AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Skin Care : त्वचेच्या अनेक समस्या दूर करण्यासाठी ‘जोजोबा तेल’ अत्यंत गुणकारी, वाचा!

जोजोबा तेल त्वचेला पोषण देते. त्यात व्हिटॅमिन ई, बी, अँटीऑक्सिडेंट गुणधर्म आणि खनिजे असतात. जोजोबा तेलात अँटीफंगल आणि अँटीमाइक्रोबियल असते.

Skin Care : त्वचेच्या अनेक समस्या दूर करण्यासाठी 'जोजोबा तेल' अत्यंत गुणकारी, वाचा!
जोजोबा तेल त्वचेसाठी फायदेशीर
| Edited By: Anish Bendre | Updated on: Jul 22, 2021 | 7:50 AM
Share

मुंबई : जोजोबा तेल त्वचेला पोषण देते. त्यात व्हिटॅमिन ई, बी, अँटीऑक्सिडेंट गुणधर्म आणि खनिजे असतात. जोजोबा तेलात अँटीफंगल आणि अँटीमाइक्रोबियल असते. त्वचेशी संबंधित अनेक समस्या दूर ठेवण्यास हे मदत करते. हे मुरुमांवर नियंत्रण ठेवते आणि डाग दूर ठेवण्यास मदत करते. बर्‍याच अभ्यासानुसार आपल्या त्वचेची काळजी घेण्याव्यतिरिक्त ते मुरुमांना बरे करण्यास देखील मदत करते. हे त्वचेला ओलावा देते. (Jojoba oil is beneficial for beautiful skin)

-दोन चमचे एलोवेरा जेल आणि दोन चमचे जोजोबा तेल घ्या. दोन्ही एका काचेच्या भांड्यात घाला आणि चांगले मिक्स करा. हे मिश्रण मॉइश्चरायझर म्हणून वापरा. ते आपल्या चेहऱ्यावर लावा आणि एक मिनिट मालिश करा. आपण दिवसा कधीही हे वापरु शकता.

-आपण आपल्या त्वचेच्या क्रीम किंवा जेलमध्ये जोजोबा तेल मिक्स करू शकता आणि आपल्या चेहऱ्यावर लावू शकता. दररोज रात्री झोपण्याच्या अगोदर चेहऱ्याला जोजोबा तेल लावा आणि काही वेळ मालिश करा. यामुळे त्वचा चांगली होते.

-आपण थेट चेहऱ्यावर जोजोबा तेल देखील लावू शकता. जोजोबा तेलाचे काही थेंब घ्या आणि ते आपल्या चेहऱ्यावर आणि मानेवर लावा. एक किंवा दोन मिनिटांसाठी हलके हातांनी मालिश करा. चेहरा धुला, रात्रभर सोडू नका.

-घरच्या घरी ‘ब्युटी ऑईल’ तयार करण्यासाठी नारळाचे तेल आणि जोजोबा तेल एका वाटीत घेऊन, त्यात लेव्हेंडर आणि लिंबाच्या इसेन्सचे काही थेंब टाकून ते व्यवस्थित मिक्स करून घ्या. आपण आपल्या त्वचेच्या पोत लक्षात घेऊन, हे तेल वापरू शकता.

-केसांच्या वाढीसाठी जोजोबा तेल महत्वाचे आहे. हे आपले केस चमकदार ठेवण्यास मदत करते. केस गळतीच्या समस्येने आपण त्रस्त असाल तर जोजोबा तेल वापरा. केसांच्या टाळूवर जास्त प्रमाणात सेबममुळे केस गळण्यास सुरवात होते. आपले केस निरोगी आणि मऊ ठेवण्यासाठी जोजोबा तेलाने आपल्या टाळूची मालिश करा. हा सर्वात सोपा आणि नैसर्गिक मार्ग आहे.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Papaya Seeds Benefit | तुम्ही पपईच्या बिया फेकून देताय…? तर थांबा अगोदर हे वाचा!

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

(Jojoba oil is beneficial for beautiful skin)

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...