Weight loss Tips : वजन वाढलंय मात्र व्यायामाचा कंटाळा येतोय? ‘हे’ खास पेय प्या आणि वजन कमी करा

Weight loss Tips : वजन वाढलंय मात्र व्यायामाचा कंटाळा येतोय? 'हे' खास पेय प्या आणि वजन कमी करा
वाढलेले वजन

कोरोनामुळे अनेक ठिकाणी लाॅकडाऊन लावण्यात आले आहे. यामुळे व्यायाम करण्यासाठी बाहेर जाणे देखील शक्य नाही.

शितल मुंडे, टीव्ही 9 मराठी डिजीटल

| Edited By: अनिश बेंद्रे

May 28, 2021 | 7:00 AM

मुंबई : कोरोनामुळे अनेक ठिकाणी लाॅकडाऊन लावण्यात आले आहे. यामुळे व्यायाम करण्यासाठी बाहेर जाणे देखील शक्य नाही. यामुळे अनेकांची वाढलेले वजन मोठी समस्या बनली आहे. त्यामध्येही अनेकांना वजन कमी करायचे असते. मात्र, सकाळी उठणे शक्य होत नाही. वाढलेले वजन हे अनेक आजारांना निमंत्रणच देत असते. यासाठी आपले वाढलेले वजन कमी करण्यासाठी आज आम्ही तुम्हाला एक खास पेय सांगणार आहोत. ज्यामुळे तुमचे वाढलेले वजन झटपट कमी होईल. (Special tips for losing weight)

वाढलेले वजन कमी करण्यासाठी हे खास पेय तयार करण्यासाठी एक लिंबू, काळी मिरी, मेथी आणि हळद आपल्याला लागणार आहे. यासाठी सर्वात अगोदर एक ग्लास पाणी गरम करण्यासाठी गॅसवर ठेवा. त्यानंतर या पाण्यात काळी मिरी आणि मेथीचे दाणे मिसळा, साधारण हे वीस मिनिटे तसेच ठेवा आणि मग त्यामध्ये हळद आणि लिंबू मिसळा दहा मिनिटे गॅसवर ठेवा. त्यानंतर थोडे कोमट झाल्यावर ते प्या. यामुळे आपल्या शरीरावरील अतिरिक्त चरबी निघून जाण्यास मदत होते.

काळी मिरी खाल्ल्याने आपल्या आरोग्यासाठी अनेक फायदे होतात. यात लोह, पोटॅशियम, मॅग्नेशियम, मॅंगनीज, जस्त, क्रोमियम, व्हिटामिन ए आणि इतर पोषक गुणधर्म आढळतात. याशिवाय यामध्ये रायबोफ्लेविन, थायामिन, पोटॅशियम, सोडियम, फॉलेट, बेटेन आणि नियासिन हे घटक देखील आढळतात. सात ते आठ काळी मिरी घ्या आणि एक ग्लास पाणी घ्या. मंद आचेवर पाणी गरम करायला ठेवा. साधारण वीस ते तीस मिनिटे हे पाणी उकळूद्या. त्यानंतर हे पाणी गरम असतानाच प्या. हे पाणी दररोज पिल्याने आपले वजन कमी होण्यास आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होईल.

हे चयापचय वाढविण्यास तसेच चरबी कमी करण्यासाठी मदत करते. त्यातील पोषकद्रव्ये आपली भूक शांत ठेवतात आणि वजन कमी करण्यास देखील मदत करतात. यामुळे खाद्यपदार्थांमध्ये हिरव्या मिरचीपेक्षा लाल मिरचीचा वापर केला पाहिजे. रोज हळद, लिंबू आणि मध घेतल्याने लठ्ठपणा देखील दूर होण्यास मदत होते. तसेच, त्वचेशी संबंधित समस्यांपासून मुक्तता देखील होते. हळदीमुळे आपल्या शरीरात साखरेची पातळी व्यवस्थित राहते.

संबंधित बातम्या

Skin Care Tips | लग्न करताय? ना ब्यूटी पार्लर, ना ट्रिटमेंट, ‘या’ घरगुती उपायांनी मिळवा ग्लो! :

Study | कोरोनाचा लैंगिक क्षमतेवर परिणाम, पुरुषांना होतोय ‘हा’ आजार

(Special tips for losing weight)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें