सफरचंदाचा रस, गुलाब पाणी आणि दह्याचा फेसपॅक चेहऱ्यासाठी अत्यंत फायदेशीर, वाचा!

सुंदर त्वचा पाहिजे असेल तर त्वचेची काळजी घेणे महत्वाचे आहे. चेहऱ्याची काळजी न घेतल्यामुळे पिंपल्स आणि मुरूमाची समस्या निर्माण होऊ शकते.

सफरचंदाचा रस, गुलाब पाणी आणि दह्याचा फेसपॅक चेहऱ्यासाठी अत्यंत फायदेशीर, वाचा!
फेसपॅक
Follow us
| Updated on: Jul 13, 2021 | 8:46 AM

मुंबई : सुंदर त्वचा पाहिजे असेल तर त्वचेची काळजी घेणे महत्वाचे आहे. चेहऱ्याची काळजी न घेतल्यामुळे पिंपल्स आणि मुरूमाची समस्या निर्माण होऊ शकते. त्वचेची काळजी घेतल्याने आपल्या चेहऱ्यावरील अनेक समस्या दूर होण्यास मदत होते. त्वचेची काळजी घेण्यासाठी आपण आपल्या काही सवयींमध्ये थोडा बदल केला पाहिजे. यामुळे त्वचेचा टोन सुधारण्यास मदत होते. (Face pack of apple juice, rose water and curd is beneficial for the skin)

सुंदर चेहऱ्या मिळवण्यासाठी आणि त्वचेचा टोन सुधारण्यासाठी आपण सफरचंदचा रस, गुलाब पाणी आणि दह्याचा फेसपॅक चेहऱ्याला लावला पाहिजे. यामुळे त्वचा सुधारण्यास मदत होते. यासाठी आपण सफरचंदचा रस दोन चमचे, गुलाब पाणी दोन चमचे आणि दही एक चमचा घ्या. सर्वात अगोदर वरील सर्व साहित्य एकत्र मिक्स करा आणि आपल्या संपूर्ण चेहऱ्याला लावा. साधारण वीस मिनिटे ही पेस्ट आपल्या चेहऱ्यावर ठेवा आणि नंतर थंड पाण्याने चेहरा धुवा.

हा फेसपॅक आपण आठ दिवसामधून दोन ते तीन वेळा चेहऱ्याला लावला पाहिजे. अर्धी केळी आणि तीन चमचे कोरफड लागणार आहे. सर्वात अगोदर केळी बारीक करून घ्या आणि त्यामध्ये कोरफड मिक्स करून घ्या. यानंतर ही तयार झालेली पेस्ट चेहऱ्यासह मानेवर लावा. तीस मिनिटे ही पेस्ट चेहऱ्यावर तशीच ठेवा आणि थंड पाण्याने चेहरा धुवा, हा खास फेसपॅक आपण आठवड्यातून तीन ते चार वेळा चेहऱ्यावर लावू शकता.

बटाट्याचा फेसपॅक तयार करण्यासाठी एक बटाटा आणि चार चमचे मध घ्या. सर्वात अगोदर बटाटा किसून घ्या आणि त्यामध्ये मध मिक्स करा. त्यानंतर ही पेस्ट मिक्स करून बारीक करून घ्या. हा फेसपॅक एक तासांसाठी आपल्या चेहऱ्यावर लावा. त्यानंतर चेहरा थंड पाण्याने धुवा. हा फेसपॅक आपण आठ दिवसातून तीन ते चार वेळा लावला पाहिजे. यामुळे चेहऱ्याच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत होते.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Skin Care Tips | लग्न करताय? ना ब्यूटी पार्लर, ना ट्रिटमेंट, ‘या’ घरगुती उपायांनी मिळवा ग्लो!

Study | कोरोनाचा लैंगिक क्षमतेवर परिणाम, पुरुषांना होतोय ‘हा’ आजार

(Face pack of apple juice, rose water and curd is beneficial for the skin)

Non Stop LIVE Update
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा.
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा.
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?.
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण...
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण....
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि...
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि....
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.