Side Effect | केसांना ब्लीच करताय? सावधान…. वाचा काय परिणाम होऊ शकतो

सुंदर दिसण्यासाठी महिला नेहमीच मेकअप आणि वेगवगळ्या हेअरस्टाईल करताना दिसतात. त्यामध्ये काही वर्षांपासून केस लाल, गोल्डन, सिल्वर असे करण्याची फॅशन निघाली आहे.

Side Effect | केसांना ब्लीच करताय? सावधान.... वाचा काय परिणाम होऊ शकतो
Follow us
| Updated on: Jan 23, 2021 | 12:06 PM

मुंबई : सुंदर दिसण्यासाठी महिला नेहमीच मेकअप आणि वेगवगळ्या हेअरस्टाईल करताना दिसतात. त्यामध्ये काही वर्षांपासून केस लाल, गोल्डन, सिल्वर असे करण्याची फॅशन निघाली आहे. त्यामध्ये काही महिला पार्लरमध्ये जातात तर काहीजण घरीच केसांना कलर करतात. त्यामध्ये केसांना कलर देताना अनेक वेळा ब्लीच वापरले जाते. मात्र, ब्लीचने कलर केल्याने केस खरोखर चांगले राहतात की, त्याचे काही दुष्पपरिणाम होतात हे आपण बघणार आहोत. ब्लीच करून आपले केस काही दिवस सुंदर दिसतात परंतु काही काळानंतर त्याचे दुष्परिणाम दिसू लागतात. (Dangerous to bleach hair)

केसांचे नुकसान आपण एकदा जरी केसांना ब्लीच केले तर केस खराब होण्याचा धोका वाढतो. जास्त तेल, वारा आणि सूर्यकिरणांमुळे आपले केस निर्जीव व कोरडे पडतात. याशिवाय केस गळणे, दोन तोंडाचे केस या समस्या निर्माण होतात आणि आपल्या केसांची वाढ कमी होते.

देखभाल आवश्यक आपण केसांना ब्लीच करत असाल तर ते टिकवून ठेवण्यासाठी तुम्हाला महागडे शाम्पू आणि कंडिशनर वापरावी लागतील. आणि जर आपण हे करत नसाल तर आपले केस खराब होतील. त्यामुळे जर तुम्ही केसांना ब्लीच करत असातर अगोदर या सर्व गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे.

केसांतील कोंड्याची समस्या कमी करण्यासाठी, बाजारात मिळणारे अँटी-डँड्रफ शॅम्पू वापरू शकता. तसेच, या समस्येवर उपचार म्हणून अनेक प्रकारची केसांची उत्पादने बाजारात सध्या उपलब्ध आहेत. या गोष्टी करुनही कोंड्याची समस्या दूर होत नसेल तर, आम्ही तुम्हाला काही घरगुती उपचार सांगणार आहोत. ज्याचा उपयोग करून तुम्ही या समस्येपासून मुक्त होऊ शकता.

मेथी दाणे एक पूर्ण दिवस पाण्यात भिजवत ठेवा. दुसर्‍या दिवशी पेस्ट तयार करुन त्यामध्ये दही मिसळा. हा उपाय डँड्रफच्या समस्येवर खूप गुणकारी ठरतो. आले देखील कोंड्याची समस्या दूर करण्यात मदत करते. यासाठी प्रथम आल्याची पेस्ट बनवा. या पेस्टमध्ये पाणी घाला आणि चांगले मिक्स करा. नंतर पाणी गाळा आणि वेगळे करा. आता या पाण्यात तीळाचे तेल घाला. हे मिश्रण आपल्या केसांच्या मुळांवर व्यवस्थित लावा. आठवड्यातून किमान दोनदा हा उपाय करा. यामुळे केसांतील कोंड्याबरोबर डोक्यातील खाज येण्याची समस्या देखील दूर होईल

संबंधित बातम्या : 

Skin Care | नितळ-निरोगी त्वचेसाठी दररोज वापरा ‘ब्युटी ऑईल’, जाणून घ्या याचे फायदे…

कांद्याच्या सालीला कचरा समजताय? थांबा, आधी याचे फायदे जाणून घ्या…

(Dangerous to bleach hair)

Non Stop LIVE Update
दोन मुडदे पडलेत आणि आरोपीला पिझ्झा-बर्गर, पुणे अपघातावर राऊत आक्रमक
दोन मुडदे पडलेत आणि आरोपीला पिझ्झा-बर्गर, पुणे अपघातावर राऊत आक्रमक.
कपिल पाटलांकडून निवडणूक आणि पोलीस अधिकाऱ्यांना शिवीगाळ? नेमकं काय घडल?
कपिल पाटलांकडून निवडणूक आणि पोलीस अधिकाऱ्यांना शिवीगाळ? नेमकं काय घडल?.
पोलिसांवर दबाव? पुणे अपघात प्रकरणी पुणे पोलीस आयुक्त काय म्हणाले?
पोलिसांवर दबाव? पुणे अपघात प्रकरणी पुणे पोलीस आयुक्त काय म्हणाले?.
ठाकरे कुटुंब लंडनला पळून जाण्याच्या तयारीत, भाजप नेत्याचं वक्तव्य
ठाकरे कुटुंब लंडनला पळून जाण्याच्या तयारीत, भाजप नेत्याचं वक्तव्य.
या जिल्ह्यातील विद्यार्थीन 12 वीत पटकावले 100 %; सांगितला फ्युचर प्लॅन
या जिल्ह्यातील विद्यार्थीन 12 वीत पटकावले 100 %; सांगितला फ्युचर प्लॅन.
संजय शिरसाट म्हणाले, कितीही मोठ्या बापाचा माजलेला लेक असला तरीही…
संजय शिरसाट म्हणाले, कितीही मोठ्या बापाचा माजलेला लेक असला तरीही….
बच्चू कडूंचे सचिन तेंडुलकरला 'हे' 2 पर्याय अन् घरासमोर आंदोलनाचा इशारा
बच्चू कडूंचे सचिन तेंडुलकरला 'हे' 2 पर्याय अन् घरासमोर आंदोलनाचा इशारा.
पिसारा फुलवणाऱ्या मोरासोबत सेल्फी काढलाय? व्हिडीओ बघा, तुम्ही म्हणाल..
पिसारा फुलवणाऱ्या मोरासोबत सेल्फी काढलाय? व्हिडीओ बघा, तुम्ही म्हणाल...
EVM हॅकचा प्रयत्न फसला म्हणून... संजय राऊतांचा भाजपसह आयोगावर हल्लाबोल
EVM हॅकचा प्रयत्न फसला म्हणून... संजय राऊतांचा भाजपसह आयोगावर हल्लाबोल.
झाले Election जपा Relation, मतदान संपताच बॅनरबाजी; ठाण्यात एकच चर्चा
झाले Election जपा Relation, मतदान संपताच बॅनरबाजी; ठाण्यात एकच चर्चा.