गोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूची सुप्रीम कोर्टाच्या न्यायमूर्तींकडून चौकशी व्हावी : भुजबळ

औरंगाबाद : कथित अमेरिकन हॅकरने केलेल्या दाव्यानंतर भारतात खळबळ माजली आहे. भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांना ईव्हीएममध्ये छेडछाड झाली असल्याचं माहित होतं. म्हणूनच त्यांची हत्या करण्यात आली, असा दावा सईद शूजा या अमेरिकन हॅकरने केलाय. विरोधकांनी आता गोपीनाथ मुंडेंच्या न्यायालयीन चौकशीची मागणी केली आहे. गोपीनाथ मुंडेंबाबत होणारे हे आरोप धक्कादायक आहेत. याची …

गोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूची सुप्रीम कोर्टाच्या न्यायमूर्तींकडून चौकशी व्हावी : भुजबळ

औरंगाबाद : कथित अमेरिकन हॅकरने केलेल्या दाव्यानंतर भारतात खळबळ माजली आहे. भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांना ईव्हीएममध्ये छेडछाड झाली असल्याचं माहित होतं. म्हणूनच त्यांची हत्या करण्यात आली, असा दावा सईद शूजा या अमेरिकन हॅकरने केलाय. विरोधकांनी आता गोपीनाथ मुंडेंच्या न्यायालयीन चौकशीची मागणी केली आहे.

गोपीनाथ मुंडेंबाबत होणारे हे आरोप धक्कादायक आहेत. याची सुप्रीम कोर्टाच्या न्यायमूर्तींकडून चौकशी व्हायला हवी. चौकशी नाही झाली तर जनतेने उठाव करायला हवा. लोक मुंडेंबाबत असंच कुजबुजत होते. मात्र आता झालेला आरोप धक्कादायक आहे. म्हणून सगळे पक्ष मतदार पत्र परत आणा म्हणत असताना भाजप ईव्हीएमवर ठाम आहे, असं माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी म्हटलंय.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही याबाबत शंका व्यक्त केली आहे. ईव्हीएम प्रकरणी धक्कादायक प्रकार समोर आलाय. जी माहिती मिळाली त्याने जगाच्या पाठीवर छी थू झाली आहे. मशीनचा वापर करा अशी मागणी एकच पक्ष करतोय. गोपीनाथ मुंडे यांचा या निमित्ताने उल्लेख झाला तो गंभीर आहे. याची चौकशी झाली पाहिजे. गोपीनाथ मुंडे यांचा नैसर्गिक मृत्यू झाला नाही हे जर खरं असेल तर भारतीय जनता पार्टी कोणत्या प्रकारे षडयंत्र रचतात ते समोर येईल, असा निशाणा जयंत पाटलांनी साधलाय.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनीही गोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूच्या चौकशीची मागणी केली आहे. आज ईव्हीएमबद्दल सर्व बोलतायत. आजची बातमी आहे. 2014 साली ईव्हीएम हॅक केले. गोपीनाथ मुंडे यांना याची माहिती मिळाली तर त्यांना संपवले. खोटं असेल तर सरकारने त्याच्यावर कारवाई करावी. पण तो एवढं बोलतोय म्हणजे हे सत्य आहे, असं अशोक चव्हाण यांनी म्हटलंय.

काय आहे हॅकरचा दावा?

इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन अर्थात ईव्हीएम हॅक होऊ शकतं की नाही, याबाबत अमेरिकन सायबर एक्स्पर्टने मोठा दावा केला आहे. अमेरिकन सायबर एक्स्पर्ट सईद शूजा असं या एक्स्पर्टचं नाव आहे, त्याने लंडनमध्ये दावा केला आहे की, 2014 च्या निवडणुकीत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांना ईव्हीएम हॅकिंग माहित होतं, त्यामुळेच त्यांची हत्या झाली. लोकसभा निवडणुकीत ईव्हीएम हॅक केलं होतं. 14 लोकांच्या टीमने हे काम केलं होतं. त्यापैकी काहींची हत्या झाल्याचाही दावा अमेरिकेच्या एक्स्पर्टने लंडनमध्ये केला आहे. तर दिल्ली निवडणुकीत आम आदमी पक्षाच्या सांगण्यावरुन हॅक केलं असल्याचाही दावा करण्यात आला.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *