स्पेशल रिपोर्ट : एकनाथ शिंदे 2013ला काँग्रेसमध्ये जाणार होते?

राजन विचारे यांनी आज मोठा गौप्यस्फोट केलाय. एकनाथ शिंदे 2013 मध्येच काँग्रेससोबत जाणार होते. मात्र आमदार फिरले आणि बंड फसलं, असा दावा ठाकरेंचे ठाण्याचे खासदार राजन विचारेंनी केलाय.

स्पेशल रिपोर्ट : एकनाथ शिंदे 2013ला काँग्रेसमध्ये जाणार होते?
एकनाथ शिंदे
Follow us
| Updated on: May 08, 2024 | 10:27 PM

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार राजन विचारेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंबद्दल मोठा गौप्यस्फोट केला आहे. “4 आमदारांना सोबत घेवून शिंदे 2013 मध्येच काँग्रेसमध्ये जाणार होते. मात्र आमदार फिरले आणि शिंदेंचं त्यावेळचं बंड फसलं”, असा दावा करुन विचारेंनी सनसनाटी निर्माण केलीय. राजन विचारेंनी दावा केला आणि काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांनी त्यावर शिक्कामोर्तब केलं. 2013 मध्ये शिंदे काँग्रेसमध्ये येणार असल्याची चर्चा वरिष्ठांमध्ये होती, असं विजय वडेट्टीवार म्हणाले आहेत.

दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिलीय. राजन विचारे शिंदेंच्या मागे फिरणारे, महत्व वाढवण्यासाठी वक्तव्य केलं, असं संजय शिरसाट म्हणाले आहेत. राजन विचारे महत्त्व वाढवून घेण्यासाठी बोलत आहेत, असं शिंदेंचे प्रवक्ते म्हणत आहेत. पण बंडाचा विचार शिंदेंच्या डोक्यात होता हे शिंदेंच्या 3 दिवसांच्या आधीच्या वक्तव्यातून स्पष्ट होते.

मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले?

“मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरेच भाजपच्या बड्या नेत्यांना जेलमध्ये टाकून भाजपचे 25-30 आमदार फोडणार होते. पण त्यांचा प्लॅन यशस्वी झाला असता तर माझा प्लॅन फेल झाला असता”, असं एकनाथ शिंदे म्हणाले आहेत. “ठाकरेंनीच मला सांगितलं 25-30 आमदार भाजपचे फोडायचे. मी म्हटलं ठाकरेंचा प्लॅन यशस्वी झाला तर माझा प्लॅन फेल होईल”, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

शिंदे म्हणालेत त्याप्रमाणे 2 वर्षांआधी उद्धव ठाकरेंच्या विरोधात बंड पुकारलं आणि भाजपच्या पाठिंब्यावर ते आता मुख्यमंत्री आहेत. तर संजय राऊतांनी या बंडामागे जेलचं कारण असल्याचं म्हटलंय. त्यासाठी त्यांनी अयोध्येतली चर्चा उघड केली. “14 जूनच्या 2022 रात्री अयोध्येत मला शिंदे बोलले मोदींसोबत चला जेलमध्ये जायचं नाही”, असं संजय राऊत म्हणाले आहेत. सध्या मूळ शिवसेना धनुष्यबाणासह एकनाथ शिंदेंकडे आहे. मात्र 2022च्या बंडाआधी, ते कसे 2013लाच काँग्रेसमध्ये जाणार होते? असा दावा करुन राजन विचारेंनी नवा पत्ता उघड करण्याचा प्रयत्न केला.

Non Stop LIVE Update
गुन्हेगारांचं सोशल मीडियावर उदात्तीकरण, गजा मारणेचा तो व्हिडीओ व्हायरल
गुन्हेगारांचं सोशल मीडियावर उदात्तीकरण, गजा मारणेचा तो व्हिडीओ व्हायरल.
शिंदेंना मुख्यमंत्री करण्यास हरकत नव्हती, पण... पवारांचं मोठं वक्तव्य
शिंदेंना मुख्यमंत्री करण्यास हरकत नव्हती, पण... पवारांचं मोठं वक्तव्य.
पण मी गमछा उडवते, पंकजा मुंडेंकडून उदयनराजेंची नक्कल, बघा व्हिडीओ
पण मी गमछा उडवते, पंकजा मुंडेंकडून उदयनराजेंची नक्कल, बघा व्हिडीओ.
राऊतांनी ठाकरेंना धमकी दिल्याचा राणेंचा गौप्यस्फोट, तर मातोश्रीच्या...
राऊतांनी ठाकरेंना धमकी दिल्याचा राणेंचा गौप्यस्फोट, तर मातोश्रीच्या....
मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्यास..योगींच्या वक्तव्यावरून ठाकरे गटाची टीका
मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्यास..योगींच्या वक्तव्यावरून ठाकरे गटाची टीका.
लोकसभेचा निकाल अन् त्याच दिवशी जरांगे पाटलांचं पुन्हा एकदा उपोषण
लोकसभेचा निकाल अन् त्याच दिवशी जरांगे पाटलांचं पुन्हा एकदा उपोषण.
नवा परळी पॅटर्न म्हणत रोहित पवारांचं ट्विट अन निवडणूक आयोगावर हल्लाबोल
नवा परळी पॅटर्न म्हणत रोहित पवारांचं ट्विट अन निवडणूक आयोगावर हल्लाबोल.
तेव्हा राष्ट्रवादीकडे CM पदासाठी योग्य नेता नव्हता,शरद पवारांचा खुलासा
तेव्हा राष्ट्रवादीकडे CM पदासाठी योग्य नेता नव्हता,शरद पवारांचा खुलासा.
'त्यांना' शिंदे मुख्यमंत्री म्हणून नको होते, राऊतांचा मोठा गौप्यस्फोट
'त्यांना' शिंदे मुख्यमंत्री म्हणून नको होते, राऊतांचा मोठा गौप्यस्फोट.
आता सरकारच्या दोऱ्या माझ्या हातात, एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?
आता सरकारच्या दोऱ्या माझ्या हातात, एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?.