AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Cheapest Cloth Market: कमी बजेटमध्ये करा भरपूर शॉपिंग, या मार्केटमध्ये मिळतात स्वस्त आणि ट्रेंडी कपडे

Cheapest Cloth Market: आता एकापाठी एक सण आहेत, त्यामुळे महिलांचा सर्वात मोठा प्रश्न म्हणजे, खरेदी कोणत्या मार्केटमधून करायची आणि कोणते कपडे घालायचे. तर जाणून अशा काही मार्केटबद्दल जेथे कमी दरात ट्रेंडी कपडे मिळतीत.

Cheapest Cloth Market: कमी बजेटमध्ये करा भरपूर शॉपिंग, या मार्केटमध्ये मिळतात स्वस्त आणि ट्रेंडी कपडे
| Updated on: Sep 12, 2026 | 1:59 PM
Share

Cheapest Cloth Market: भारतातील खरेदीचा अनुभव एक वेगळाच आनंद देणारा असतो, हे सर्वांनाच माहित आहे. कोणताही सण आली की, सर्वात पहिला विचारला जाणारा प्रश्न म्हणजे, शॉपिंग करायची तरी कुठे? तर भारतात असे अनेक मार्केट आहेत. जिथे चांगले कपडे मिळतील. देशाची राजधानी दिल्लीव्यतिरिक्तही देशभरात अशी अनेक उत्कृष्ट मार्केट आहेत, जिथे तुम्हाला परवडणाऱ्या दरात स्टायलिश कपडे खरेदी करण्याची सुवर्णसंधी मिळते. जर तुम्हाला खरेदीची आवड असेल, तर तुम्ही या बाजारपेठांना नक्कीच भेट दिली पाहिजे.

कोलाबा कॉजवे (Colaba Causeway) : दक्षिण मुंबईमध्ये असलेलं कोलाबा कॉजवे मार्केट शॉपिंगसाठी प्रसिद्ध आणि लोकप्रिय आहे. येथे नेहमीच पर्यटकांची वर्दळ असते. येथे बुटीकपासून ते फूटपाथपर्यंत दुकानांमध्ये ग्राहकांची गर्दी असते. येथे तुम्ही सर्व प्रकारचे कपडे, ॲक्सेसरीज आणि चप्पलांचे शेकडो डिझाईन्स पाहू शकता. येथे खाण्यापिण्याची देखील उत्तम व्यवस्था आहे. स्ट्रीट शॉपिंग सोबतच तुम्ही येथे स्ट्रीट फूडचा आनंदही घेऊ शकता.

क्रॉफोर्ड मार्केट (Crawford Market) | क्रॉफोर्ड मार्केट जवळपास 150 वर्ष जुनं मार्केट आहे. शाहरातील सर्वात जुनं मार्केट म्हणून देखील क्रॉफोर्ड मार्केटची ओळख आहे. या मार्केटमध्ये कपडे आणि फॅशनच्या गोष्टींसाठी प्रसिद्ध नाही. तर या मार्केटमध्ये स्वयंपाकघर आणि जीवनशैलीशी संबंधित गोष्टी, होम डेकॉरसाठी लागणाऱ्या गोष्टी मोठ्या प्रमाणात दिसून येईल.

अंजुना मार्केट, गोवा (Anjuna Market) : जर तुम्ही गोव्याला जाण्याचा बेत आखत असाल, तर ‘अंजुना मार्केट’ला नक्की भेट द्या. येथील सुंदर समुद्रकिनाऱ्याचा आनंद घेण्यासोबतच, तुम्हाला येथे मनसोक्त खरेदीचाही आनंद लुटता येईल. येथे तुम्हाला आकर्षक गाउन्सपासून ते स्टायलिश टोप्या, बीचवेअर, ट्रेंडी सॅन्डल्स, पर्यावरणपूरक ज्यूटच्या पिशव्या आणि शिंपल्यांपासून बनवलेले सुंदर दागिने अशा विविध प्रकारच्या वस्तू अतिशय कमी दरात मिळतील.

टेक्सटाइल मार्केट, गुजरात (Textile Market) : याव्यतिरिक्त, जर तुम्ही परवडणाऱ्या दरातील कपड्यांच्या शोधात असाल, तर गुजरातमधील सुरत हे शहर एक उत्तम पर्याय आहे. सुरतला ‘भारताचे वस्त्रोद्योग केंद्र’ (Textile Hub of India) म्हणूनही ओळखले जाते. येथील प्रसिद्ध बाजारपेठांमध्ये तुम्हाला सुती, रेशमी, पॉलिस्टर आणि भारी डिझायनर कापड वाजवी दरात मिळू शकते. तसेच, येथून मिळणाऱ्या सूट, लेहंगा आणि साड्यांच्या कापडाला संपूर्ण भारतात सर्वाधिक मागणी आहे.

Follow Us
गणेशोत्सवाआधी मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी! कोकणवासीयांचा...
Ganeshotsav 2026 | गणेशोत्सवाआधी मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी! माणगावात 7-8 किमी वाहनांच्या रांगा; कोकणवासीयांचा प्रवास रखडला
शतकाची परंपरा कायम! सांगलीत दोन दिवस आधीच विराजमान होतो चोर गणपती
शतकाची परंपरा कायम! सांगलीत दोन दिवस आधीच विराजमान होतो चोर गणपती
पाचव्या दिवशी मुंबईत पोहोचणार, नंतर... जरांगेंनी जाहीर केला...
Manoj Jarange Patil | पाचव्या दिवशी मुंबईत पोहोचणार, नंतर आझाद मैदानावर... जरांगे पाटलांनी जाहीर केला महामोर्चाचा मेगा प्लॅन
कुठल्याही मार्गाने गेलो तरी मुंबईतच जायचंय, जिंकूनच यायचंय!
Manoj Jarange Patil | कुठल्याही मार्गाने गेलो तरी मुंबईतच जायचंय, जिंकूनच यायचंय! मनोज जरांगे पाटलांचा ठाम निर्धार
ठाकरेंच्या 'मातोश्री' निवासस्थानी मोठ्या हालाचली; तामिळनाडूच्या...
ठाकरेंच्या 'मातोश्री' निवासस्थानी मोठ्या हालाचली; तामिळनाडूच्या दिग्गज नेत्या पोहोचल्या भेटीला
सरकारचा OYO चालकांना सर्वात मोठा दणका; चुक खपवली जाणार नाही थेट...
सरकारचा OYO चालकांना सर्वात मोठा दणका; चुक खपवली जाणार नाही थेट... संपूर्ण रेकॉर्ड ठेवावा लागणार
माझा भाऊ शांततापूर्वकच... अमृता फडणवीसांनी पुन्हा एकदा मांडली बाजू,
माझा भाऊ शांततापूर्वकच... अमृता फडणवीसांनी पुन्हा एकदा मांडली बाजू, मनोज जरांगेंबाबत मोठं विधान
आमदार बच्चू कडूंचं थरारक वॉटरफॉल रॅपलिंग, तब्बल 300 फूट उंचावरून...
आमदार बच्चू कडूंचं थरारक वॉटरफॉल रॅपलिंग, तब्बल 300 फूट उंचावरून... पहा व्हिडीओ
एकनाथ शिंदेंचं लंडनमधील भाषण, वडापाव खातानाचा Video; राऊतांची जोरदार..
एकनाथ शिंदेंचं लंडनमधील भाषण, वडापाव खातानाचा Video; राऊतांची जोरदार टीका
गणेशोत्सवात अमित शहांचा मुंबई दौरा, बड्या नेत्याने घेतला तीव्र आक्षेप
गणेशोत्सवात अमित शहांचा मुंबई दौरा; बड्या नेत्याने घेतला तीव्र आक्षेप, म्हणाले पोलिसांना ताण...