Holi 2022 : होळीच्या दिवशी विना तेलाचे बनवा हे काही स्नॅक्स पदार्थ, स्वादिष्ट अन् आरोग्यासाठी देखील ठरतील लाभदायक !!

Holi 2022 : होळीच्या दिवशी विना तेलाचे बनवा हे काही स्नॅक्स पदार्थ, स्वादिष्ट अन् आरोग्यासाठी देखील ठरतील लाभदायक !!
Healthy Food
Image Credit source: TV9

होळीच्या सणाला प्रत्येकाच्या घरी चमचमीत पदार्थ बनवले जातात. पुरणाच्या पोळी शिवाय किंवा अन्य चमचमीत पदार्थ शिवाय होळीचा सण अपूर्ण आहे. या होळीच्या दिवशी अधिक तर पदार्थ तेलाच्या सहाय्याने तयार केले जातात. आज आपण तेलाचा वापर न करता देखील काही स्नॅक्स पदार्थ जाणून घेणार आहोत, जे होळीच्या दिवशी तुम्ही सहजच खाऊ शकतात.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: महादेव कांबळे

Mar 16, 2022 | 7:03 PM

मुंबईः होळीच्या दिवशी (Holi) आपल्यापैकी अनेक जण वेगवेगळ्या पार्टीचे आयोजन करीत असतात. होळीच्या दिवशी अनेक जण नाचतात, गातात रंगाची उधळण करतात. वेगवेगळ्या प्रकारचे स्वादिष्ट पदार्थांचा आनंद घेत असतात. तुम्हीसुद्धा या होळीच्या सणाला वेगवेगळे चविष्ट पदार्थ बनवू शकता परंतु हे सगळे पदार्थ बनवण्यासाठी किंवा वेगवेगळे स्नॅक पदार्थ (snacks food) बनवण्यासाठी खूप सार्‍या तेलाची आवश्यकता भासते. तेलकट, तुपकट पदार्थ खाल्ल्याने आपले आरोग्य बिघडते त्याचबरोबर तेलकटपणा मुळे वाढते वजन, कोलेस्टेरॉल यांसारख्या समस्यादेखील भविष्यात उद्भवण्याची शक्यता असते. यंदाच्या होळीला तेलकट-तुपकट पदार्थ न खाता तुम्ही तेलाशिवाय बनवलेले काही पदार्थ(without oil food) खाऊ शकता.

तुमची होळी आनंदाने साजरी करू शकता, जसे की मसालेदार कुरकुरे आणि स्नॅक्स घरच्या घरी बनवू शकतात. यामध्ये मसाला चना, मसालेदार शेंगदाण्याची भे, आलू चाट इत्यादींचा समावेश आहे. चला तर मग जाणून घेऊया हे मसालेदार स्नॅक्स पदार्थ कशा पद्धतीने बनवायचे त्याबद्दल…

मसाला चना

हा पदार्थ खूपच हेल्दी आणि क्रिस्पी असतो. हा पदार्थ बनवण्यासाठी आपल्याला एक वाटी उकळलेले चणे घ्यायचे आहेत त्यामध्ये अर्धा चमचा जिरा पावडर, अर्धा चमचा हळद पावडर, एक छोटा चमचा आमचूर पावडर आणि एक छोटा चमचा लाल मिरची आणि मीठ घ्यायचे आहे, आता हे सगळे पदार्थ आपल्याला व्यवस्थित एकत्र करायचे. दहा ते पंधरा मिनिटं हे मिश्रण तसेच ठेवायचे आहे आणि त्यानंतर तुम्ही हा पदार्थ घरच्यांना खायला देऊ शकतात.

मसालेदार शेंगदाण्याची भेल

ही डिश बनवण्यासाठी खूपच सोपी आहे. हा पदार्थ बनवण्यासाठी आपल्याला खूप वेळ लागत नाही. हा पदार्थ बनवण्यासाठी दोन वाटी भुईमुगाच्या शेंगा आपल्याला पाण्यात भिजवून मग उकळून घ्यायच्या आहेत त्यानंतर एक टमाटर, एक कांदा, तीन हिरव्या मिरच्या, एक काकडी, एक गाजर कापून घ्यायचे आहेत आता एक वाटी घ्यायची आहे. त्यामध्ये शेंगदाणे आणि कापलेल्या भाज्या एकत्रित करायचे आहेत. या मिश्रणामध्ये लिंबूचा रस, एक चमचा मिरची पावडर, अर्धा चमचा चाट मसाला, भाजलेली जिरा पावडर टाकायची आहे. मुठभर कोथिंबीर आणि शेव वरून टाकायची आहे अशा प्रकारे अगदी कमी वेळातच हा मसालेदार पदार्थ तयार होईल.

वांग्याचा पिज्जा

हा अतिशय स्वादिष्ट असा स्नॅक पदार्थ आहे. तुम्ही तुमच्या घरी अगदी सहज उपलब्ध असलेल्या सामग्री द्वारे हा पदार्थ बनवू शकता. हा पदार्थ बनवण्यासाठी आपल्याला वांगी लागणार आहेत. मोठे वांगी आपल्याला सहसा हा पदार्थ बनवण्यासाठी घ्यायची आहेत त्यानंतर याचे बारीक काप करायचे आहे. काप वर टमाटर किंवा चटणी केचप लावायचे आहे त्यानंतर मोजेरेला चीज़ बिट्स टाकायचे सोबतच ओरेगॅनो ,मीठ, काळी मिरची , चिली फ्लेक्स टाकायचे आता पाच ते सात मिनिटे आपल्याला बेक करायचे आहे किंवा तुम्ही ओव्हन मध्ये ठेवून ग्रील करू शकता.

आलू चाट

आलू चाट हा पदार्थ बनवण्यासाठी आपल्याला बटाटे आधी उकळून घ्यायचे आहेत. बटाटे उकळल्यानंतर चिमूटभर मीठ आणि काळी मिरी पावडर घ्यायची आहे आता आपल्याला एका वाटीमध्ये दही, लाल मिरची पावडर, काळीमिरी सैंधव मीठ, जिरा पावडर आणि थोडीशी साखर घ्यायची आहे. हे मिश्रण व्यवस्थित एकजीव करायचे आहे त्यानंतर आपल्याला वरून बटाटे टाकायचे आहेत.वरून कापलेली भाजी मुठभर कोथिंबीर टाका, अशाप्रकारे घरच्या घरी अगदी सहज सोप्या पद्धतीने आलू चाट पदार्थ तयार झालेला आहे.

संबंधित बातम्या

विरोधकांना ‘येड पांघरूण पेडगावला जायचं होतं’ की त्यांचा ‘अभ्यास कमी होता’, Ajit Pawar यांचा टोला

Breaking : स्वाभिमानी शेतकरी संघटना आपल्या एकमेव आमदारावर कारवाई करणार? Raju Shetti यांनीच दिले संकेत!

विदर्भ मराठावाड्यासंदर्भात Ajit Pawar यांनी काहीचं उत्तर दिलं नाही, सुधीर मुनगंटीवार यांचं टीकास्त्र

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें