आजपासून आंतरराष्ट्रीय विमानांच्या नियमित उड्डाणास परवानगी; विदेशवारी स्वस्त होणार?

आजपासून आंतरराष्ट्रीय विमानांच्या नियमित उड्डाणास परवानगी; विदेशवारी स्वस्त होणार?

कोरोना काळात (covid -19) लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे गेल्या दोन वर्षांपासून आंतरराष्ट्रीय विमान सेवा (international flights) बंद होती. मात्र आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने आजपासून पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय विमान सेवा सुरू झाली आहे.

अजय देशपांडे

|

Mar 27, 2022 | 7:03 AM

नवी दिल्ली : कोरोना काळात (covid -19) लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे गेल्या दोन वर्षांपासून आंतरराष्ट्रीय विमान सेवा (international flights) बंद होती. मात्र आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने आजपासून पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय विमान सेवा सुरू झाली आहे. आंतरराष्ट्रीय विमान सेवेच्या पार्श्वभूमीवर सर्वच विमान कंपन्यांनी या आधीच आपली तयारी पूर्ण केली आहे. भारतीय विमान कंपन्यांसोबतच एमिरेट्स सारख्या परदेशी विमान कंपन्या देखील नियमित उड्डाणे पुन्हा सुरू करणार आहोत. राजधानी दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून (IGIA) एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासून नियमित आंतरराष्ट्रीय उड्डाणांमध्ये वाढ होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. कोरोनामुळे तोट्यात गेलेल्या विमान कंपन्यांसाठी हा मोठा दिलासा मानला जात आहे. सोतबच आंतरराष्ट्रीय विमानांच्या उड्डाणांमध्ये वाढ झाल्याने आता विदेशवारी देखील स्वस्त होण्याचा अंदाज आहे.

विमान कंपन्यांना दिलासा

कोरोना काळात लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे विमान सेवा ठप्प झाली होती. कोरोनाच्या पहिल्या लॉकडाऊनमध्ये तर देशांतर्गंत आणि आंतरराष्ट्रीय अशा दोनही विमान सेवा बंद होत्या. याचा मोठा फटका हा विमान कंपन्यांना बसला. विमान सेवा बंद होती, मात्र बाकी सर्व खर्च चालूच असल्यामुळे विमान कंपन्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. कोरोनाची लाट ओसरल्यानंतर काही प्रमाणात देशांतर्गत विमान सेवेसाठी परवानगी देण्यात आली होती, मात्र ती देखील पूर्ण क्षमतेने नसल्यामुळे परवडत नव्हती. परंतु आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असून, निर्बंधांमध्ये शिथिलता देण्यात आली आहे. तसेच आजपासून आंतरराष्ट्रीय विमान सेवा सुरू झाल्याने विमान कंपन्यांना दिलासा मिळाला आहे.

विदेशवारी स्वस्त होणार?

आजपासून पूर्ण क्षमतेने आंतरराष्ट्रीय विमान सेवा सुरू झाली आहे. आंतरराष्ट्रीय विमान सेवा सुरू झाल्याने परदेशात जाणाऱ्या विमानांची संख्या देखील वाढणार आहे. विमान कंपन्यांच्या आपसातील स्पर्धेचा प्रवाशांना फायदा होऊ शकतो. विमान प्रवास स्वस्त होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. यापूर्वी काही ठराविकच विमानांचे उड्डाण होत असल्यामुळे तिकिटांच्या दरात देखील प्रचंड वाढ झाली होती.

संबंधित बातम्या

घर खरेदी करायचंय? जाणून घ्या घर खरेदी करण्यापूर्वी काय काळजी घ्यावी

फक्त गुंतवणुकीतूनच नाही तर ‘या’ मार्गाने देखील वाचवा टॅक्स; जाणून घ्या टॅक्स बचतीचे सोपे मार्ग

रेशन कार्ड-आधार लिंक करण्याची अंतिम तारीख 30 जूनपर्यंत वाढवली, या 7 टप्प्यात काम होणार पूर्ण; देशात कुठेही मिळणार रेशन

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें