मेकअप आर्टिस्टला ड्रग्ज विकताना रंगेहाथ पकडले, ‘बीटाऊन’मध्ये अनेकांची नावं समोर येण्याची शक्यता

मेकअप आर्टिस्टला ड्रग्ज विकताना रंगेहाथ पकडले, 'बीटाऊन'मध्ये अनेकांची नावं समोर येण्याची शक्यता

मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने असिस्टंट मेकअप आर्टिस्ट म्हणून काम करणाऱ्या एकाला ड्रग्स विकताना पकडले आहे. (Mumbai Police has arrested a man working as an assistant makeup artist while selling drugs)

prajwal dhage

|

Oct 03, 2020 | 8:49 PM

मुंबई : सुशांतच्या मृत्यूनंतर ड्रग्ज सेवनाचा मुद्दा समोर आल्यानंतर अनेकांची नावं समोर येत आहेत. अशातच असिस्टंट मेकअप आर्टिस्ट (makeup artist) म्हणून काम करणाऱ्या एकाला ड्रग्स विकताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. निखील सुरेश जाधव (30 ) असे या आरोपीचे नाव असून कित्येक वर्षांपासून तो बॉलिवूडमध्ये काम करत असल्याचं समोर आलंय. (Mumbai Police has arrested a man working as an assistant makeup artist while selling drugs)

ड्रग्ज सेवनाप्रकरणी दीपिका पादुकोन, सारा खान, श्रद्धा कपूर यांची नावं समोर आल्यानंतर ड्रग्ज तस्कर तसेच सेवन करणाऱ्यांचं मोठं जाळं ‘बीटाऊनमध्ये’ पसरलं असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अमली पदार्थविरोधी पथक(NCB) प्रकरणाच्या खोलाशी जाऊन त्याची पाळमुळं शोधत आहे. तसेच मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनेसुद्धा ड्रग्जविरोधात समांतर पद्धतीने तपास सुरु केलाय. मुंबई पोलिसांनी असिस्टंट मेकअप आर्टिस्ट म्हणून काम करणाऱ्या ड्रग्ज तस्कराला रंगेहाथ पकडले आहे. मुंबई गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अकबर पठाण यांच्या नेतृत्वाखाली युनिट 11 शाखेने ही कारवाई केली. निखील सुरेश जाधव (30) असे या ड्रग्ज तस्कराचे नाव आहे. मागील कित्येक वर्षांपासून तो ड्रग्ज विकत असल्याचा अंदाज आहे. त्यामुळे बॉलिवूडमधली काही बडी नावं ड्रग्ज कनेक्शनमध्ये सहभागी असल्याची शक्यता वर्तविली जात आहे.

आरोपी निखील जाधव बड्या सेलिब्रिटींच्या संपर्कात असल्याची शक्यता

आरोपी निखील जाधव अनेक सेलिब्रिटींच्या संपर्कात असल्याचे सांगण्यात येत आहे. तो कोणाला ड्रग्ज पुरवत होता का? तो कुणाच्या संपर्कात आहे का? याचीही चौकशी गुन्हे शाखा करणार आहे. आरोपीने आतापर्यंत दिलेल्या माहितीनुसार मागील कित्येक वर्षांपासून तो बॉलिवूडमध्ये काम करतोय. त्याचा सहकारी परवेझ हनिफ हलाई (30) हासुद्धा ड्रग्जची तस्करी करायचा. त्यालादेखील पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. युनिट 11 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील माने यांनी त्यांच्या पथकासह ही कारवाई केली. अटक आरोपीकडून पोलिसांनी 5 लाखांपेक्षा जास्त किमतीचे एमडी (मैफिड्रीन) नावाचे ड्रगही जप्त केले आहे.

दरम्यान, दीपिका पादुकोन, सारा अली खान, श्रद्धा कपूर यांची नावं ड्रग्ज सेवन केल्याप्रकरणी समोर आल्यानंतर संपूर्ण ‘बी टाऊन’ हादरलेले आहे. अमली पदार्थविरोधी पथकाने त्यांची नुकतीच चौकशी केली. त्यांचे जबाबही नोंदवण्यात आले.

संबंधित बातम्या :

Drug Case | बॉलिवूड ड्रग्ज कनेक्शन प्रकरणात आणखी तीन कलाकरांचा पेडलरशी संपर्क

बॉलिवूड ड्रग्ज कनेक्शन, ‘क्वीन’चा निर्माता मधु मांटेनाला एनसीबीचा समन्स

बॉलिवूड ड्रग्ज प्रकरण : एकीकडे जामीनाची गडबड, दुसरीकडे आरोपींची धरपकड, NCB च्या गळाला बडा मासा

(Mumbai Police has arrested a man working as an assistant makeup artist while selling drugs)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें