वजन कमी करायचं असेल तर 'या' 5 गोष्टी टाळा

वजन कमी करण्यासाठी आरोग्यदायी आहार अत्यंत महत्त्वाचा आहे. त्याचप्रमाणे चुकीचा आहार टाळणे हेही तेवढेच महत्त्वाचे आहे. नव्याने आलेल्या संशोधनानुसार वजन कमी करु इच्छिणाऱ्यांनी खालील 5 गोष्टी टाळणे गरजेचं आहे.

वजन कमी करायचं असेल तर 'या' 5 गोष्टी टाळा

मुंबई : बदलत्या जीवनशैलीचा परिणाम अनेकांच्या वजनावर झालेला आहे. यात कामाचे स्वरुप आणि आहार हे महत्त्वाचे घटक ठरत आहेत. वाढलेले वजन (High Weight) ही अनेकांसाठी मोठी समस्या झाली आहे. त्यांच्यासाठी काही गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. नव्याने झालेल्या संशोधनानुसार (New Research) ज्यांना आपले वजन कमी करायचे आहे, त्यांनी आपल्या दैनंदिन आहाराबाबत अधिक सजग असणं आवश्यक आहे.

वजन कमी करण्यासाठी आरोग्यदायी आहार अत्यंत महत्त्वाचा आहे. त्याचप्रमाणे चुकीचा आहार टाळणे हेही तेवढेच महत्त्वाचे आहे. नव्याने आलेल्या संशोधनानुसार वजन कमी करु इच्छिणाऱ्यांनी खालील 5 गोष्टी टाळणे गरजेचं आहे.

1. मोठ्या प्रमाणात सलाडचा उपयोग

भाजीपाल्यांचं सलाड खाणं हे शरिरासाठी आरोग्यदायी आहे. त्याचा वजन कमी करण्यासाठी देखील उपयोग होतो. मात्र, जास्त प्रमाणात सलाड खाल्ले तर तुम्ही विचार करता त्यापेक्षा अधिक कॅलरी शरिरात जातात. सिजरसाठी (Caesar) वापरल्या जाणाऱ्या क्रिम सलाडमध्ये 20 ग्रॅम पर्यंत फॅट असतात, तर जवळपास 200 च्या आसपास कॅलरीज असतात. अनेक लोक त्यांच्या आहारात सॉस आणि ग्रेव्हीचा उपयोग करतात. मात्र, त्यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात फॅट आणि कॅलरिज असतात.

2. जास्त प्रमाणात गोड पदार्थ खाणे

अनेकजणांना गोड खाण्याची इच्छा असते. मात्र, साखर खायची नाही, म्हणून ते मधासारखे पर्यायी पदार्थ शोधतात. असे लोक साखरेपेक्षा नैसर्गिकरित्या आढळणारे गोड पदार्थ चांगले आहे असं समजतात. मात्र, वास्तवात अशा गोड पदार्थांमध्ये कोणतेही अतिरिक्त पोषणद्रव्ये नसतात. शिवाय कॅलरिजचं प्रमाण देखील कमी नसतं. त्यामुळे साखर खाण्याऐवजी मध किंवा इतर गोड पदार्थ खाल्याने तसा काहीही फरक पडत नाही.

3. अधिक प्रमाणात आरोग्यदायी नाश्त्याचे पदार्थ

कमी फॅट असलेले दही, प्रोटीन बार यांच्यात सॅच्युरेटेड फॅट्स आणि मीठ कमी असते. शिवाय प्रोटीन मुबलक प्रमाणात असतं म्हणून हे आरोग्यदायी मानले जाते. मात्र, नाश्त्यासाठी आरोग्यदायी समजल्या जाणाऱ्या पदार्थांचे अतिसेवन देखील तुमच्या वजनात घट करण्याऐवजी वाढच करू शकते.

खरंतर हे पदार्थ इतर पदार्थांपेक्षा जास्त प्रक्रिया केले असतात. त्यांच्या साखरेचं प्रमाण देखील अधिक असतं. त्यामुळे लठ्ठपणा आणि कर्करोग असे अनेक आरोग्याचे प्रश्न तयार होऊ शकतात.

4. मोठ्या प्रमाणात मद्यसेवन

वाईन, बिअर सारख्या मद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कॅलरीज आढळतात. उदाहरण द्यायचे झाले तर रेड वाईन. सर्वसामान्यपणे रेस्टॉरन्टमध्ये दिली जाणारी रेड वाईन इतर मद्याच्या दिडपट असते. यात 120 कॅलरीज असतात. बिअरच्या एका पेल्यात 150 कॅलरीज असतात.

5. फळांपासून बनवलेले अन्नपदार्थ (शुद्ध फळे नाही)

थेट फळं खाणं हे आपल्या आरोग्यासाठी नक्कीच चांगलं आहे. मात्र, फळांचा उपयोग करुन बनवलेले अनेक पदार्थ आरोग्यासाठी धोकादायक असतात. उदाहरणार्थ बनाना ब्रेड. बनाना ब्रेडमध्ये बनाना फ्लेवर असतो. शिवाय मोठ्या प्रमाणात साखर, फॅट्स आणि कॅलरिज देखील असतात. हे पदार्थ खूप प्रक्रिया केलेले असतात. त्यामुळे ते आरोग्याला धोकाही पोहचवू शकतात.

फळांच्या कृत्रिम पेयांमध्ये केवळ 30 टक्के रस असतो. मात्र, साखरेचं प्रमाण मोठं असतं. त्यामुळे तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर ही पेय टाळा. शिवाय जेवण करताना सावकाश व्यवस्थित चावून खाणे देखील तेवढेच महत्वाचे आहे. त्यामुळे अधिक प्रमाणातील खाणं टाळलं जाईल आणि वजन नियंत्रित राहिल.

नोट : वजन कमी करण्यासाठी वर दिलेले उपाय करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.

संबंधित बातम्या :

धुम्रपानच नाही, तर लठ्ठपणामुळेही कॅन्सर होतो : सर्व्हे

वजन कमी करण्यासाठी किती ग्रीन टी प्यायला हवी?

पोटाचा घेर कमी करण्यासाठी आहारात ‘या’ पदार्थांचा समावेश करा

दररोज नारळ पाणी प्या, व्यायाम न करता 10 किलो वजन घटणार, पाहा कसं?

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *