बॉलिवूड ड्रग्ज कनेक्शन, ‘क्वीन’चा निर्माता मधु मांटेनाला एनसीबीचा समन्स

अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी तपास सुरु असताना रोज नवनवे खुलासे होत आहेत. या प्रकरणात ‘ड्रग्ज’ कनेक्शन समोर आल्यानंतर एनसीबीने चौकशी करण्यास सुरुवात केली.

बॉलिवूड ड्रग्ज कनेक्शन, ‘क्वीन’चा निर्माता मधु मांटेनाला एनसीबीचा समन्स

मुंबई : ‘ड्रग्ज’ कनेक्शनमध्ये अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींची नावे समोर आल्यानंतर आता यात चित्रपट निर्माता मधु मांटेनाचे नावही पुढे आले आहे. अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी तपास सुरु असताना रोज नवनवे खुलासे होत आहेत. या प्रकरणात ‘ड्रग्ज’ कनेक्शन समोर आल्यानंतर एनसीबीने चौकशी करण्यास सुरुवात केली. या प्रकरणी एनसीबीने ‘क्वीन’ चित्रपटाच्या निर्मात्याला समन्स बजावले आहे. (Drug connection filmmaker madhu mantena summoned by NCB)

सुशांत सिंह राजपूतची टॅलेंट मॅनेजर जया साहाने एनसीबी चौकशी दरम्यान चित्रपट निर्माता मधु मांटेनाचे नाव घेतले आहे. बॉलिवूडला ड्रग्ज पुरवणाऱ्यांशी मधु मांटेना याचे जवळचे संबंध असल्याचे तिने एनसीबीला सांगितले आहे. या प्रकरणी एनसीबीकडून चित्रपट निर्मात्याला समन्स बजावण्यात आल्याने आता त्याच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे.

 

कोण आहे मधु मांटेना?

चित्रपट निर्माता मधु मांटेना हा ज्येष्ठ अभिनेत्री नीना गुप्ता यांचा जावई होता. फॅशन डिझायनर मसाबा गुप्ताने २०१९मध्ये मधु मांटेनाशी नाते तोडत, घटस्फोट घेतला होता. मधु मांटेनाने ‘रण’, ‘गजनी’, ‘मौसम’, ‘क्वीन’सारख्या चित्रपटांची निर्मिती केली आहे.

दरम्यान, अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणात ड्रग्ज अँगल समोर आल्यानंतर पुढील तपास एनसीबीकडे (नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो) सोपवण्यात आला आहे. बॉलिवूड ड्रग्ज प्रकरणी सुशांतसिंह राजपूतची मैत्रीण रिया चक्रवर्तीसह अन्य आरोपींना एनसीबीकडून अटक करण्यात आली आहे. आता एनसीबीच्या चौकशीदरम्यान रिया चक्रवर्तीने ड्रग्ज सेवन केल्याची कबुली दिल्याची माहिती आहे.(Drug connection filmmaker madhu mantena summoned by NCB)

एनसीबीने विचारलेल्या 55व्या प्रश्नाचे उत्तर देताना रियाने ड्रग्ज घेतल्याची कबुली दिली. एनसीबी अधिकाऱ्यांनी “जर तू ड्रग्जचे सेवन करत नसशील, तर तू ड्रग्ज तस्कर आहेस आणि हाही एक भयंकर गुन्हाच आहे”, असे दटावल्यानंतर रियाने आपण ड्रग्जचे सेवन केल्याची कबुली दिली, असे वृत्त रिपब्लिक वाहिनीने दिले आहे. ही माहिती लपवण्यासाठी आपल्या टीमनेच सांगितल्याचा दावा रियाने चौकशीत केला.

दरम्यान, अभिनेत्री रिया चक्रवर्तीला 22 सप्टेंबरपर्यंत भायखळ्याच्या तुरुंगात ठेवण्यात येणार आहे. अभिनेत्री रिया चक्रवर्तीने ड्रग्ज कनेक्शनमध्ये नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोला बॉलिवूडमधील 25 कलाकारांची यादी दिल्याची धक्कादायक माहिती आहे. ड्रग्ज कनेक्शनमध्ये बॉलिवूडमधील बडी नावंही समोर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. प्रख्यात अभिनेता सैफ अली खानची मुलगी आणि अभिनेत्री सारा अली खान, अभिनेत्री रकुल प्रीत सिंग आणि फॅशन डिझायनर सिमॉन खंबाटा यांची नावं एनसीबीच्या चौकशीत आरोपी अभिनेत्री रिया चक्रवर्तीने घेतल्याचा दावा केला जात आहे.

(Drug connection filmmaker madhu mantena summoned by NCB)

संबंधित बातम्या

“होय, मी ड्रग्ज घेतलं” रिया चक्रवर्तीची एनसीबीच्या चौकशीत कबुली

सुशांतची बहीण श्वेता सिंह किर्ती ‘ऑफलाईन’, सोशल मीडियावरुन ब्रेक

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *