AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

How To Make Chapati: चपाती लगेच कडक होते? फुगत नाही? कणिक मळताना करताय या चुका

How To Make Chapati: अनेकदा चपाती बनवताना ती फुगत नाही किंवा चपाती बनवून झाल्यानंतर ती अगदी कडक होते. कितीही प्रयत्न केले तरी चपाती मऊ, लुसलुशीत होत नाही. जर तुम्हाला मऊ चपाती बनवायची असेल तर ही बातमी नक्की वाचा...

How To Make Chapati: चपाती लगेच कडक होते? फुगत नाही? कणिक मळताना करताय या चुका
chapatiImage Credit source: tv9 Marathi
| Updated on: Aug 25, 2026 | 10:09 AM
Share

भारतीय खाद्यसंस्कृतीत चपातीला खास स्थान आहे. गव्हाच्या आट्यापासून चपाती बनते. अनेक घरांमध्ये चपातीशिवाय जेवण अपूर्ण मानले जाते. काहींना अगदी गरमगरम मऊ चपाती खायला आवडते. पण कधी कधी चपाती बनवली तर ती फुगत नाही. खाण्याच्या वेळेपर्यंत अगदी कडक होते.

चपाती बनवण्याच्या पद्धती वेगवेगळ्या असतात.  दररोज चपात्या करूनही कणिक मळण्यात काही चुका होतात. त्यामुळे चपात्या वातड किंवा कडक होतात आणि नीट फुगत नाहीत. जर तुमच्याही चपात्या नीट होत नसतील, तर खाली दिलेल्या सोप्या टिप्स फॉलो करा. मऊ आणि गोल चपात्या हव्या असतील तर कणिक मळताना या गोष्टी लक्षात ठेवा…

मऊ चपात्यांसाठी कणिक मळण्याचे सिक्रेट

-कणिक किमान ८ ते १० मिनिटे चांगली मळून घ्या. यामुळे ग्लूटेन नीट तयार होते आणि चपात्या मऊ येतात.

-कणिक मळताना थंड पाणी वापरू नका. शक्यतो कोमट पाणी वापरा. यामुळे कणिक मऊ आणि लवचिक होते.

-कणिक मळून झाल्यानंतर लगेच चपात्या लाटू नका. कणिक झाकून किमान १५-२० मिनिटे विश्रांती घेऊ द्या.

-अधिक मऊपणासाठी कणिक मळताना थोडे दूधही मिसळू शकता.

वाचा: दुकानात आले तर तुकाराम मुंढे राजिनामा देतील… कचोरी दुकानाच्या मीम्सचा इंटरनेटवर धुमाकूळ

लाटताना आणि भाजताना काय करावे

-चपात्या लाटताना हलक्या हाताने लाटा. काठ जाड ठेऊ नका, नाहीतर ते नीट भाजत नाहीत.

-चपात्या भाजण्यापूर्वी तवा नीट गरम करा. नंतरच चपाती टाका.

-गॅसची फ्लेम जास्त ठेऊ नका. मध्यम आचेवर भाजा, म्हणजे चपात्या समान रीतीने भाजतील आणि फुगतील.

या सोप्या गोष्टी लक्षात ठेवल्या तर तुमच्या चपात्या मऊ, फुगलेल्या आणि स्वादिष्ट येतील. त्यामुळे चापात्या बनवताना वर दिलेल्या सर्व गोष्टी लक्षात ठेवा.

(डिस्क्लेमर: वर लेखात दिलेली माहिती केवळ प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही कोणताही दावा करत नाही. तसेच कोणतीही गोष्ट करण्यापूर्वी त्या त्या क्षेत्रातील तज्ञांचा सल्ला घ्यावा)

Follow Us
कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी ६.३६ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पैस जमा
शेतकरी कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी: ६.३ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात ५,०८६ कोटी रुपये जमा
वडेट्टीवारांचं विधान: फडणवीसांना २०२९ पर्यंतच पंतप्रधान होण्याची संधी
वडेट्टीवारांचे मोठे विधान: फडणवीसांना २०२९ पर्यंतच पंतप्रधान होण्याची संधी
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला