AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

केसांच्या गळण्यापासून हैराण आहात का?, आवळ्याचे हेअर पॅक नक्की ट्राय करा अन् झटपट रिझल्ट मिळवा

स्त्रीयांना त्यांचे केस हे सर्वात महत्वाचे असताता. असं म्हटलं जातं की महीलांना त्यांच्या केसाची सर्वात जास्ता काळजी घेतात. पण अनेक महिलांना केस गळण्याचा त्रास असतो. वातावरणातील बदल किंवा ताण या गोष्टीमुळे केस गळण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात होत असते.

केसांच्या गळण्यापासून हैराण आहात का?, आवळ्याचे हेअर पॅक नक्की ट्राय करा अन् झटपट रिझल्ट मिळवा
सुंदर केस
| Edited By: Mrunal Patil | Updated on: Oct 23, 2021 | 9:11 AM
Share

मुंबई : स्त्रीयांना त्यांचे केस हे सर्वात महत्वाचे असताता. असं म्हटलं जातं की महीलांना त्यांच्या केसाची सर्वात जास्ता काळजी घेतात. पण अनेक महिलांना केस गळण्याचा त्रास असतो. वातावरणातील बदल किंवा ताण या गोष्टीमुळे केस गळण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात होत असते. त्याचा परिणाम आपल्या आत्मविश्वासावरही होत असतो. केसांची काळजी घेण्यासाठी तुम्ही नैसर्गिक घटक वापरू शकता.केसांसाठी आवळा वापरू शकता. हे तुमचे केस गळणे आणि केसांशी संबंधित इतर समस्यांशी लढण्यास मदत करेल. व्हिटॅमिन सी समृद्ध असलेले आवळा आपल्या केसांसाठी खूप फायदेशीर आहे. चला तर मग जाणून घेऊयात आवळ्याचे फायदे

निरोगी केसांसाठी अशाप्रकारे वापरा आवळा

अंडी आणि आवळा

3-4 आवळा घ्या आणि त्यांना अर्धे कापून घ्या. बिया फेकून द्या आणि नंतर आवळा तुकडे बारीक करून पेस्ट तयार करा. एका वेगळ्या भांड्यात एक अंडे फेटून त्यात आवळा पेस्ट घाला. हे दोन्ही एकत्र करून हेअर पॅक संपूर्ण केसांवर आणि टाळूवर लावा. हा मास्क एका तासासाठी केसांवर ठेवा त्यानंतर सौम्य शैम्पू आणि थंड पाण्याने धुवा.

कढीपत्ता आणि आवळा

आवळ्याचे लहान तुकडे करा त्यामध्ये मूठभर कढीपत्ता आणि थोडे पाणी घाला. एक गुळगुळीत पेस्ट तयार करण्यासाठी सर्वकाही एकत्र करा. टाळू आणि केसांची मालिश करा. दोन तास राहू द्या. त्यानंतर ते सौम्य शाम्पूने केस धुवा.

नारळ तेल आणि आवळा

एक चमचा आवळा रस आणि 1-2 चमचे खोबरेल तेल एकत्र मिसळा. हे मिश्रण टाळूवर तसेच केसांना लावा आणि काही मिनिटे बोटांनी मसाज करा. तासभर तसंच राहू द्या आणि मग सौम्य शाम्पूने धुवा. केसगळतीसाठी आठवड्यातून एकदा किंवा दोनदा हा उपाय करा.

लिंबाचा रस आणि आवळा

एका भांड्यात २-३ टेबलस्पून आवळा पावडर घ्या आणि त्यात थोडे पाणी घालून पेस्ट बनवा. पेस्टमध्ये 1-2 चमचे ताजे लिंबाचा रस घाला. हेअर पॅक तुमच्या टाळूवर आणि केसांना नीट लावा. सौम्य शैम्पूने धुण्यापूर्वी एक तास सोडा.

हिबिस्कस, ऑलिव्ह ऑइल आणि आवळा

6-8 ताजी लाल हिबिस्कस फुले घ्या आणि पाकळ्या वेगळ्या करा. त्यांना बारीक वाटून त्याची पेस्ट बनवा आणि बाजूला ठेवा. हिबिस्कस पेस्टमध्ये 3-4 चमचे ऑलिव्ह तेल मिसळा. तसेच एक चमचा आवळा पावडर घालून मिक्स करावे. हेअर पॅक संपूर्ण टाळू आणि केसांवर लावा. यानंतर, सौम्य शैम्पूने धुण्यापूर्वी 30-40 मिनिटे सोडा.

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

Follow Us
आयआयटी मुंबईत साहिल वाकोडे प्रकरणी आंदोलन; अस्लम शेख, वर्षा गायकवाड...
आयआयटी मुंबईत साहिल वाकोडे प्रकरणी आंदोलन; अस्लम शेख, वर्षा गायकवाड सहभागी,
मोठी बातमी! स्मिता जाधवांना पाठिंबा देण्यावर शंभूराज देसाईंची मोठी अट,
मोठी बातमी! स्मिता जाधवांना पाठिंबा देण्यावर शंभूराज देसाईंची मोठी अट, महायुतीत धुसफूस कायम
राज ठाकरेंच्या शिवतीर्थवर आमिर खानची अचानक एन्ट्री; शिवतीर्थवर नेमकं..
Aamir Khan Meet Raj Thackeray : राज ठाकरेंच्या शिवतीर्थवर आमिर खानची अचानक एन्ट्री; शिवतीर्थवर नेमकं काय घडतंय? कारण अद्याप गुलदस्त्यात
पत्रकार असल्याचा धाक दाखवून खंडणीचा डाव; थेट बार मालकाकडे...
Mumbai : पत्रकार असल्याचा धाक दाखवून खंडणीचा डाव; थेट बार मालकाकडे...
स्वतःचे आमदार सांभाळू शकले नाहीत...; उद्धव ठाकरेंवर फडणवीसांचा निशाणा
Devendra Fadnavis on Uddhav Thackeray; स्वतःचे आमदार सांभाळू शकले नाहीत...; उद्धव ठाकरेंवर देवेंद्र फडणवीसांचा थेट निशाणा
मोठी बातमी! देवेंद्र फडणवीसांची मोहन भागवतांशी भेट; चर्चांना उधाण
मोठी बातमी! देवेंद्र फडणवीसांची मोहन भागवतांशी भेट; चर्चांना उधाण
कोल्हापुरात गोकुळ दूधसंघ निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया पार
Gokul Milk Union Election 2026 : कोल्हापुरात गोकुळ दूधसंघ निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया पार
उद्धव ठाकरेंनी त्यांच्या पक्षातील रेजिम चेंजकडे लक्ष द्यावं...
Navnath Ban : उद्धव ठाकरेंनी त्यांच्या पक्षातील रेजिम चेंजकडे लक्ष द्यावं; नवनाथ बन यांचा ठाकरे-राऊतांवर निशाणा
प्रसिद्ध Maple लॉन अँड रेस्टॉरंटचा अन्न परवाना निलंबित; तपासणीत 96....
Chhatrapati Sambhajinagar : प्रसिद्ध Maple लॉन अँड रेस्टॉरंटचा अन्न परवाना निलंबित; तपासणीत 96 पैकी फक्त....
पुणेकरांची FDA आयुक्त तुकाराम मुंढेंकडे मोठी मागणी; नेमकं काय म्हणाले?
पुणेकरांची FDA आयुक्त तुकाराम मुंढेंकडे मोठी मागणी; नेमकं काय म्हणाले?