AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Skin Care : या घटकांसह घरीच नैसर्गिक ब्लीच बनवा आणि उन्हाळ्यातही तजेलदार त्वचा मिळवा!

उन्हाळ्यामध्ये (Summer) सूर्यकिरण आणि प्रदूषणामुळे आपल्या त्वचेची चांगलीच वाट लागते. त्वचा चांगली करण्यासाठी अनेकजण बाहेरील उत्पादने वापरतात. मात्र, त्यामुळे आपली त्वचा (Skin) अधिक खराब होण्याची शक्यता देखील असते. मग अशावेळी आपण घरगुती उपाय नक्कीच करायला हवेत.

Skin Care : या घटकांसह घरीच नैसर्गिक ब्लीच बनवा आणि उन्हाळ्यातही तजेलदार त्वचा मिळवा!
त्वचेची काळजी घेण्यासाठी या टिप्स फाॅलो करा. Image Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Apr 09, 2022 | 1:08 PM
Share

मुंबई : उन्हाळ्यामध्ये (Summer) सूर्यकिरण आणि प्रदूषणामुळे आपल्या त्वचेची चांगलीच वाट लागते. त्वचा चांगली करण्यासाठी अनेकजण बाहेरील उत्पादने वापरतात. मात्र, त्यामुळे आपली त्वचा (Skin) अधिक खराब होण्याची शक्यता देखील असते. मग अशावेळी आपण घरगुती उपाय नक्कीच करायला हवेत. कारण घरगुती उपाय केल्याने त्वचा सुंदर होण्यास आणि त्वचेच्या समस्या दूर होण्यास मदत होते. आपण घरगुती साहित्याच्या मदतीने छान ब्लीच घरी तयार करू शकतो. या ब्लीचमुळे (Bleach) त्वचेच्या समस्या दूर होण्यास मदत होते.

मध आणि लिंबू

लिंबूमध्ये असलेले ऍसिड त्वचेवर ब्लीचसारखे काम करते. ब्लीच बनवण्यासाठी एका भांड्यात लिंबाचा रस घ्या आणि त्यात एक चमचा मध घाला. सुमारे 10 मिनिटे चेहऱ्यावर ठेवा आणि नंतर कोमट पाण्याने काढून टाका. आठवड्यातून दोन ते तीन वेळा असे केल्याने तुम्हाला चांगले परिणाम दिसून येतील. मात्र, ब्लीच केल्यानंतर उन्हामध्ये जाणे टाळाच.

मसूर डाळ आणि दूध

तज्ज्ञांच्या मते, मसूरमध्ये आढळणारे पोषक नैसर्गिक ब्लीचचे काम करतात. मसूर डाळीचे ब्लीच घरच्या घरी तयार करण्यासाठी एक वाटी मसूर डाळ घ्या आणि रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवा. त्यानंतर त्याची चांगली पेस्ट तयार करून घ्या. त्यात तीन चमचे दूध घाला. ही पेस्ट चेहऱ्यावर लावून कोरडी होऊ द्या. सामान्य पाण्याने चेहरा धुवा.

दही आणि बेसन

दही आपल्या आरोग्यापासून ते आपल्या त्वचेपर्यंत खूप जास्त फायदेशीर आहे. तसेच बेसन देखील त्वचेच्या अनेक समस्या दूर करण्यासाठी प्रभावी आहे. बेसन आणि दह्याचे ब्लीच आपल्या त्वचेसाठी फायदेशीर आहे. यासाठी दोन चमचे बेसनमध्ये तीन ते चार चमचे दही मिक्स करावे. त्यानंतर याची चांगली पेस्ट तयार करून आपल्या संपूर्ण चेहऱ्यावर लावा. यामुळे त्वचेच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत होते.

(वरील टिप्स फाॅलो करण्याच्या अगोदर डाॅक्टरांचा सल्ला नक्की घ्या)

संबंधित बातम्या : 

Skin Care : उन्हाळ्यात त्वचेची काळजी घेण्यासाठी या कोरियन टिप्स फाॅलो करा आणि सुंदर त्वचा मिळवा!

Skin care : उन्हाळ्याच्या हंगामात त्वचेवरील तेज टिकवण्यासाठी या खास टिप्स फाॅलो करा!

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली