Skin | या कोलेजनयुक्त पदार्थांचा आहारात समावेश करा आणि त्वचेवर नैसर्गिक चमक मिळवा!

| Updated on: May 23, 2022 | 8:29 AM

टोमॅटो हा आपल्या किचनमधील महत्वाचा घटक आहे. भाजी असो किंवा वरण टोमॅटो लागते म्हणजे लागतेच. टोमॅटो खाणे जसे आपल्या आरोग्यासाठी आवश्यक आहे. तसेच ते आपल्या त्वचेसाठी देखील फायदेशीर आहे. टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते, त्यामुळे त्वचा निरोगी राहते. टोमॅटोमध्ये लाइकोपीन असते. हे हानिकारक अतिनील किरणांपासून त्वचेचे संरक्षण करते.

Skin | या कोलेजनयुक्त पदार्थांचा आहारात समावेश करा आणि त्वचेवर नैसर्गिक चमक मिळवा!
Image Credit source: medicinenet.com
Follow us on

मुंबई : त्वचेची (Skin) काळजी बाराही महिने घेणे खूप महत्वाचे आहे. कारण त्वचेची काळजी घेतली नाही तर त्वचेच्या अनेक गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात. विशेष: उन्हाळ्याच्या हंगामामध्ये त्वचेवर विशेष लक्ष द्यावे लागते. या हंगामात त्वचेवर टॅन (Tan) जमा होऊ अनेक समस्या निर्माण होतात. टॅनमुळे चेहऱ्यावर मुरूम येण्याची दाट शक्यता असते. यामुळे त्वचा कोरडी होण्यास सुरूवात होते. परिणामी त्वचेचे तेज निघून जाते. सनबर्न आणि टॅनिंगमुळे त्वचेची सर्व चमक नाहीशी होते. चमकदार त्वचेसाठी तुम्ही अनेक प्रकारच्या आरोग्यदायी पदार्थांचा आहारात समावेश करू शकता. हे पदार्थ त्वचेला खोलवर पोषण देण्याचे काम करतात. शरीरात कोलेजन (Collagen) प्रोटीन असणे अत्यंत आवश्यक आहे. या प्रोटीनमुळे त्वचा निरोगी राहण्यास मदत होते. हे आरोग्यदायी पदार्थ नेमके कोणते जे आपली त्वचा तजेलदार ठेवण्यास मदत करतात, याबद्दल सविस्तरपणे जाणून घेऊयात.

टोमॅटो

टोमॅटो हा आपल्या किचनमधील महत्वाचा घटक आहे. भाजी असो किंवा वरण टोमॅटो लागते म्हणजे लागतेच. टोमॅटो खाणे जसे आपल्या आरोग्यासाठी आवश्यक आहे. तसेच ते आपल्या त्वचेसाठी देखील फायदेशीर आहे. टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते, त्यामुळे त्वचा निरोगी राहते. टोमॅटोमध्ये लाइकोपीन असते. हे हानिकारक अतिनील किरणांपासून त्वचेचे संरक्षण करते. हे पिगमेंटेशन, सुरकुत्या आणि बारीक रेषा कमी करते.

हे सुद्धा वाचा

आवळा

आपल्या सर्वांनाच माहिती आहे की, आवळा खाणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. आवळ्याच्या सेवनाने आपण त्वचेच्या अनेक समस्या दूर करू शकतो. आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी मोठ्या प्रमाणात असते. याशिवाय संत्री आणि लिंबू सारख्या पदार्थांचा समावेश आहे. आवळ्यामध्ये अँटिऑक्सिडंट गुणधर्म असतात. ते मुक्त रॅडिकल्समुळे होणाऱ्या नुकसानापासून संरक्षण करतात. यामुळे त्वचा निरोगी आणि चमकदार राहते.

सब्जा

सब्जा आपल्या आरोग्यासाठी खूप जास्त फायदेशीर आहे. ज्या लोकांना मुळव्याधाचा त्रास होतो, त्यांनी सब्जाचे सेवन केले तर काही दिवसांमध्येच त्यांचा मुळव्याधाचा त्रास दूर होतो. तसेच सब्जा हा आपल्या त्वचेसाठी देखील खूप जास्त फायदेशीर आहे. सब्जाच्या बियांमध्ये ओमेगा 3 फॅटी अॅसिड मोठ्या प्रमाणात असते. ते शरीरातील कोलेजनचे प्रमाण वाढवण्याचे काम करतात. हे त्वचेसाठी खूप फायदेशीर असतात. यामुळे हंगाम कोणताही असो सब्जाचे सेवन केलेच पाहिजे. काही लोक फक्त उन्हाळ्यामध्येच सब्जाचे सेवन करतात.