AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

निरोगी आयुष्य जगायचे? मग, दररोज एक ग्लास दूधाचे सेवन करा, वाचा !

आहारात दूध घेणे हे आपल्या निरोगी आयुष्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे.

निरोगी आयुष्य जगायचे? मग, दररोज एक ग्लास दूधाचे सेवन करा, वाचा !
दुध
| Updated on: May 09, 2021 | 10:22 AM
Share

मुंबई : आहारात दूध घेणे हे आपल्या निरोगी आयुष्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. दुधामध्ये प्रथिने, चरबी, कॅलरीज, कॅल्शियम, व्हिटामिन डी, बी-2, बी-12, पोटॅशियम, फॉस्फरस आणि सेलेनियम यासारख्या पोषक घटक असतात. मात्र, आता अनेक लोक पास्चराइज्ड दुधाचा वापर करतात, जे कदाचित खूप पौष्टिक असू शकत नाही. आता, लोकांनी मोठ्या प्रमाणात दुधाचे सेवन करणे थांबले आहे. बरेच पोषण तज्ज्ञ असे म्हणतात की, दुधाचे सेवन केल्याने आपल्या शरीराला बरेच फायदे होतात. प्रत्येकाने त्यांच्या आहारात दुग्धजन्य पदार्थांचा समावेश केला पाहिजे. (Drinking milk is beneficial for living a healthy life)

1. पौष्टिक घटक जर आपल्याला सर्व पौष्टिक घटक एकत्र पाहिजे असतील तर आपण दररोज दूध पिले पाहिजे. दुधामध्ये आपल्या शरीराला आवश्यक असणारी पोषक तत्त्वे असतात. कॅल्शियम, पोटॅशियम, फॉस्फरस, उच्च दर्जाचे प्रथिने, जीवनसत्त्वे अ, डी आणि बी 12, राइबोफ्लेविन आणि नियासिन यासह 9 अत्यावश्यक पोषक तत्व हे दूधामध्ये असतात.

2. प्रथिने दूधामध्ये केवळ पोषक नसते तर त्यामध्ये प्रोटीन देखील मोठ्या प्रमाणात असतात. एका ग्लास दुधात 8 ग्रॅम प्रथिने असतात. हे प्रथिने मानवी शरीरासाठी महत्त्वपूर्ण आहेत कारण ते आपले स्नायू आणि पेशी टिकवून ठेवण्यास आणि त्यांना चांगले ठेवण्यास मदत करतात. दुधामध्ये बीटा केसिन नावाचे प्रोटीन असते जे वाढीसाठी महत्वाचे असते. बीटा केसिनचे दोन प्रकार आहेत – ए 1 आणि ए 2. ए 2 दुधामध्ये ए 2 बीटा-केसिन जे आपल्या शरीराच्या विकासात फायदेशीर असतात.

3. दूध पिण्याचे फायदे दिवसातून आपण एक ग्लास दूध पिल्ल्याने अनेक रोगांपासून दूर राहू शकतो, असे संशोधनातून देखील समोर आले आहे. तसेच दूध पिल्याने स्ट्रोक आणि उच्च रक्तदाब कमी होण्याचा धोका कमी असतो. दुधात असलेले लैक्टोज आपल्या यकृतमध्ये कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी करण्यास मदत करते. आपल्याला माहित आहे की, दूध हे जीवनसत्त्वे आणि खनिज पदार्थांचा एक चांगला स्रोत आहे. म्हणून, दिवसभरात एक ग्लास दूध पिण्यामुळे आपल्या शरीराला अनेक फायदे होतात.

4. गरम दूध आणखी चवदार कसे बनवाल? जेव्हा, आपण ते काही विशेष मसाल्यांसह सेवन करता, तेव्हा त्याचा प्रभाव आणखी वाढतो. आपले पचन निरोगी ठेवण्यासाठी आणि प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी, 2 चिमूटभर हळद घातलेले कोमट दूध प्या. दालचिनी आणि आल्याप्रमाणे हळदीमध्ये फायदेशीर अँटिऑक्सिडेंट्स असतात. हे शरीरातील दाह कमी करण्यास देखील मदत करतात.

(टीप : सेवनापूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

(Drinking milk is beneficial for living a healthy life)

Follow Us
टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली....
Tiger Shroff : टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली 14 दिवसांची कोठडी
दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची ठाकरे- राऊतांवर बोचरी टीका
Navnath Ban on Uddhav Thackeray : दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची उद्धव ठाकरे-संजय राऊतांवर बोचरी टीका, पुढे म्हणाले...
उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...
Gunratna Sadavarte : उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...; गुणरत्न सदावर्तेंचा जोरदार हल्लाबोल
सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
Sangli Bank Election : सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, सांगलीच्या राजकारणात चर्चांना उधाण; पडद्यामागे नेमकं काय घडलं?
मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात शिंदे आयोजकांवर..
Eknath Shinde : मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे आयोजकांवर संतापले; नेमकं काय घडलं?
जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी...
Jio IPO : जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी काय लक्षात ठेवावं?
एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर
MHT-CET Exam Update : एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर दिलं मोठं स्पष्टीकरण
मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटियासह 29 X अकाउंट...
PM Modi Documentry : मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटिया यांच्यासह 29 X अकाउंटधारकांना थेट...
मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे, सुनेत्रा पवार दिल्लीत; द्रौपदी मुर्मूंची...
Delhi : मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार दिल्लीत; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची घेणार भेट, कारण काय?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा चौकशीसाठी हजर, तपासात काय उघड होणार?