चेहऱ्यावरील नको असलेले केस काढण्यासाठी हे 4 सोपे आणि घरगुती उपाय फायदेशीर! 

| Updated on: Dec 06, 2021 | 6:00 AM

मृत त्वचेच्या पेशी, काळे डाग आणि चेहऱ्यावरील नको असलेले केस ही सर्व कारणे तुमच्या त्वचेची चमक कमी करतात. चेहऱ्याचे केस खडबडीत असतात आणि जास्त वेगाने वाढतात. यामुळे चेहऱ्यावरील केसांमुळे अनेकजण त्रस्त असतात.

चेहऱ्यावरील नको असलेले केस काढण्यासाठी हे 4 सोपे आणि घरगुती उपाय फायदेशीर! 
चेहऱ्यावरील नको असलेले केस
Follow us on

मुंबई : मृत त्वचेच्या पेशी, काळे डाग आणि चेहऱ्यावरील नको असलेले केस ही सर्व कारणे तुमच्या त्वचेची चमक कमी करतात. चेहऱ्याचे केस खडबडीत असतात आणि जास्त वेगाने वाढतात. यामुळे चेहऱ्यावरील केसांमुळे अनेकजण त्रस्त असतात. चेहऱ्यावरील केस काढण्यासाठी आपण नेहमी घरगुती उपाय केले पाहिजेत.

पपई आणि हळद

पपईमध्ये पॅपेन नावाचा घटक असतो. जो चेहऱ्यावरील केस काढण्यास मदत करतो आणि हळद त्वचेला निरोगी आणि चमकदार बनवते. पपईची बारीक पेस्ट करून घ्या आणि त्यामध्ये हळद मिक्स करा. ही पेस्ट आपल्या चेहऱ्याला लावा. काही मिनिटे मालिश करा आणि चेहरा थंड पाण्याने धुवा.

लिंबाचा रस आणि साखर

चेहऱ्यावरील नको असलेले केस काढण्यासाठी साखर आणि लिंबाचाही वापर करता येतो. पेस्ट बनवण्यासाठी एका भांड्यात साखर, लिंबाचा रस आणि थोडे पाणी मिसळा. चिकट पेस्ट होईपर्यंत ते थंड किंवा किंचित गरम केले जाऊ शकते. चेहऱ्यावरील नको असलेल्या केसांवर ही पेस्ट लावा.  10-15 मिनिटे राहू द्या. त्यानंतर कोमट पाण्याने चांगले धुवा.

मध आणि हळद

चेहऱ्यावरील नको असलेले केस काढण्यासाठी आपण एक खास पेस्ट घरी तयार करू शकतो. ज्यामुळे चेहऱ्यावरील केस जाण्यास मदत होईल. यासाठी आपल्याला मध, हळद आणि मोहरीचे तेल लागणार आहे. सर्वात अगोदर हे सर्व घटक मिक्स करून घ्या आणि त्याची चांगली पेस्ट तयार करा. ही पेस्ट नको असलेल्या केसांवर वीस मिनिटे ठेवा आणि मालिश करा.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Papaya Seeds Benefit | तुम्ही पपईच्या बिया फेकून देताय…? तर थांबा अगोदर हे वाचा!

Side Effect | केसांना ब्लीच करताय? सावधान…. वाचा काय परिणाम होऊ शकतो