल होत असतात. अशातच उंटासोबत सेल्फी काढतानाचा मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. या व्हिडीओमध्ये महिला उंटासोबत सेल्फी घेत होती. पण, त्यानंतर तिच्यासोबत असं काही घडलं की त्या महिलेला हसूच अवरलं नाही. हा व्हिडीओ आणि त्यावरील प्रतिक्रिया पाहून तुम्हीही खळखळून हसाल.

मुंबई : कोणताही कार्यक्रम असो वा लग्न समारंभ सेल्फी (Camel) घेतला नाही की आजकालच्या पिढीला अपूरं अपूरं वाटू लागतं. सध्या लोकांमध्ये सेल्फीची चांगलीच क्रेझ आहे. लोकांना जिथे संधी मिळेल तिथे ते सेल्फी काढू लागतात. अनेकवेळा सेल्फी काढण्याच्या बाबतीतही दुर्घटना घडल्याच्या बातम्या आपण बातम्यांमधून वाचत असतो. इतकंच नाही तर अनेकदा लोकांसोबत असं काही घडलं की ज्याला पाहून आताही तुम्ही खळखळून हसाल. सेल्फी काढण्याच्या नादात अनेक तरुणांना आपला जीवही गमवावा लागलाय. अशा प्रकारे सर्व व्हिडीओ (Viral video) सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. असाच एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत असून चांगलाच चर्चेत आहे. या व्हिडीओमध्ये एक महिला (women) उंटासोबत सेल्फी घेत आहे. मात्र उंटाने महिलेसोबत असं काही कृत्य केलंय की कुणीही खळखळून हसेल.
व्हिडीओमध्ये नेमकं काय?
आता तुम्ही हा व्हायरल व्हिडीओ पाहिला. पण, त्यामध्ये नेमकं काय आहे ते समजून घेऊया, अनेकांना कुठेही गेलं की सेल्फी घेण्याची आवड असते. या व्हिडीओतील महिलेनं देखील तेच केलंय. व्हिडीओमध्ये एक महिला सेल्फी घेताना दिसत आहे. ही महिला पुराच्या जवळ उभी राहून सेल्फी घेत आहे. मग उंट तिच्याजवळ येतो आणि फोटो क्लिक करू लागतो. यादरम्यान, उंटाला अचानक काहीतरी होतं. पण उंटाला अचानक काय होऊ लागतं ते कळत नाही. तो त्या महिलेचे केस त्याच्या तोंडातून पकडून तिला ओढतो. यादरम्यान महिला जोरजोरात ओरडू लागते. या व्हिडीमधील महिलेचा आक्रोश पाहून तुम्हाहा काहीतरी झाल्याचं लक्षात येईल. तुम्हीही विचार करू लागाल.
पाहा हा व्हायरल व्हिडीओ
व्हिडीओ कुणी ट्विट केला?
भारतीय वन सेवेचे अधिकारी प्रवीण अंगुसामी यांनी हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. विशेष म्हणजे आम्ही तुम्हाला ही बातमी देऊस्तर चार हजारांहून अधिक व्ह्यूज या व्हिडीओला मिळाले आहेत. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यावर नेटिझन्सकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येतायेत.
नेटिझन्स काय म्हणतायेत?
हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला नक्कीच मजा आली असेल. आता हा व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालतो आहे. व्हिडीओवर लोक वेगवेगळ्या कमेंट करत आहेत. काही जण या महिलेबद्दल सहानुभूती व्यक्त करत आहेत, तर काहीजण या व्हिडीओला मजेदार म्हणत आहेत.
इतर बातम्या
ऐन उन्हाळ्यात मालेगावमध्ये आज वीजपुरवठा राहणार बंद; कोणत्या भागाला बसणार फटका?
आजपासून आंतरराष्ट्रीय विमानांच्या नियमित उड्डाणास परवानगी; विदेशवारी स्वस्त होणार?