मोदी पुन्हा जिंकतील का? मोदींचा भाऊ म्हणतो…..

मोदी पुन्हा जिंकतील का? मोदींचा भाऊ म्हणतो.....

मंगळुरु: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाऊ प्रल्हाद मोदी (Prahlad Modi) यांनी मंगळवारी भाजप आणि स्वत:चा भाऊ नरेंद्र मोदींबाबत भविष्यवाणी केली. सध्याची राजकीय स्थिती, देशभरात भाजपबाबत तयार होत असलेलं मत, प्रियांका गांधी यांची सक्रीय राजकारणातील एण्ट्री याबाबत प्रल्हाद मोदी यांना विचारण्यात आलं.

प्रल्हाद मोदी यांच्या अंदाजानुसार, “भारतीय जनता पार्टी (BJP) आगामी लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election) 300 पेक्षा जास्त जागा जिंकतील. तसंच नरेंद्र मोदी हे पुन्हा एकदा पंतप्रधान होतील.”

प्रल्हाद मोदी यांना देशभरातील सध्याच्या राजकारणाबद्दल विचारण्यात आलं. त्यावर प्रल्हाद मोदी म्हणाले, “मला विश्वास आहे की आगामी निवडणूक ही 2014 ची पुनरावृत्ती ठरेल. भाजपला तीनशे पेक्षा जास्त जागा मिळतील. तसंच नरेंद्र मोदींना पुन्हा एकदा पंतप्रधानपदाची धुरा मिळेल.”प्रल्हाद मोदी हे मंदिर आणि धार्मिक कार्यक्रमांसाठी मंगळुरुत आहेत. यादरम्यान त्यांना देशाच्या राजकीय परिस्थितीबाबत विचारलं असता, त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.

पंतप्रधान मोदींनी गेल्या साडेचार वर्षात देशभरात विविध विकासकामांची अंमलबजावणी केल्याचं प्रल्हाद मोदी म्हणाले. यावेळी प्रल्हाद मोदी यांना काँग्रेसच्या नवनियुक्त सरचिटणीस प्रियांका गांधी यांच्याबाबतही प्रश्न विचारण्यात आलं.

त्यावर प्रल्हाद मोदी यांनी प्रियांका गांधींच्या एण्ट्रीने काँग्रेसला निवडणुकीत फायदा होणार नाही असा दावा केला. प्रियांकांना काँग्रेसने पूर्व उत्तर प्रदेशच्या सरचिटणीसपदाची जबाबदारी दिली आहे.

Published On - 12:51 pm, Wed, 13 February 19

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI