Skin Care | चेहऱ्यावर चुकूनही लावू नका ‘या’ गोष्टी, अन्यथा होऊ शकते त्वचेचे नुकसान!

चेहरा चमकदार करण्यासाठी आपण अनेक प्रयत्न करतो. परंतु, कधीकधी ते प्रयोग करणे आपल्याला खूप महागात पडते आणि चेहऱ्याचे सौंदर्य सुधारण्याऐवजी आणखी खराब होते.

Skin Care | चेहऱ्यावर चुकूनही लावू नका ‘या’ गोष्टी, अन्यथा होऊ शकते त्वचेचे नुकसान!
स्कीन केअर

मुंबई : चेहरा चमकदार आणि उजळ करण्यासाठी आपण अनेक मार्गांनी प्रयत्न करतो. परंतु, कधीकधी ते प्रयोग करणे आपल्याला खूप महागात पडते आणि चेहऱ्याचे सौंदर्य सुधारण्याऐवजी आणखी खराब होते. चला तर, अशा काही गोष्टींबद्दल जाणून घेऊया, ज्या थेट चेहऱ्यावर वापरल्यास तुमची त्वचा खराब होईल आणि त्वचेचा रंग सुधारण्याऐवजी ती आणखी गडद दिसू लागेल…(Skin Care tips Do not apply these things on face)

लिंबू

काही लोक लिंबाच्या सालाने थेट चेहऱ्यावर मसाज करतात किंवा थेट चेहऱ्यावर लिंबाचा रस लावतात. लिंबाचा वापर थेट त्वचेवर कधीच करू नये. यामुळे चेहऱ्याच्या सौंदर्यावर फरक पडतो आणि त्वचेचा रंग देखील गडद होऊ लागतो.

गरम पाणी

काही लोकांना गरम पाण्याने चेहरा धुण्याची सवय असते. गरम पाण्याने तोंड धुतल्याने त्वचेतील ओलावा निघून जातो आणि चेहऱ्यावर कोरडेपणा येतो. म्हणून गरम पाण्याने तोंड धुण्याऐवजी चेहऱ्यावर स्टीम घेणे अधिक चांगले.

टूथपेस्ट

चेहऱ्यावर मुरुम किंवा पिटकुळ्या दिसतात, तेव्हा बहुते लोक यावर टूथपेस्ट लावतात. टूथपेस्टमुळे मुरुमांच्या ठिकाणी काळे डाग येऊ शकतात.

वॅक्सिंग

चेहऱ्यावर वॅक्सिंग करणे देखील टाळावे. चेहऱ्याची त्वचा खूप मऊ असते. यामुळे चेहऱ्याचे नुकसान देखील होऊ शकते (Skin Care tips Do not apply these things on face).

‘या’ गोष्टींचा वापर करून चेहऱ्यावर चमक आणण्यासाठी प्रयत्न करा!

– दररोज कच्च्या दुधाने चेहरा स्वच्छ केल्यास रंग उजळ होतो, तसेच त्वचा चमकदार होते.

– बेदाणे अर्थात चारोळी देखील त्वचेसाठी खूप चांगली मानली जाते. त्यासाठी चारोळी रात्रभर पाण्यात भिजवा. सकाळी तिची पेस्ट करून, दुधात मिसळा आणि चेहऱ्यावर लावा. काही दिवसातच चेहऱ्यावर चमक येण्यास सुरूवात होईल.

– संत्र्याची साले कडक उन्हात वळवून त्याची बारीक पावडर करा. या पावडरमध्ये दूध आणि मध मिसळा. ही पेस्ट चेहऱ्यावर लावा. यामुळे त्वचा चमकदार होईलच आणि त्वचेच्या समस्या देखील कमी होतील.

– दुधाची साय आणि बेसन देखील चेहरा चमकदार बनवण्याचा जुना फॉर्म्युला आहे. याचा नियमित वापर केल्याने त्वचेची गुणवत्ता सुधारते आणि त्वचेचा रंग देखील हलका होतो.

– दूधामध्ये मसूर डाळ, चंदन पावडर आणि संत्र्याचं साल रात्रभर भिजवा. दुसऱ्या दिवशी सकाळी हे सर्व घटक वाटून घट्ट पेस्ट तयार करा. ही पेस्ट चेहऱ्यावर लावा आणि सुकू द्या. 20 मिनिटानंतर सर्क्युलर मोशनमध्ये हळूवार ते स्वच्छ करा. नंतर थंड पाण्याने चेहरा धुवा. यामुळे तुमची त्वचा उजळेल आणि सोबतच चेहऱ्यावरील अनावश्यक केसही दूर करेल.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

(Skin Care tips Do not apply these things on face)

हेही वाचा :

Skin Care | मसूर डाळीच्या फेसपॅकने उजळेल चेहऱ्याचे सौंदर्य, वाचा या फेसपॅकचे फायदे…

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI