AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सुंदर आणि ग्लोईंग त्वचा हवी? मग लिंबू पाण्याचे सेवन आवश्यक !

आपण सर्वच जण जास्त करून लिंबू पाणी उन्हाळ्याच्या हंगामात पितो. लिंबू पाणी हे असेच एक पेय आहे.

सुंदर आणि ग्लोईंग त्वचा हवी? मग लिंबू पाण्याचे सेवन आवश्यक !
| Updated on: Mar 30, 2021 | 10:59 AM
Share

मुंबई : आपण सर्वच जण जास्त करून लिंबू पाणी उन्हाळ्याच्या हंगामात पितो. लिंबू पाणी हे असेच एक पेय आहे, जे उन्हाळ्यात तोंडाची चव वाढवण्यासाठी वापरले जाते, परंतु आपणास माहित आहे का? की चवी व्यतिरिक्त, लिंबू पाणी शरीरासाठी अनेक प्रकारे फायदेशीर आहे. लिंबूयुक्त पाणी प्यायल्याने शरीराची प्रतिकारशक्ती सुधारते. मात्र, तुम्हाला हे माहिती आहे का? की, लिंबू पाणी प्यायल्याने आपल्या त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर आहे. चला, जाणून घ्या याचे फायदे….(Drinking lemon water is beneficial for beautiful and glowing skin)

-लिंबू पाण्यामध्ये तुम्ही मध देखील मिक्स करू शकता. मात्र, जेंव्हा लिंबू पाण्यात मध मिक्स करत आहात त्यावेळी त्यामध्ये कोमट पाण्याचा उपयोग करणे आवश्यक आहे. गरम पाण्यामध्ये मध मिक्स करणं आरोग्यासाठी चांगले मानले जाते.

-लिंबूमध्ये मोठ्या प्रमाणात अँटी-ऑक्सिडंट्सचा साठा असतो. यामुळे नियमित मर्यादित स्वरुपात लिंबू पाणीचे सेवन केल्यास त्वचेला खोलवर पोषण तत्त्वांचा पुरवठा होतो. यामुळे सुरकुत्या, पिगमेंटेशन, मुरुम इत्यादी त्वचेशी संबंधित समस्या दूर होण्यास मदत मिळते.

-लिंबू पाणी प्यायल्यामुळे नैराश्य आणि तणाव कमी होतो. बर्‍याच संशोधनात असे निष्कर्ष समोर आले आहेत की, शरीर हायड्रेटेड राहिल्यास तणावापासून दूर राहण्यात मदत होते. त्याचबरोबर, शिकंजीमध्ये लिंबाचा वापर केला जातो, जो तुम्हाला ताजेतवाने ठेवण्यात प्रभावी आहे.

-जेव्हा आपल्याला खूप तहान लागली असेल तेव्हा लिंबू पाणी प्यावे. लिंबूच्या सुगंधामुळे मन प्रसन्न होते व मानसिक ताणही दूर होतो. शरीरातील हॅपी हार्मोन्सची पातळी वाढते

-हे पिण्यामुळे तोंडातून येणारी दुर्गंधीही दूर होते. दिवसातून दोन ते तीन वेळा लिंबू पाणी प्यायल्याने दात आणि हिरड्यांच्या समस्येवर आराम मिळतो.

-व्हिटामिन सी समृद्ध लिंबू पाणी त्वचा सुधारते. आठवड्यातून एकदा याचे सेवन केल्याने त्वचेच्या समस्या देखील दूर होतात.

संबंधित बातम्या : 

Skimmed  Milk | स्किम्ड दुधाचे सेवन करताय? थांबा! आधी जाणून घ्या याचे दुष्परिणाम…

Kidney Stone | मुतखड्याच्या समस्येने त्रस्त आहात? मग, चुकूनही खाऊ नका ‘हे’ पदार्थ!

(Drinking lemon water is beneficial for beautiful and glowing skin)

Follow Us
ज्ञानेश कुमार यांच्या आग्रा निवासस्थानाबाहेर आंदोलन, काँग्रेसच्या...
ज्ञानेश कुमार यांच्या आग्रा निवासस्थानाबाहेर आंदोलन, काँग्रेसच्या नेत्यांना अटक
Thane Case : ठाण्यात ठाकरेंच्या पदाधिकाऱ्याला संपवलं, CCTV फुटेज समोर
Thane Case : ठाण्यात ठाकरेंच्या पदाधिकाऱ्याला संपवलं, CCTV फुटेज समोर
छत्रपती संभाजीनगराचे नाव पुन्हा औरंगाबादच करावे; बड्या नेत्याच्या...
छत्रपती संभाजीनगराचे नाव पुन्हा औरंगाबादच करावे; बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ, मनसे आक्रमक
मतदार नोंदणीबाबत मोठी बातमी! Form 6 ची जुनी ऑनलाइन प्रक्रिया सुरू
मतदार नोंदणीबाबत मोठी बातमी! Form 6 ची जुनी ऑनलाइन प्रक्रिया पुन्हा सुरू; अतिरिक्त...
सचिन वाझेचा जामीन कायम राहणार? कोर्टाने पुन्हा सुनावणी नाकारली; कारण..
सचिन वाझेचा जामीन कायम राहणार? कोर्टाने पुन्हा सुनावणी नाकारली; कारण...
कर्जमाफीचा तिसरा हप्ता आला; शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट पैसे जमा...
मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता आला; शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट पैसे जमा...
AI चं नाव बदललं? डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; आता...
Donald Trump : AI चं नाव बदललं? डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; आता Artificial Intelligence नव्हे तर....
अरबी समुद्रात ड्रग्ज तस्करांना झटका! एवढे किलो हेरॉईन-मेथाफेमाईन जप्त
Lakshadweep : अरबी समुद्रात ड्रग्ज तस्करांना मोठा झटका! तब्बल एवढे किलो हेरॉईन-मेथाफेमाईन जप्त; थेट पाकिस्तानी...
माझ्या डॅडला न्याय द्या! प्रदीप पूर्णेकरांच्या मुलाचा टाहो; म्हणाले...
माझ्या डॅडला न्याय द्या! प्रदीप पूर्णेकरांच्या मुलाचा टाहो; मुख्यमंत्र्यांना केलं भावनिक आवाहन, म्हणाले...
प्रदीप पूर्णेकर यांना का संपवलं?; राऊतांनी सांगितलं खरं कारण म्हणाले..
Sanjay Raut : प्रदीप पूर्णेकर यांना का संपवलं?; संजय राऊतांनी सांगितलं खरं कारण, म्हणाले...