नाशिकमध्ये निवडणुकीच्या तोंडावर विकासकामांचा बार, आता डबल डेकर उड्डाणपूल होणार; 3 हजार कोटींचा खर्च येणार!

नाशिकमध्ये द्वारका ते नाशिकरोड पर्यंत 5.9 किलोमीटर अंतराचा उड्डाणपूल उभारण्यात येणार आहे. या मार्गावर मेट्रो निओ आणि उड्डाणपूल असे दोन्ही प्रकल्प एकत्रितपणे होतायत. त्यासाठी नागपूर मॉडेलचा वापर केला जाणाराय. या दोन्ही प्रकल्पांच्या एकत्रित उभारणीमुळे सुमारे 300 कोटी रुपयांची बचत होईल, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. या कामासाठी 3 हजार कोटींचा खर्च अपेक्षितयत.

नाशिकमध्ये निवडणुकीच्या तोंडावर विकासकामांचा बार, आता डबल डेकर उड्डाणपूल होणार; 3 हजार कोटींचा खर्च येणार!
नाशिकमध्ये लवकरच डबल डेकर उड्डाणपूल साकारला जाणार आहे.
Follow us
| Updated on: Mar 27, 2022 | 10:01 AM

नाशिकः महापालिका निवडणुकीच्या तोंडावर विकासकामांचा बार उडविला जात असून, आता नाशिकमध्ये (Nashik) अजून एक डबल डेकर उड्डाणपूल (Flyover) उभारण्यासाठी मंजुरी मिळाली आहे. शहरातील द्वारका ते नाशिकरोड पर्यंत 5.9 किलोमीटर अंतराचा हा उड्डाणपूल उभारण्यात येणार आहे. त्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (National Highways Authority) नुकताच हिरवा झेंडा दाखवला आहे. विशेष म्हणजे या मार्गावर मेट्रो निओ आणि उड्डाणपूल असे दोन्ही प्रकल्प एकत्रितपणे होणारेत. त्यासाठी नागपूर मॉडेलचा वापर केला जाणाराय. या दोन्ही प्रकल्पांच्या एकत्रित उभारणीमुळे सुमारे 300 कोटी रुपयांची बचत होईल, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. या कामासाठी 3 हजार कोटींचा खर्च अपेक्षितयत. या उड्डाणपुलाच्या कामासाठी शिवसेना खासदार हेमंत गोडसे यांनी गेल्या काही दिवसांपासून जोरदार प्रयत्न सुरू केले होते. त्यासाठी लवकरच महारेल्वे आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून डीपीआर तयार करण्यात येणार आहे. शिवाय या कामासाठी येथील जमिनीची सॉइल टेस्टही यापूर्वीच करण्यात आलीय.

उंटवाडी पुलासाठी झाडांचा बळी

नाशिकमधील उंटवाडी उड्डाणपुलांसाठी शेकडो झाडांचा बळी दिला जाणारय. उंटवाडी उड्डापुलाची रचना बदलण्याचे आदेश पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिले होते. या प्रकरणी उच्च न्यायालयात दोन याचिका प्रलंबित आहेत. तरीही महापालिकेच्या बांधकाम विभागाने सिटी सेंटर ते त्रिमूर्ती चौक दरम्यानच्या उड्डाणपुलाच्या कामासाठी सुधारित कार्यारंभ आदेश दिल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पर्यावरण प्रेमींची एकप्रकारे घोर फसवणूक झाली आहे. या उड्डाणपुलासाठी 580 झाडे तोडावी लागणार आहेत. त्यात 60 वर्षांपेक्षा जास्त जुनी असलेली चिंच, नारळ, शेवगा, कडूनिंबाची झाडेही आहेत.

विरोधाची धार तीव्र

नाशिकमध्ये पुन्हा एकदा पर्यावरणप्रेमी आक्रमक झाले असून, त्यांनी उड्डापुलाविरोधातील लढा तीव्र करण्याचा निर्धार केला आहे. सिडकोतल्या त्रिमूर्ती चौकातील उड्डाणपुलाविरोधात माजी नगरसेवक मुकेश शहाणे यांनी उच्च न्यायालयात याचिक दाखल केलीय. मात्र, दुसरीकडे प्रशासनाने या कामासाठी वृक्षप्राधिकरण समितीची परवानगी न घेताच सुधारित कार्यारंभ आदेश दिलेत. या उड्डाणपुलाला विरोध करण्यासाठी आणि वृक्षतोड थांबण्यासाठी पर्यावरणप्रेमी पुन्हा आक्रमक झालेत. त्यांनी या उड्डापुलाविरोधात स्वाक्षरी मोहीम सुरू केलीय. येणाऱ्या काळात महापालिका निवडणूक आहे. त्याच्या तोंडावर उड्डाणपुलाचा मुद्दा पुन्हा चिघळण्याची शक्यताय.

इतर बातम्याः

पर्यावरण मंत्र्यांना अंधारात ठेवून वादग्रस्त उड्डाणपुलाला घाईघाईत मान्यता; नाशिकमध्ये पुन्हा आंदोलन धुमसणार!

Special Report | देशातल्या सर्वात मोठ्या लेखकाची ख्यातनाम प्रकाशकांकडून लूट; कोण फोडणार पुस्तकांचा तुरुंग?

tv9 Explainer : आप कौन है, भर विधानसभेत नितीशकुमारांनी सभापतींना झापलं, भाजपला झटका देण्याच्या तयारीत?

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.