बॉलिवूड ड्रग्ज प्रकरण : एकीकडे जामीनाची गडबड, दुसरीकडे आरोपींची धरपकड, NCB च्या गळाला बडा मासा

बॉलिवूड ड्रग्ज प्रकरण : एकीकडे जामीनाची गडबड, दुसरीकडे आरोपींची धरपकड, NCB च्या गळाला बडा मासा
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई पोलिसांनी कूपर हॉस्पिटलच्या डॉक्टर्स टीमला सुशांतच्या आत्महत्येच्या टायमिंगवरून शंका विचारली होती. ज्यांनी सुशांतच्या मृतदेहाची ऑटोप्सी केली होती त्यांना याबद्दल विचारणा करण्यात आली होती. यात 5 ऑगस्टला मुंबई पोलिसांना डॉक्टरांचा रिपोर्ट मिळाला होता.

अभिनेता सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणात NCB च्या गळाला बडा मासा लागला आहे. ड्रग तस्कर राहील विश्राला बेड्या ठोकल्या आहेत. (NCB detain Rahil Rafat Vishra )

VN

| Edited By: सचिन पाटील

Sep 18, 2020 | 1:39 PM

मुंबई : अभिनेता सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो अर्थात NCB (Narcotics Control Bureau (NCB) च्या गळाला बडा मासा लागला आहे. एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी राहील रफत विश्रा (Rahil Rafat Vishra alias Sam) उर्फ सॅमला बेड्या ठोकल्या आहेत. दरम्यान, ड्रग्जप्रकरणात यापूर्वी कोठडीत असलेल्या तीन आरोपींच्या जामीनावर आज सुनावणी होणार आहे. (NCB detain Rahil Rafat Vishra seizes marijuana and charas)

अभिनेता सुशांत सिंह मृत्यू प्रकरणात ड्रग्ज अँगल समोर आल्यानंतर, बॉलिवूडमधील ड्रग्ज कनेक्शन नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो अर्थात NCB च्या रडारवर आहे. ड्रग्ज प्रकरणात NCB ने 6 आरोपींना अटक केली असून ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. यापैकी 3 आरोपींच्या जामीन अर्जावर आज मुंबई हायकोर्टात सुनावणी होणार आहे. सॅम्युअल मिरांडा, अब्दुल बासित परिहार, दीपेश सावंत या तिघांच्या जामीनावर आज सुनावणी होणार आहे.

ड्रग्ज प्रकरणातील सर्व सहा आरोपी मुंबईतील भायखळा कारागृहात आहेत. अभिनेत्री रिया चक्रवर्ती ही सुद्धा याच कारागृहात आहे. मिरांडा, अब्दुल आणि दीपेश सावंत यांचा जामीन अर्ज यापूर्वी सत्र न्यायालयाने फेटाळला होता. आता मुंबई हायकोर्ट यांचा जामीन मंजूर करतं का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

सॅम्युअल मिरांडा हा सुशांतचा स्टाफ मॅनेजर होता. सुशांतची मैत्रिण अभिनेत्री रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शौविक चक्रवर्ती या दोघांची सॅम्युअल मिरांडा सोबतची चॅट चौकशीदरम्यान समोर आली होती. तर बासित हा एक ड्रग्स पेडलर किंवा ड्रग तस्कर आहे. दीपेश सावंत हासुद्धा सुशांतचा स्टाफ मेंबर आहे. रिया चक्रवर्तीचा जामीन दोन वेळा फेटाळला आहे. त्यामुळे तिला येत्या 22 सप्टेंबरपर्यंत भायखळाच्या तुरुंगात रहावे लागणार आहे.

सॅम्युअलचं ड्रगबाबत रिया आणि शौविकसोबतचं चॅटिंग समोर आलं होतं.बासितने अनेकांना ड्रग पुरवल्याचा आरोप आहे. NCB ने शोविक आणि रियासोबतच्या संपर्कानंतर त्याला ताब्यात घेतलं.

NCB च्या गळाला बडा मासा दरम्यान सुशांत सिंग ड्रग्स प्रकरणात अटक आरोपी अंकुश अरनेजा याच्या चौकशीत महत्वाची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी राहील रफत विश्राम उर्फ सॅम याला अटक करण्यात आली आहे.

सॅम यांच्याकडून 928 ग्रॅम चरस जप्त करण्यात आलं आहे. त्याचप्रमाणे 4 लाख 36 हजार रुपये ही जप्त करण्यात आले आहेत. सॅम हा फिल्म क्षेत्रातील अनेकांना ड्रग्स देत असल्याची माहिती एनसीबीच्या अधिकाऱ्यांना मिळाली आहे.

एनसीबीची मोठी कारवाई NCB ने आजच्या कारवाईत उच्च दर्जाचं मलाला ड्रग जप्त केलं. याशिवाय उच्च दर्जाचं हशीष ड्रग्जही जप्त करण्यात आलं. याची किंमत सुमारे तीन ते चार कोटी रुपये इतकी आहे. राहील विश्रा या ड्रग तस्कराला अटक करण्यात आली आहे.

सुशांत सिंग राजपूत प्रकरणात आतापर्यंत रिया चक्रवर्ती , शौविक चक्रवर्ती , सॅम्युअल मिरांडा यांना अटक झाली आहे. हे अटक आरोपी राहील याच्या संपर्कात होते. एनसीबीचे विभागीय संचालक (झोनल डायरेक्ट) समीर वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई झाली.

एनसीबी आता राहील हा ज्यांच्यासाठी काम करतोय त्या व्यक्तीचा शोध घेत आहे. राहील याचा मालक हा मोठा ड्रग स्मगलर आहे. त्याच्या संपर्कात फिल्म इंडस्ट्रीमधील अनेक सेलिब्रेची आणि फिल्म स्टार असल्याचं एनसीबीच्या सूत्रांच म्हणणं आहे.

(NCB detain Rahil Rafat Vishra seizes marijuana and charas)

संबंधित बातम्या

Mumbai NCB | मुंबई एनसीबी टीमकडून दोन किलो चरस बाळगणाऱ्या दोघांना अटक

ड्रग्जनेक्शनप्रकरणी क्रिस्ट कोस्टा, सुर्यदिप मल्होत्रा यांना NCB कडून अटक 

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें