Skin care : चमकदार त्वचेसाठी पपईचे ‘हे’ 3 फेसपॅक नक्की ट्राय करा!

उन्हाळ्यात त्वचेची काळजी घेणे थोडे अवघड असते. या हंगामात त्वचेच्या समस्या वाढतात. उष्णतेमुळे चेहरा कोरडा आणि निर्जीव दिसतो. जर तुमची त्वचा तेलकट असेल तर मुरुमाची समस्या वाढते.

Skin care : चमकदार त्वचेसाठी पपईचे 'हे' 3 फेसपॅक नक्की ट्राय करा!
पपईचा फेसपॅक
Follow us
| Updated on: Jun 19, 2021 | 11:33 AM

मुंबई : उन्हाळ्यात त्वचेची काळजी घेणे थोडे अवघड असते. या हंगामात त्वचेच्या समस्या वाढतात. उष्णतेमुळे चेहरा कोरडा आणि निर्जीव दिसतो. जर तुमची त्वचा तेलकट असेल तर मुरुमाची समस्या वाढते. यामुळे या हंगामात आपल्या त्वचेची विशेष काळजी घ्यावे लागते. त्वचेची काळजी घेण्यासाठी आपण काही घरगुती उपाय देखील करू शकतो. त्वचा निर्जीव होत असेल तर आपण पपईचा फेसपॅक लावू शकतो. पपई अँटीऑक्सिडेंट्स, जीवनसत्त्वे आणि पोटॅशियम समृद्ध आहे. (This 3 face pack of papaya is beneficial for glowing skin)

सुंदर त्वचा

साहित्य :

3 चमचा पपईचा लगदा

2 चमचा ओट्स

कृती

या दोन गोष्टी चांगल्या प्रकारे मिसळा आणि जाड पेस्ट तयार करा. हा फेसपॅक चेहरा आणि मानेवर लावा. ही पेस्ट चेहऱ्याला लावल्यानंतर हलक्या हाताने मालिश करा. यामुळे तुमची मृत त्वचा निघून जाते. ही पेस्ट 20 मिनिटे ठेवा आणि नंतर कोमट पाण्याने धुवा.

मुरुमासाठी फायदेशीर

साहित्य :

2 चमचा पपईचा लगदा

1 चमचा कोरफड जेल

अर्धा चमचे मध

कृती

या तीन गोष्टी चांगल्या प्रकारे मिसळून पेस्ट बनवा. ही पेस्ट आपल्या चेहऱ्यावर 20 मिनिटे ठेवा आणि पाण्याने चेहरा धुवा.

चमकत्या त्वचेसाठी

साहित्य

3 चमचे पपईचा लगदा

1 चमचा दही

1 चमचे नारळाचे पाणी

कृती

या तीन गोष्टी चांगल्या प्रकारे मिसळून पेस्ट बनवून चेहऱ्यावर लावा. साधारण 20 मिनिटे चेहऱ्यावर ही पेस्ट ठेवा आणि नंतर कोमट पाण्याने चेहरा धुवा.

पपईचे इतर फायदे 

पपईमध्ये व्हिटामिन ए, आणि व्हिटामिन सी असतं. हे तत्व त्वचेची टॅनिंग कमी करण्यात मदत करतात. पपईमध्ये पपाइन प्रथिने असतात. केसांची वाढ होण्यात याचा उपयोग होतो. यामुळे केस गळण्याची समस्याही संपते. पपईमध्ये खोबरे तेल किंवा व्हिनेगर मिक्स करुन डोक्यावर लावल्यास डोक्यातील कोंडाची समस्या दूर होते. चेहऱ्यावर ग्लो येण्यासाठी तुम्ही पपईचा फेसपॅकही लावू शकता. पपई अँटी-एजिंगच्या समस्येवर मात करण्यास मदत करते.

(टीप : कोणताही उपचार करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Skin Care | नितळ-निरोगी त्वचेसाठी दररोज वापरा ‘ब्युटी ऑईल’, जाणून घ्या याचे फायदे…

Milk Testing : सावधान! घट्ट दिसण्यासाठी दुधात मिसळले जातायत ‘हे’ घटक, अशी तपासा दुधाची शुद्धता

(This 3 face pack of papaya is beneficial for glowing skin)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.