वाईट आठवणी मेंदू स्वतःहून पुसून टाकतो का? संशोधनातून धक्कादायक खुलासा

Brain Removes Unwanted Memories: जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट विसरण्याचा प्रयत्न करतात तेव्हा मेंदू त्या गोष्टीशी संबंधित सर्व माहिती स्मृतीपटलात दाबून टाकतो. सोप्या भाषेत सांगायचे तर ते संगणकातील फाइल डिलीट करण्यासारखे आहे.

वाईट आठवणी मेंदू स्वतःहून पुसून टाकतो का? संशोधनातून धक्कादायक खुलासा
brain
| Updated on: Jun 19, 2025 | 12:56 PM

Brain Removes Unwanted Memories: प्रत्येकाच्या आयुष्यात काहीतरी काही ना काही घडतच असते. त्याच्या आठवणी व्यक्तींना असतात किंवा कधी काही आठवणी विसरुन जाता येते. काही आठवणी नेहमीच तुमच्या आठवणीत राहतात, जसे की एखादा सुंदर क्षण किंवा एखादा खास नाते. परंतु चांगल्या आठवणी मेंदू आयुष्यभर कसे आठवणीत ठेवतो? असा प्रश्न आहे. आता शास्त्रज्ञांनी या विषयावर संशोधन केले आहे.

यॉर्क विद्यापीठात यासंदर्भात संशोधन झाले. त्यानंतर शास्त्रज्ञांना एका अभ्यासात असे आढळून आले की एखादी व्यक्ती जाणूनबुजून त्याच्या मनातून काही गोष्टी काढून टाकू शकते. ही संपूर्ण प्रक्रिया मेंदूमध्ये कार्यरत असलेल्या स्मृतीमध्ये घडते. त्याचा अर्थ स्मृती आपण थोड्या काळासाठी काहीतरी लक्षात ठेवण्यासाठी वापरतो.

काही आठवणी मेंदू कसे विसरतो

जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट विसरण्याचा प्रयत्न करतात तेव्हा मेंदू त्या गोष्टीशी संबंधित सर्व माहिती स्मृतीपटलात दाबून टाकतो. सोप्या भाषेत सांगायचे तर ते संगणकातील फाइल डिलीट करण्यासारखे आहे. ती मेमरी पूर्णपणे नाहीशी होत नाही, परंतु तुम्हाला ती आठवता येत नाही. त्यामुळे ज्या विसरणाऱ्या आठवणी आहेत, तो भाग सक्रीय राहत नाही. वैज्ञानिकांनी मेंदूला स्कॅन करुन हे सर्व शोधून काढले.

असा केला प्रयोग

शास्त्रज्ञांनी 30 लोकांना काही गोष्टी आठवणीत ठेवण्याचे आणि काही गोष्टी विसरण्याचे सांगितले. त्यानंतर त्या सर्व लोकांच्या मेंदुतील एक्टिव्हीटी रिकॉर्ड केल्या गेल्या. त्यासाठी ईईजी नावाच्या तंत्रज्ञानाचा वापर केला. त्यात दिसून आले की जेव्हा लोक काही गोष्टी विसरण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा मेंदू त्यात सहभागी होतो. मानसिक आरोग्याच्या दृष्टीने हे संशोधन खूप महत्त्वाचे आहे. जर तुम्हाला मेंदू वाईट आठवणी कशा काढून टाकतो हे समजले तर तुम्हाला नैराश्य, चिंता आणि वाईट विचारांना तोंड देण्याचे चांगले मार्ग सापडतील, असे संशोधनात दिसून आले.