AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मध, बदाम आणि नारळ दुधाचा फेसपॅक ‘हा’ फेसपॅक त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर!

सुंदर आणि तजेलदार त्वचा दिसण्यासाठी आपण आठ दिवसातून दोन वेळा मध, बदाम आणि नारळ दुधाचा फेसपॅक वापरला पाहिजे

मध, बदाम आणि नारळ दुधाचा फेसपॅक 'हा' फेसपॅक त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर!
फेसपॅक
| Edited By: Anish Bendre | Updated on: Jul 23, 2021 | 7:38 AM
Share

मुंबई : सुंदर आणि तजेलदार त्वचा दिसण्यासाठी आपण आठ दिवसातून दोन वेळा मध, बदाम आणि नारळाच्या दुधाचा फेसपॅक वापरला पाहिजे. ज्यामुळे आपली त्वचा नैसर्गिकरित्या चमकदार आणि मुलायम होण्यास मदत होईल. विशेष म्हणजे हा पॅक तयार करण्यासाठी आपल्याला जास्त वेळ देखील लागणार नाही. अत्यंत कमी वेळेत हा पॅक आपण घरच्या-घरी तयार करू शकतो. हा फेसपॅक घरी नेमका कसा करायचा हे आज आपण बघणार आहोत. (Face pack of honey, almond and coconut milk is beneficial for the skin)

सहा बदाम घ्या आणि त्यांना रात्रभर पाण्यात भिजवा. दुसर्‍या दिवशी त्यांची बारीक करून पेस्ट तयार करा. एक चमचा बदाम पेस्ट घ्या आणि त्यात एक चमचा नारळाचे दूध आणि मध घाला. नारळाच्या दुधाचा हा फेसपॅक चेहर्‍यावर आणि गळ्यावर लावा. काही मिनिटांसाठी हळूवारपणे आपल्या बोटाने त्वचेवर मालिश करा आणि नंतर ते 20 मिनिटांसाठी त्वचेवर ठेवा. यानंतर साध्या पाण्याने धुवा आणि आठवड्यातून दोनदा नारळाच्या या दुधाचा फेसपॅक वापरा.

हेल्दी त्वचा मिळवण्यासाठी आपण नारळाचे दूध आणि लिंबाचा रस एका वाटीत चांगला मिक्स करून घ्या आणि संपूर्ण चेहऱ्याला लावा. त्यानंतर 20 ते 25 मिनिटे हे आपल्या चेहऱ्यावर तसेच ठेवा आणि त्यानंतर थंड पाण्याने चेहरा धुवा. यामुळे आपली त्वचा हेल्दी आणि चमकदार दिसण्यास मदत होईल. विशेष म्हणजे यामुळे आपल्या चेहऱ्यावरील सुरकुत्या जाण्यास देखील मदत होईल.

बदामांमध्ये आढळणारे व्हिटॅमिन ई त्वचा आणि केस दोन्हीसाठी फायदेशीर आहे. याशिवाय केसांसाठी बदाम तेलही वापरता येते. बदाम पचविणे एवढे सोपे नाही. पण भिजवलेले बदाम सहज पचतात. याव्यतिरिक्त, हे एंजाइमचे उत्पादन वाढवते, जे पाचन तंदुरुस्त ठेवते. बदामामधील मोनोसॅच्युरेटेड फॅट्स भूकेवर नियंत्रण आणतात. यामुळे आपल्याला वारंवार भूक लागत नाही. ज्यामुळे वजन नियंत्रणात राहण्यास मदत मिळते.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Papaya Seeds Benefit | तुम्ही पपईच्या बिया फेकून देताय…? तर थांबा अगोदर हे वाचा!

पायांना सतत दुर्गंध येतोय? मग ‘या’ घरगुती टिप्स ट्राय करा नि समस्येतून मुक्त व्हा!

(Face pack of honey, almond and coconut milk is beneficial for the skin)

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली