AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ambani Family : अंबानींच्या घरच्या गणेशोत्सवात काय-काय होतं, स्पेशल मेन्यू व्हायरल

अंबानी कुटुंबाचा गणेशोत्सव थाटामाटात झाला. अनेक सेलिब्रिटी, दिग्गजांनी गणरायाच्या दर्शनासाठी हजेरी लवली. त्यांच्यासाठी खास मेन्यू ठेवण्यात आला होता. या ग्रँड इव्हेंटचा खास मेन्यू सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Ambani Family : अंबानींच्या घरच्या गणेशोत्सवात काय-काय होतं, स्पेशल मेन्यू व्हायरल
| Updated on: Sep 16, 2026 | 6:18 PM
Share

केवळ भारतातील नव्हे तर आशियातील सर्वात श्रीमंत कुटुंब अशी ख्याती असलेलं अंबानी कुटुंब (Ambani Family) नेहमी चर्चेत असतं. दरवर्षीप्रमाणे यंदाही अंबानींच्य अँटिलियामध्ये गणेशोत्सव थाटामाटात, राजेशाही अंदाजात पार पडला. या उत्सवासाठी अँटिलियाची खास सजावट करण्यात आली होती, त्याचे अनेक फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. दरवर्षीप्रमाणे बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटी, उद्योजक, राजकारणी यांनी अंबानी कुटुंबांच्या सोहळ्याला हजेरी लावत गणरायाचे आशीर्वाद घेतले. आकर्षक सजावट, पारंपरिक पूजा-विधी आणि उत्साहपूर्ण वातावरणासोबतच अँटिलियातील पाहुण्यांसाठी खास मेजवानीचीही व्यवस्था करण्यात आली होती.

यंदाच्या खाद्यपदार्थांच्या मेन्यूचं खास वैशिष्ट्य म्हणजे त्यामध्ये फक्त एका राज्यातील पदार्थांचा समावेश नव्हता. महाराष्ट्रापासून गुजरातपर्यंत, दक्षिण भारतीय पदार्थांपासून चटपटीत चाट आणि इंडो-चायनीज पदार्थांपर्यंत विविध चवींचा समावेश या मेन्यूमध्ये करण्यात आला होता. त्यामुळे पाहुण्यांना एकाच ठिकाणी देशाच्या वेगवेगळ्या भागांतील लोकप्रिय पदार्थांचा आस्वाद घेता आला. विविध स्वादिष्ट पदार्थ खाऊन पाहूणएही तृप्त झाले. चला जाणून घेऊया यंदा अँटिलियात काय होता मेन्यू ?

देशी पेयांनी पाहुण्यांचं स्वागत

गणेशोत्सवासाठी येणाऱ्या पाहुण्यांचे सुरुवातीला विविध थंडगार आणि ताजेतवाने पेयांनी स्वागत करण्यात आलं. यामध्ये डाळिंब पन्हं, कैरी पन्हं आणि लस्सीचा समावेश होता. कैरी पन्ह्याचा आंबट-गोड स्वाद आणि लस्सीची थंडगार चव भारतीय खाद्यसंस्कृतीचा खास भाग मानली जाते. या पारंपरिक पेयांमुळे मेजवानीची सुरुवातही अगदी देशी अंदाजात झाली.

मिसळ पाव आणि बटाटा वडा, महाराष्ट्राचा दिसला खास अंदाज

महाराष्ट्रीय खाद्यपदार्थांचा नाव काढलं आणि मिसळ पाव नाही, असं कसं होईल? अंबानी कुटुंबाच्या या खास मेन्यूमध्ये मिसळ पावसोबत कोथिंबीर वडी आणि बटाटा वड्याचाही समावेश होता. एवढंच नव्हे तर वड्यासोबत खास लसूण चटणीनेही स्वाद वाढवला. त्यामुळे महाराष्ट्रातील लोकप्रिय नाश्त्याचा अस्सल स्वाद पाहुण्यांना एकाच ठिकाणी चाखता आला.

गुजराती पदार्थांमध्येही विविधता

गुजराती खाद्यसंस्कृतीलाही या मेन्यूमध्ये विशेष स्थान देण्यात आले होते. यामध्ये चोखा आणि मक्कीची खीचू, सांभरियू, पट्टी समोसा आणि मेथी ढोकळा यांसारख्या पदार्थांचा समावेश होता. मेथी ढोकळा आणि खीचूसारखे पदार्थांनी या मेन्यची खासियत वाढवली. हलकी, चविष्ट आणि पारंपरिक चव ही या पदार्थांची खास ओळख आहे.

साऊथ इंडियन पदार्थांनीही वेधून घेतलं लक्ष

दक्षिण भारतीय खाद्यपदार्थ आवडणाऱ्या पाहुण्यांसाठीही मेन्यूमध्ये अनेक पर्याय ठेवण्यात आले होते. रसम वडा, घी पोडी इडली आणि बिसी बेळे भात यांचा यात समावेश होता. त्यासोबत बूंदीही होती. दक्षिण भारतातील वेगवेगळ्या चवींनी पाहुण्यांचं लक्ष वेधून घेतलं.

चाटप्रेमींसाठी चटपटीत पर्याय

चाटशिवाय भारतीय मेजवानी पूर्ण होणं तसं कठीणच! त्यामुळे या खास मेन्यूमध्ये चाटप्रेमींसाठीही अनेक पर्याय ठेवण्यात आले होते. टोमॅटो चाट, स्पायसी रगुल्ला, आलू कचोरी आणि लाल चणा चाट यांचा त्यात समावेश होता. या पदार्थांमध्ये आंबट, गोड आणि तिखट अशा विविध चवींचा संगम पाहायला मिळाला. त्यामुळे चटपटीत पदार्थांची आवड असलेल्या पाहुण्यांसाठीही मेन्यूमध्ये भरपूर पर्याय उपलब्ध होते.

इंडो-चायनीज पदार्थांनाही खासं स्थान

पारंपरिक भारतीय पदार्थांसोबतच इंडो-चायनीज पदार्थांचाही अंबानींच्या घरातील या मेन्यूमध्ये समावेश करण्यात आला होता. यामध्ये वोक टॉस्ड चिली पनीर, गोल्डन व्हेज स्प्रिंग रोल आणि शेजवान नूडल्स यांसारखे लोकप्रिय पदार्थ होते. . त्यामुळे भारतीय पारंपरिक पदार्थांपेक्षा काही वेगळे खाण्याची इच्छा असलेल्या पाहुण्यांना वेगळे पदार्थ मिळाले,

एकाच मेन्यूत अनेक राज्यांचा स्वाद

अंबानी कुटुंबाच्या गणेशोत्सवातील ही मेजवानी विशेष ठरण्याचे कारण म्हणजे या मेन्यूमधील वैविध्य. महाराष्ट्रातील लोकप्रिय नाश्त्यापासून गुजराती पदार्थांपर्यंत, दक्षिण भारतीय व्यंजनांपासून चटपटीत चाट आणि इंडो-चायनीज पदार्थांपर्यंत विविध चवींचा समावेश करण्यात आला होता.

Follow Us
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर... जरांगे पाटलांची प्रतिक्रिया...
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर...  आंदोलनाविषयी मनोज जरांगे पाटलांची मोठी प्रतिक्रिया!
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं...
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची जरांगेंवर...
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची मनोज जरांगेंवर अजब कविता
...तरच राष्ट्रवादीचं विलिनीकरण शक्य; त्या एका अटीबाबत रोहित पवारांची..
...तरच राष्ट्रवादीचं विलिनीकरण शक्य; त्या एका अटीबाबत रोहित पवारांची मोठी प्रतिक्रिया
PM मोदींच्या सेवायात्रेत महाराष्ट्र महत्त्वाचा भाग! कृष्णराज महाडीक...
PM मोदींच्या सेवायात्रेत महाराष्ट्र महत्त्वाचा भाग! कृष्णराज महाडीक यांनी सांगितला भाजपचा खास प्लॅन
तीन टेस्ट, पक्षाची संघटना ते निवडणूक आयोगाची भूमिका, शिंदे गटाचा युक्त
तीन टेस्ट, पक्षाची संघटना ते निवडणूक आयोगाची भूमिका, शिंदे गटाचा युक्तिवाद काय? वाचा महत्त्वाचे मुद्दे
आता मूळ पक्ष कोणता हा मुद्दा... आजच्या सुनावणीतील महत्त्वाचे अपडेट्स
Shivsena Hearing : आता मूळ पक्ष कोणता हा मुद्दा... आजच्या सुनावणीतील महत्त्वाचे अपडेट्स
मुंबईतील जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोर्टात याचिका, नेमकं..
मुंबईतील जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोर्टात याचिका, नेमकं काय घडतंय?