AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पावसात कपडे खराब होतात का? या 7 घरगुती ट्रिक्स वापरून पहा, कपडे होतील चकाचक !

पावसाळ्यात डागांपासून कपड्यांचे संरक्षण करणे अवघड असले तरी अशा घरगुती उपायांनी तुम्ही ते सहजपणे स्वच्छ करू शकता. हे उपाय केवळ सोपे नाहीत, तर स्वस्तही आहेत आणि तुमच्या कपड्यांना पुन्हा एकदा नवं रूप देऊ शकतात.

पावसात कपडे खराब होतात का? या 7 घरगुती ट्रिक्स वापरून पहा, कपडे होतील चकाचक !
मळलेले कपडे आता दिसतील नव्यासारखे...Image Credit source: social media
साक्षी कणसे
साक्षी कणसे | Edited By: | Updated on: Jun 25, 2025 | 10:12 AM
Share

पावसाळा म्हणजे गारवा, सरींचा आनंद, आणि त्याचबरोबर अनेक अडचणीही. यापैकी एक मोठी समस्या म्हणजे कपड्यांवर लागणारे चिखलाचे डाग. शाळेत जाणारी मुले, ऑफिसला धावणारे कर्मचारी किंवा बाहेरच्या कामासाठी घराबाहेर पडणारी कोणतीही व्यक्ती सगळ्यांनाच या डागांचा त्रास होतो. हे डाग केवळ दिसायला कुरूप नसतात, तर ते काढणेही तितकेच कठीण असते. पण काळजी करू नका, तुमच्या घरातल्या काही सोप्या गोष्टींच्या वापराने तुम्ही हे डाग सहज काढू शकता.

1. आधी चिखल सुकू द्या आणि नंतर झाडा

चिखल लागल्यावर लगेच पाणी टाकू नका. त्याऐवजी डाग सुकू द्या. सुकल्यावर मऊ ब्रशने, हलक्या हाताने चिखल झाडून टाका. याने डागाची वरची थर दूर होईल.

2. थंड पाण्याचा वापर करा

सुकलेला चिखल झाडून झाल्यावर कपडे थंड पाण्याने धुवा. गरम पाणी वापरल्यास डाग अजून खोल जाऊ शकतात व निघण्यास कठीन होऊ शकते.

3. बेकिंग सोडा वापरा

एक चमचा बेकिंग सोड्यात थोडंसे पाणी घालून त्याची पेस्ट बनवा नंतर ही पेस्ट डागांवर लावा आणि 10-15 मिनिटांनी थंड पाण्याने धुवा. यामुळे डाग निघण्यास मदत होते.

4. लिंबाचा रस लावा

लिंबामध्ये असलेले सिट्रिक अ‍ॅसिड डाग साफ करण्यासाठी प्रभावी ठरते. लिंबाचा रस डागावर लावून काही वेळ ठेवा आणि नंतर कपडे धुवा.

5. पांढरा व्हिनेगर वापरा

डाग हटत नसेल तर एका कप पाण्यात 2 चमचे पांढरा व्हिनेगर मिसळा. हा घोल डागांवर लावा, थोडा वेळ ठेवा आणि नंतर धुवा. ही पेस्ट तुमच्या कपड्यातील डाग आणि दुर्गंधी दोन्ही दूर करते.

6. डिटर्जंटचा चांगला वापर करा

वर दिलेले उपाय करून झाल्यावर चांगल्या क्वालिटीच्या डिटर्जंटने कपडे धुवा किंवा वॉशिंग मशीनमध्ये टाका. याने उरलेले डागही निघून जातील.

7. नाजूक कपड्यांसाठी ड्राय क्लिनिंग करा

जर कपडे अतिशय नाजूक असतील जसे की, सिल्क किंवा उबदार ऊनी कपडे तर घरच्या घरी उपाय करण्याऐवजी ते कपडे ड्राय क्लिनिंगला द्या. यामुळे कपडे स्चच्छ होतील व कोणते नुकसानही होणार नाही.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

Follow Us
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ