AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ऐन उन्हाळ्यात मालेगावमध्ये आज वीजपुरवठा राहणार बंद; कोणत्या भागाला बसणार फटका?

मालेगावमध्ये रविवारी, 27 मार्च रोजी वीजपुरवठा बंद राहणार आहे. शहरातील सोयगाव येथील 132 के. व्ही. उपकेंद्रातील काही तांत्रिक कामकाजासाठी सकाळी 8 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत विद्युत पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे शहर व परिसरात वीजपुरवठा करणाऱ्या 14 वीज फिडर क्षेत्रातील वीजपुरवठा खंडित राहणार आहे.

ऐन उन्हाळ्यात मालेगावमध्ये आज वीजपुरवठा राहणार बंद; कोणत्या भागाला बसणार फटका?
प्रातिनिधिक छायाचित्र.
| Edited By: | Updated on: Mar 27, 2022 | 10:00 AM
Share

मालेगावः नाशिक (Nashik) जिल्ह्यातल्या मालेगावमध्ये (Malegaon) रविवारी, 27 मार्च रोजी वीजपुरवठा (Power supply) बंद राहणार आहे. शहरातील सोयगाव येथील 132 के. व्ही. उपकेंद्रातील काही तांत्रिक कामकाजासाठी सकाळी 8 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत विद्युत पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे शहर व परिसरात वीजपुरवठा करणाऱ्या 14 वीज फिडर क्षेत्रातील वीजपुरवठा बंद राहणार असल्याची माहिती मालेगाव पॉवर सप्लाय लिमिटेडतर्फे देण्यात आली आहे. तरी शहर व परिसरातील वीज ग्राहकांनी याबाबतची नोंद घ्यावी, असे आवाहन कंपनीने केले आहे. मालेगाव शहरातील जुने पॉवर हाऊस, कालीकुट्टी, गोल्डननगर उपकेंद्र, जाफरनगर, आझादनगर, किल्ला, उद्याने, संगमेश्वर, बोहराबाग, मोसमपुल, कॅम्प – 2 उपकेंद्र, सटाणा नाका, मुंगसे, वडेल, कॅम्प – 1, उपकेंद्र मार्केट, यॉर्ड-कॅम्प- रावळगाव, मालेगाव सिटी फिडीर, डोंगराळे फिडर, नववसाहत फिडर आदी भागात वीजपुरवठा खंडित राहणार असल्याचे कळविण्यात आले आहे. मालेगाव शहर व परिसरातील या भागात वीजपुरवठा दिवसभर खंडित राहणार आहे.

असे कमी येईल बिल

उन्हाळ्यात प्रत्येकाचे वीजबिल जास्त येते. मात्र, ते कमी करणे आपल्या हाती असते. फ्रिजच्या तापमानात वाढ करुन तुम्ही वीजेचा वापर कमी करू शकतात. ताज्या अन्नपदार्थासाठी 36-38 डिग्री फॕरेनहाइट तापमान पुरेसे ठरते. सर्वसाधारणपणे फ्रिजद्वारे 5-6 डिग्री कमी तापमानालाच प्रक्रिया केली जाते. तसेच फ्रीजरला सेट करण्यासाठी 0 ते 5 डिग्री फॕरेनहाइट दरम्यानचे इनपुट आवश्यक ठरते. यासोबतच, फ्रिज आणि फ्रीजर नेहमीच सामानाने भरलेले असावे. याद्वारे तुम्ही आत ठेवलेल्या सामानाला थंड होण्यासाठी आवश्यकतेपेक्षा कमी उर्जेची आवश्यकता भासेल. त्यामुळे कमी उर्जेत अधिक काळ फ्रीज थंड ठेऊ शकतात.

एलईडी बल्ब वापरा

तुमच्या वॉशिंग मशीनला नियमित स्वच्छ करा. जेणेकरुन कपडे धुतेवेळी ड्रायर अधिक वेगाने चालेल आणि कमी वेळात काम पूर्ण होईल. घरामध्ये LED बल्बचा प्राधान्याने वापर करा. अन्य बल्बच्या तुलनेत एलईडीमुळे 80% वीजेचा वापर घटतो. तसेच घरातील इलेक्ट्रिक बोर्डात स्मार्ट पॉवर स्ट्रिपचा वापर करा. जेणेकरुन घरातून बाहेर पडताना एकाचवेळी घरातील सर्व वीज बंद होईल.

तर उर्वरित थकबाकी माफ

दुसरीकडे राज्यात कृषिपंप वीजजोडणी धोरण यशस्वीपणे राबविण्यात येत आहे. शेतकऱ्यांच्या मूळ थकबाकीमधील व्याज व विलंब आकारातील सूट, वीजबिल दुरुस्ती समायोजन तसेच महावितरणकडून मिळणाऱ्या निर्लेखन सवलतीमुळे वीज बिलाच्या थकबाकीचा बोजा कमी झाला आहे. यानंतरही जी सुधारित थकबाकी उरली आहे, त्यातील 50 टक्के रकमेचा भरणा 31 मार्च 2022 पर्यंत केल्यास उर्वरित थकबाकी माफ होत आहे. या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

इतर बातम्याः

पर्यावरण मंत्र्यांना अंधारात ठेवून वादग्रस्त उड्डाणपुलाला घाईघाईत मान्यता; नाशिकमध्ये पुन्हा आंदोलन धुमसणार!

Special Report | देशातल्या सर्वात मोठ्या लेखकाची ख्यातनाम प्रकाशकांकडून लूट; कोण फोडणार पुस्तकांचा तुरुंग?

tv9 Explainer : आप कौन है, भर विधानसभेत नितीशकुमारांनी सभापतींना झापलं, भाजपला झटका देण्याच्या तयारीत?

Follow Us
मनसेचा उद्या 20वा वर्धापन दिन; राज ठाकरे रायगडकडे रवाना
मनसेचा उद्या 20वा वर्धापन दिन; राज ठाकरे रायगडकडे रवाना.
टेक्नोलॉजीमुळे वृक्षलागवड करणं देखील शक्य! फडणवीसांनी दिली माहिती
टेक्नोलॉजीमुळे वृक्षलागवड करणं देखील शक्य! फडणवीसांनी दिली माहिती.
ज्योती वाघमारेंकडून एकनाथ शिंदेंबद्दल गौरवोद्गार! म्हणाल्या...
ज्योती वाघमारेंकडून एकनाथ शिंदेंबद्दल गौरवोद्गार! म्हणाल्या....
राष्ट्रपतींच्या अपमानावरून पंतप्रधान मोदींचा ममता बॅनर्जींवर निशाणा
राष्ट्रपतींच्या अपमानावरून पंतप्रधान मोदींचा ममता बॅनर्जींवर निशाणा.
सगळ्या पदांपेक्षा मोठी ओळख लाडका भाऊ; एकनाथ शिंदेंचं विधान
सगळ्या पदांपेक्षा मोठी ओळख लाडका भाऊ; एकनाथ शिंदेंचं विधान.
महिला दिनानिमित्त सीएसएमटी मेट्रो स्थानकात आकर्षक सजावट
महिला दिनानिमित्त सीएसएमटी मेट्रो स्थानकात आकर्षक सजावट.
जिल्हा परिषदेत भाजपाचा अध्यक्ष होईल! चंद्रकांत पाटील यांचा विश्वास
जिल्हा परिषदेत भाजपाचा अध्यक्ष होईल! चंद्रकांत पाटील यांचा विश्वास.
सोलापूरात मराठा क्रांती मोर्चाकडून काळी रंगपंचमी साजरी
सोलापूरात मराठा क्रांती मोर्चाकडून काळी रंगपंचमी साजरी.
भारताला पुन्हा विश्वचषक जिंकण्याची संधी! क्रिकेटप्रेमींचा उत्साह
भारताला पुन्हा विश्वचषक जिंकण्याची संधी! क्रिकेटप्रेमींचा उत्साह.
संतोष देशमुख हत्या प्रकरण; आरोपी जयराम चाटे एक दिवस जेलबाहेर
संतोष देशमुख हत्या प्रकरण; आरोपी जयराम चाटे एक दिवस जेलबाहेर.