Dark Circles ने केलं परेशान? घरीच बनवा कॉफी अंडर आय मास्क

| Updated on: Apr 28, 2023 | 6:00 PM

आज आम्ही तुमच्यासाठी कॉफी अंडर आय मास्क घेऊन आलो आहोत. हा मास्क कॉफी, मध आणि व्हिटॅमिन ई कॅप्सूलच्या मदतीने तयार केला जातो. त्यामुळे या तिघांचे कॉम्बिनेशन लावल्याने डोळ्यांच्या खालची काळी वर्तुळे काही दिवसांतच नाहीशी होतात.

Dark Circles ने केलं परेशान? घरीच बनवा कॉफी अंडर आय मास्क
Under eye cream for dark circles
Image Credit source: Social Media
Follow us on

मुंबई: डोळे ही माणसाची ओळख आहे. त्यामुळे आकर्षक डोळे मिळावेत अशी प्रत्येकाची इच्छा असते. पण अनेकांना डोळ्यांखाली डार्क सर्कलची समस्या असते, ज्यामुळे तुमच्या डोळ्यांच्या सौंदर्याला ग्रहण लागतं. आज आम्ही तुमच्यासाठी कॉफी अंडर आय मास्क घेऊन आलो आहोत. हा मास्क कॉफी, मध आणि व्हिटॅमिन ई कॅप्सूलच्या मदतीने तयार केला जातो. त्यामुळे या तिघांचे कॉम्बिनेशन लावल्याने डोळ्यांच्या खालची काळी वर्तुळे काही दिवसांतच नाहीशी होतात. याशिवाय फुगलेल्या आणि थकलेल्या डोळ्यांच्या समस्येवरही तुम्ही मात करू शकता, तर चला जाणून घेऊयात डोळ्यांच्या खाली लावायचं कॉफी मास्क कसं बनवावं.

कॉफी अंडर आय मास्क बनवण्यासाठी लागणारे साहित्य :

  • कॉफी पावडर एक चमचा
  • मध एक चमचा
  • व्हिटॅमिन ई कॅप्सूल

कॉफी अंडर आय मास्क कसं बनवावं?

  • कॉफी अंडर आय मास्क बनविण्यासाठी, प्रथम एक वाटी घ्या.
  • नंतर त्यात कॉफी आणि मध घालून चांगले मिक्स करा.
  • यानंतर त्यात व्हिटॅमिन ई कॅप्सूल टाका.
  • मग तुम्ही ते पुन्हा एकदा चांगले मिसळा.
  • आता तुमचा कॉफी अंडर आय मास्क तयार आहे.

कॉफी अंडर आय मास्कचा वापर कसा करावा?

  • तयार मिश्रण घ्या आणि डोळ्याखाली समानपणे लावा.
  • नंतर साधारण १० मिनिटे असेच राहू द्या.
  • यानंतर थंड पाण्याने चेहरा स्वच्छ धुवावा.
  • चांगल्या परिणामांसाठी हा आय मास्क एक दिवस लावा.

(डिस्क्लेमर: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही याला दुजोरा देत नाही.)