AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंडेंबाबत खळबळजनक दावा करणारा हॅकर सय्यद शुजा नेमका कोण आहे?

Who Is Syed Shuja मुंबई: ईव्हीएम हॅकिंगच्या माहितीमुळे भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांची हत्या झाली, या अमेरिकन सायबर एक्स्पर्ट सय्यद शुजाच्या (Syed Shuja) दाव्याने देशभरात खळबळ उडाली आहे. सय्यद शुजाने सोमवारी लंडनमध्ये व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे हा खळबळजनक आरोप केला. इतकंच नाही तर भाजपने 2014 मध्ये रिलायन्सच्या मदतीने ईव्हीएम हॅक करुन विजय मिळवल्याचा दावा शुजाने केला. शुजाच्या […]

मुंडेंबाबत खळबळजनक दावा करणारा हॅकर सय्यद शुजा नेमका कोण आहे?
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:35 PM
Share

Who Is Syed Shuja मुंबई: ईव्हीएम हॅकिंगच्या माहितीमुळे भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांची हत्या झाली, या अमेरिकन सायबर एक्स्पर्ट सय्यद शुजाच्या (Syed Shuja) दाव्याने देशभरात खळबळ उडाली आहे. सय्यद शुजाने सोमवारी लंडनमध्ये व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे हा खळबळजनक आरोप केला. इतकंच नाही तर भाजपने 2014 मध्ये रिलायन्सच्या मदतीने ईव्हीएम हॅक करुन विजय मिळवल्याचा दावा शुजाने केला. शुजाच्या मते गोपीनाथ मुंडेच नव्हे तर ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांचीही हत्या याच कारणामुळे झाली. शुजाच्या दाव्यांमुळे एकच खळबळ उडाली आहे. मात्र हा दावा करणारा सय्यद शुजा आहे तरी कोण, हा प्रश्न सर्वांना पडला आहे.

कोण आहे सय्यद शुजा? सय्यद शुजा हा एक सायबर सिक्युरिटी रिसर्चर आहे. तो मूळचा हैदराबादचा रहिवासी आहे. सध्या तो नोकरीनिमित्त अमेरिकेत राहतो.

सय्यद शुजाच्या दाव्यानुसार, तो भारतात मतदानासाठी बनवण्यात येणाऱ्या ईव्हीएम मशीनच्या टीमचा सदस्य होता.

शुजाच्या मते, तो ECIL अर्थात भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडमध्ये काम करत होता.

शुजाने दावा केला आहे की, 2014 मध्ये त्याच्या टीमला कोणत्याही परिस्थितीत ईव्हीएम हॅक करण्यास बजावलं होतं. त्याच्या टीमने ईव्हीएम हॅक केलं, तेव्हा हैदराबादमध्ये त्यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला, या हल्ल्यात शुजा बचावला मात्र त्याचे सहकारी मारले गेले, असाही दावा शुजाने केला.

सय्यद शुजाने केलेल्या या दाव्यांमध्ये तथ्य आहे की नाही हे येत्या काळात समोर येतं का ते पाहावं लागेल.

सय्यद शुजाचे नेमके दावे काय? 

अमेरिकन सायबर एक्स्पर्ट सय्यद शुजा असं या एक्स्पर्टचं नाव आहे, त्याने लंडनमध्ये दावा केला आहे की, 2014 च्या निवडणुकीत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांना ईव्हीएम हॅकिंग माहित होतं, त्यामुळेच त्यांची हत्या झाली. लोकसभा निवडणुकीत ईव्हीएम हॅक केलं होतं. 14 लोकांच्या टीमने हे काम केलं होतं. त्यापैकी काहींची हत्या झाल्याचाही दावा अमेरिकेच्या एक्स्पर्टने लंडनमध्ये केला आहे.

संबंधित बातम्या 

‘रॉ’ म्हणजे नेमकं काय?

EVM हॅकिंगच्या माहितीमुळेच गोपीनाथ मुंडेंची हत्या, अमेरिकन एक्स्पर्टचा दावा

गोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूची सुप्रीम कोर्टाच्या न्यायमूर्तींकडून चौकशी व्हावी : भुजबळ

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...