Flaxseeds For Hair : केसांवरील नैसर्गिक चमक परत मिळवण्यासाठी ‘हा’ जवसाचा हेअर मास्क ट्राय करा !

| Updated on: Jul 08, 2021 | 1:01 PM

आपल्या सर्वांनाच माहीती आहे की, जवस खाणे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. अनेक रोगांवर जवस गुणकारी आहे.

Flaxseeds For Hair : केसांवरील नैसर्गिक चमक परत मिळवण्यासाठी हा जवसाचा हेअर मास्क ट्राय करा !
जवस
Follow us on

मुंबई : आपल्या सर्वांनाच माहीती आहे की, जवस खाणे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. अनेक रोगांवर जवस गुणकारी आहे. यामुळे दररोजच्या आहारात जवसाचा समावेश केला पाहिजे. मात्र, तुम्हाला हे माहीती आहे का? की, जवस फक्त आरोग्यासाठीच नाहीतर आपल्या केसांसाठी आणि त्वचेसाठी देखील खूप जास्त फायदेशीर आहे.
(Flaxseeds hair mask is beneficial for hair)

जवसमुळे चेहऱ्यावर आणि केसांवर नैसर्गिक चमक येते. जवसाचा हेअर मास्क घरी तयार करण्यासाठी खोबरेल तेलामध्ये दोन चमचे जवस मिक्स करा आणि संपूर्ण केसांना लावा. साधारण वीस मिनिटांसाठी हा हेअर मास्क आपल्या केसांवर ठेवा. त्यानंतर कोमट पाण्याने आपले केस धुवा. जवसचा फेसपॅक तयार करण्यासाठी जवस बारीक करून घ्या आणि त्यामध्ये गुलाब पाणी मिक्स करा.

साधारण दहा मिनिटे हा फेसपॅक आपल्या चेहऱ्यावर तसाच ठेवा आणि नंतर थंड पाण्याने आपला चेहरा धुवा. जवस खाल्ल्याने नैसर्गिक पद्धतीने रक्तदाब कमी होतो. 2015च्या अभ्यासानुसार, ज्यांनी 12 आठवड्यांपर्यंत दररोज जवस खाल्ले होते, त्यांचा रक्तदाब नियंत्रणाखाली होता. या बियांमध्ये मुबलक प्रमाणात पोटॅशियम असते. हे घटक रक्तवाहिनीच्या भिंतीवरील ताण कमी करण्यात मदत करतात आणि रक्तदाब नियंत्रित ठेवतात.

एक चमचा जवसमध्ये 55 कॅलरी असतात. म्हणून जवस वजन कमी करण्यासाठी देखील खूप फायदेशीर आहे. या लहान बियामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते. जे आपली भूक देखील भागवते आणि आरोग्यास निरोगी ठेवण्याचे काम करते. एका अभ्यासानुसार असे म्हटले गेले आहे की, हे वजन कमी करण्यात जवस मदत करते. जवस खाल्ल्याने पचन क्रिया किंवा पित्त कमी करण्यासाठी मदत होते.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा अथवा सौंदर्य तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Skin Care | चेहऱ्यावर चुकूनही लावू नका ‘या’ गोष्टी, अन्यथा होऊ शकते त्वचेचे नुकसान!

(Flaxseeds hair mask is beneficial for hair)