AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मधुमेह, बद्धकोष्ठता आणि हृदयाच्या आरोग्यासाठी करा द्राक्षाचे सेवन, जाणून घ्या लाभदायक फायदे

मधुमेह, बद्धकोष्ठता आणि हृदयाच्या आरोग्यासाठी करा द्राक्षाचे सेवन, जाणून घ्या लाभदायक फायदे (eat grapes to prevent diabetes, constipation, heart disease)

मधुमेह, बद्धकोष्ठता आणि हृदयाच्या आरोग्यासाठी करा द्राक्षाचे सेवन, जाणून घ्या लाभदायक फायदे
द्राक्षाचे आरोग्यदायी फायदे
| Updated on: Feb 21, 2021 | 1:10 PM
Share

मुंबई : द्राक्षे हे एक असं फळ आहे जे बहुतेक लोकांना खायला आवडते. द्राक्षे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानली जातात. द्राक्षात आढळणारी पोषक तत्त्वे शरीरासाठी खूप फायदेशीर मानली जातात. द्राक्षांमध्ये व्हिटॅमिन ए बरोबर व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी, पोटॅशियम आणि कॅल्शियम देखील भरपूर प्रमाणात आढळतात. द्राक्षामध्ये फ्लेव्होनॉइड्स आणि शक्तिशाली अँटी-ऑक्सिडंट घटक देखील असतात, जे शरीराला बर्‍याच समस्यांपासून वाचविण्यात उपयुक्त मानले जातात. एवढेच नाही तर द्राक्षांमध्ये बरीच पोषक द्रव्ये कॅलरी, फायबर, ग्लूकोज, मॅग्नेशियम आणि लिंबाच्या रसामध्ये सापडणारे आम्ल देखील उपलब्ध असतात. द्राक्षे खायला जितकी चवदार आहे तितकेच आरोग्यासाठी फायद्याचे आहे. त्यामध्ये उपस्थित अँटी-ऑक्सिडंट्स हार्ट अटॅक, रक्ताच्या गुठळ्या होणे आदि समस्यांपासून बचाव करतात. एवढेच नव्हे तर कोलेस्टेरॉलला नियंत्रणात ठेवण्यासही त्यांना उपयुक्त मानले जाते. द्राक्षे खाल्ल्याने शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासही मदत होते. (eat grapes to prevent diabetes, constipation, heart disease)

द्राक्षाचे आरोग्यदायी फायदे कोणते?

हृदयाचे आरोग्य लाभदायक द्राक्षे हृदयाच्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर मानले जाते. द्राक्षांमध्ये असलेले पोषक तत्व हृदयाच्या आजारापासून बचाव करण्यास मदत करतात. एका संशोधनानुसार, स्तनाच्या कर्करोगाच्या प्रतिबंधासाठी द्राक्षाचे सेवन फायदेशीर ठरू शकते.

रक्तदाब नियंत्रित राहते द्राक्षाचे सेवन केल्यामुळे रक्तदाब नियंत्रित केले जाऊ शकते. उच्च रक्तदाबाची समस्या असलेल्या रुग्णांसाठी द्राक्षे अधिक फायदेशीर ठरते. द्राक्षाचा डाएटमध्ये समावेश केल्यास रक्तदाबावर नियंत्रण मिळवू शकतो.

कँसरपासून बचाव करते कँसरसारख्या धोकादायक आजारापासून बचाव करायचा असल्यास द्राक्षाचे सेवन करणे आरोग्यादायी आहे. द्राक्षामध्ये ग्लुकोज, मॅग्नेशिअम आणि सायट्रिक अॅसिड सारखी अनेक पोषक तत्वं असतात. जे कँसर आणि ब्लड-इंफेक्शन सारख्या आजारांवर नियंत्रण मिळवण्यासाठी उपयुक्त होऊ शकते.

डोळ्यांसाठी उपयुक्त द्राक्षांमध्ये व्हिटॅमिन ‘ए’ मोठ्या प्रमाणात असते, जे डोळ्यांसाठी अतिशय लाभदायी असते. डोळ्यांशी संबंधित समस्या दूर करण्यासाठी तुमच्या डाएटमध्ये द्राक्षांचा समावेश करु शकता.

बद्धकोष्ठतेपासून मुक्तता मिळते जर तुम्ही बद्धकोष्ठतेच्या समस्येने त्रस्त असाल तर द्राक्षांचे सेवन जरुर करा. बद्धकोष्ठतेव्यतिरिक्त वजन वाढवण्यासाठी द्राक्षांचा डाएटमध्ये समावेश करु शकता. शरीराने बारीक असलेल्यांसाठी द्राक्षाचे सेवन फायदेशीर ठरू शकते.

मधुमेहावर उपयुक्त मधुमेह ही सध्या एक गंभीर समस्या आहे. मधुमेह रूग्णांना बर्‍याच गोष्टी खाण्यास मनाई आहे. मधुमेहाच्या रुग्णांना द्राक्षाचे सेवन फायदेशीर मानले जाते. द्राक्षे शरीरातील साखरेची पातळी कमी करण्यास मदत करू शकतात. (eat grapes to prevent diabetes, constipation, heart disease)

इतर बातम्या

Hair Care Tips| केसांच्या आरोग्यासाठी मेथीचे दाणे लाभदायी, जाणून घ्या काही खास टिप्स

Bigg Boss 14चा आज महाअंतिम सोहळा, कोण होणार विजेता?, कसा असेल सोहळा; वाचा!

Follow Us
3700 कोटींचे टेंडर्स, अन्...; अजय बारस्करांचे मनोज जरांगेंच्या...
Ajay Baraskar : 3700 कोटींचे टेंडर्स, कोट्यवधींच्या जमिनी; अजय बारस्करांचे मनोज जरांगेंच्या निकटवर्तीयांवर गंभीर आरोप
कधी एकमेकांचे कट्टर विरोधक, रवी राणा आणि बच्चू कडू एकत्र
Amravati : कधी एकमेकांचे कट्टर विरोधक, आता एकाच ध्येयासाठी एकत्र; रवी राणा-बच्चू कडूंच्या भेटीची चर्चा
जंतरमंतरवर पोलीस न लावता आंदोलन करू द्या, आहे का हिंमत?
Sandip Deshpande : जंतरमंतरवर पोलीस न लावता आंदोलन करू द्या, आहे का हिंमत? संदीप देशपांडेंचं थेट आव्हान
मी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा वाघ... अजय बारस्करांचा जरांगेंना इशारा
Ajay Baraskar on Manoj Jarnage : मी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा वाघ, तु...; अजय बारस्करांचा मनोज जरांगेंना थेट इशारा
शिवसेनेचं शिष्टमंडळ फडणवीसांना भेटणार, चर्चेचा विषय काय?
Shivsena : महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड; शिवसेनेचं शिष्टमंडळ फडणवीसांना भेटणार, चर्चेचा विषय काय?
एवढं मोठं प्रकरण झालं, लाड भाऊ गेले कुठे? मनोज जरांगेंचा सवाल
Manoj Jarange Patil on Prasad Lad : एवढं मोठं प्रकरण झालं, लाड भाऊ गेले कुठे? मनोज जरांगेंचा सवाल
मनोज जरांगेंनी केली रामदास कदमांची नक्कल, म्हणाले...
Manoj Jarange on Ramdas Kadam : मनोज जरांगेंनी केली रामदास कदमांची नक्कल, म्हणाले...
मनोज जरांगेंची ऑडिओ क्लिप खरी की AI जनरेटेड? भाजपची SIT चौकशीची मागणी
Navnath Ban On Jarange Viral Audio Clip : मनोज जरांगेंची ऑडिओ क्लिप खरी की AI जनरेटेड? भाजपची SIT चौकशीची मागणी
ऑडिओ क्लिपची चौकशी करा, नाहीतर...; जरांगे पाटलांचं फडणवीसांना आव्हान
Jarange Patil On Viral Audio Clip : ऑडिओ क्लिपची चौकशी करा, नाहीतर...; मनोज जरांगे पाटलांचं देवेंद्र फडणवीसांना थेट आव्हान
जरांगे पाटलांच्या ऑडिओ क्लिपमध्ये संजय राऊत अन् सुषमा अंधारेंची नावं?
Manoj Jarange Viral Audio Clip : जरांगे पाटलांच्या ऑडिओ क्लिपमध्ये संजय राऊत अन् सुषमा अंधारेंची नावं? महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ