AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हॉटेलच्या बाथरुममध्ये फोन का ठेवतात? जाणून घ्या यामागील रंजक कारण…, व्हाल अवाक्

एक काळ असा होता जेव्हा हॉटेलच्या बाथरुमध्ये फोन असायचे, तुम्ही कधी हॉटेलच्या बाथरुममध्ये फोन पाहिला आहे का? आता मोबाईलच्या वापरामुळे फोनची गरज कमी झाली आहे. पण जाणून घ्या हॉटेलच्या बाथरुममध्ये फोन का असतात...

हॉटेलच्या बाथरुममध्ये फोन का ठेवतात? जाणून घ्या यामागील रंजक कारण..., व्हाल अवाक्
| Updated on: Sep 06, 2026 | 5:01 PM
Share

बाहेर कुठे फिरायला जायचं म्हटल्यानंतर हॉटेल बूक करणं, हे सर्वात महत्त्वाचं काम आहे, कारण वेळेवर हॉटेल बूक करण्यासाठी गेल्यानंतर कधीच रुम मिळत नाही. त्यामुळे हॉटेल अनेक जण आधीच बूक करतात. पण हॉटेलमध्ये काही अशा गोष्टी असतात, ज्या आपल्याला चकित करतात. त्यामधील एक म्हणजे हॉटेलच्या बाथरुममध्ये असलेले फोन… जेव्हा तुम्ही एखाद्या भव्य आणि आलिशान हॉटेलमध्ये जाता , तेव्हा तुमच्या लक्षात आलं असेल की काही हॉटेल्सच्या बाथरुंमध्ये फोन असतात. हे पाहून थोडे विचित्र वाटू शकतं. पण तिथे हे फोन ठेवण्यामागे एक विशिष्ट कारण आहे.

एके काळी, बाथरुममध्ये फोन असणं हे आलिशान हॉटेलचं एक प्रमुख वैशिष्ट्य होतं. 1980 आणि 1990 च्या दशकात, हॉटेलच्या बाथरुममध्ये फोन असणं हे मोठ्या ऐषारामाचं लक्षण मानलं जात होतं. फोनमुळे हॉटेलमध्ये राहण्यासाठी आलेल्या लोकांना हॉटेल कर्मचाऱ्यांशी संपर्क साधणं किंवा आवश्यक सेवांची विनंती करणं शक्य होत असे.

पूर्वी फोन असायचे पण आता स्मार्टफोन आणि मोबाईल फोनच्या वाढत्या वापरामुळे बाथरुममध्ये स्वतंत्र टेलिफोनची गरज कमी झाली आहे. एके काळी आलिशान हॉटेल्सचे वैशिष्ट्य असलेली ही सोय हळूहळू कालबाह्य झाली आहे. काही हॉटेल्समध्ये, विशेषतः लंडनमध्ये, लोकांना बाथटबमधून फोन करण्याची सोयसुद्धा होती. मात्र, मोबाईल फोनच्या वापरामुळे अनेक हॉटेल्सनी अशा सुविधा काढून टाकायला सुरुवात केली आहे.

आजही काही हॉटेल्सच्या बाथरूममध्ये फोन आढळतात. आता त्याकडे केवळ ऐषारामाचे प्रतीक म्हणून पाहिले जात नाही. आपत्कालीन परिस्थितीत ते एक सुरक्षा साधन म्हणूनही काम करतं. उदाहरणार्थ, जर एखादा व्यक्ती बाथरूममध्ये घसरला किंवा त्याला कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवली, तर तिथून हॉटेलच्या कर्मचाऱ्यांशी संपर्क साधता येतो. जेव्हा तुम्ही बाहेर पडू शकत नसाल, तेव्हाही हा फोन उपयोगी पडू शकतो.

शिवाय, जर तुम्हाला हाऊसकीपिंग, रूम सर्व्हिस किंवा फ्रंट काउंटरकडून कोणतीही सेवा हवी असेल, तर तुम्ही बाथरूममधूनच कॉल करू शकता. म्हणूनच काही हॉटेल्समध्ये आजही आसे फोन ठेवले जातात.

Follow Us
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली
राज ठाकरेंची ही ॲक्शन पहाच; नेमका कुणावर साधला निशाणा?
Raj Thackeray UNCUT Speech | राज ठाकरेंची ही ॲक्शन पहाच; नेमका कुणावर साधला निशाणा?
मला भीती वाटते की... राज ठाकरे भाषणामध्येच असं का म्हणाले? यंदा गणपतीत
मला भीती वाटते की... राज ठाकरे भाषणामध्येच असं का म्हणाले? यंदा गणपतीत मोठ्या...