AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

डाग आणि मुरुमांसारख्या त्वचेवर रामबाण उपाय, कोणताच खर्च न करता कशी होईल मऊ त्वचा?

सध्याचं वातावरण पाहता अनेस समस्या समोर उभ्या राहतात. त्यामधील सर्वात मोठी समस्या म्हणजे डाग आणि मुरम असलेली त्वचा. पण घराच काही उपाय केल्यानंतर तुम्हाला मऊ त्वचा मिळेल...

डाग आणि मुरुमांसारख्या त्वचेवर रामबाण उपाय, कोणताच खर्च न करता कशी होईल मऊ त्वचा?
| Updated on: Sep 07, 2026 | 3:13 PM
Share

आजचं वातावरण आणि धकाधकीचं आयुष्य पाहिल्यानंतर स्वतःकडे लक्ष देणं फार कठीण होतं… ऑफिस, कामाचा ताण, घर, कुटुंबातील जबाबदारी…, रोजचा प्रवास… अशा अनेक कारणामुळे स्वतःकडे लक्ष देण्यासाठी वेळ मिळतच नाही. अशाच चेहऱ्यावर त्याचे परिणाम दिसून येतात. यावर उपचार म्हणून फक्त महिलाचं नाही तर, पुरुष देखील महागड्या सौंदर्य प्रसाधनांचा वापर करतात. पण कोणताच खर्च न करता तुमची त्वचा मऊ होईल… घरगुती एक उपाय केल्याने निस्तेज त्वचा उजळून दिसेल… तर तुम्हाला देखील प्रश्न पडला आसेल की, नेमका उपाय काय… यावर उपाय आहे तांदळाचं पाणी… सांगायचं झालं तर, तांदळामध्ये फेरुलिक ॲसिडसह काही वनस्पतीजन्य संयुगे आणि पोषक तत्वे असतात, जी त्वचा ओलसर आणि मऊ ठेवण्यास मदत करतात.

डाग, मुरुमे किंवा त्वचेच्या इतर समस्यांवर तांदळाचं पाणी हा एक खात्रीशीर उपाय आहे हे सिद्ध करण्यासाठी पुरेसे वैज्ञानिक पुरावे नाहीत. पण, काही लोक त्यांच्या त्वचेच्या काळजीच्या नित्यक्रमाचा भाग म्हणून याचा वापर करतात.

तांदळाच्या पाण्याचा तुम्ही टोनर म्हणून वापर करु शकता. तुम्ही तांदूळ थोड्या पाण्यात भिजवून ते पाणी गाळून घेऊ शकता. तुम्ही त्यात थोडे कोरफडीचा गर किंवा गुलाबजल घालून ते चेहऱ्यावर लावू शकता. यामुळे तुमची त्वचा ताजीतवानी दिसेल. पण आधी हाताच्या लहान भागावर याचा प्रयोग करून पाहणे अधिक चांगलं ठरेल.

तोंडाचा मास्क म्हणून देखील वापरु शकता. शिजवलेला भात गाळून झाल्यावर, उरलेलं पाणी थंड करा, त्यात थोडं मध घाला आणि चेहऱ्यावर लावा. सुमारे 10 – 15 मिनिटांनंतर पाण्याने धुवा. ज्यांची त्वचा नाजूक आहे त्यांनी लिंबाचा रस लावणं टाळावं.

तांदळाच्या पाण्याचा बर्फाचा तुकडा देखील उपयोगी ठरु शकतो. अन्य एक पद्धत म्हणजे तांदळाचं पाणी आईस ट्रेमध्ये गोठवून ते हळुवारपणे चेहऱ्यावर लावणं. थंडीमुळे काही काळासाठी सूज कमी होण्यास मदत होऊ शकतं. मात्र, बर्फ जास्त वेळ थेट त्वचेवर ठेवू नका.

काही लोक उन्हामुळे भाजलेल्या त्वचेवर तांदळाचे पाणी, काकडीचा रस आणि कोरफडीचा गर यांचं मिश्रण वापरतात. पण, जर तुम्हाला तीव्र जळजळ, वेदना किंवा फोड येत असतील, तर डॉक्टरांचा सल्ला घेणं कधीही उत्तम ठरेल. सांगायचं झालं, तांदळाचं पाणी त्वचेच्या काळजीसाठी एक साधा घरगुती उपाय म्हणून वापरलं जाऊ शकतं, परंतु त्वचेच्या कोणत्याही समस्येवर तो रामबाण उपाय आहे असं मानू नये. अधिक त्रास होत असेल तर, डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.

Follow Us
सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! सोयाबीन माना टाकू लागलं
Amravati | सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! अमरावतीत सोयाबीन माना टाकू लागलं; शेतकरी संकटात
पोलिसांनी अडवलं तर बाजूला सारून पुढे जा; हल्ला केला तर...
Manoj Jarange | पोलिसांनी अडवलं तर बाजूला सारून पुढे जा; हल्ला केला तर... जरांगेंनी सांगितली आंदोलनाची रणनीती!
विखे पाटलांच्या अध्यक्षतेखाली मोठी बैठक; कुणबी प्रमाणपत्रासाठी...
Kunbi Certificate Update | विखे पाटलांच्या अध्यक्षतेखाली मोठी बैठक; कुणबी प्रमाणपत्रासाठी महत्त्वाचे निर्णय, जरांगेंच्या डेडलाइनपूर्वी सरकारची तयारी
मागण्या तात्काळ मान्य करा, नाहीतर...अंबादास दानवेंचा सरकारला थेट इशारा
Ambadas Danve | मागण्या तात्काळ मान्य करा, नाहीतर... जरांगे पाटलांच्या खालावलेल्या प्रकृतीवर अंबादास दानवेंचा सरकारला थेट इशारा
सरकारी कार्यालय की Reel शूटिंगचं ठिकाण? तहसीलदारांवर नियमभंगाचा आरोप
सरकारी कार्यालय की Reel शूटिंगचं ठिकाण? रिसोडच्या तहसीलदारांवर नियमभंगाचा आरोप, नेमकं काय घडलं?
पेपर फोडून अधिकारी पैसे खातात, पण विद्यार्थ्यांच्या भविष्याचं काय?
Rohit Pawar On MPSC Pepar Leak | पेपर फोडून अधिकारी पैसे खातात, पण विद्यार्थ्यांच्या भविष्याचं काय? रोहित पवारांचा MPSC व्यवस्थेवर संताप
डीजे बंदीवरून राऊत आक्रमक! मुख्यमंत्री कुंपणावर बसून तमाशा पाहत आहेत
Sanjay Raut | डीजे बंदीवरून संजय राऊत आक्रमक! मुख्यमंत्री कुंपणावर बसून तमाशा पाहत आहेत म्हणत सरकारला घेरलं
आपली मुलं शिक्षण सोडून रस्त्यावर येत आहेत, हे सरकारचं अपयश! सुप्रिया स
MPSC | आपली मुलं शिक्षण सोडून रस्त्यावर येत आहेत, हे सरकारचं अपयश! सुप्रिया सुळे MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर आक्रमक
15 दिवसांत बाळासाहेब ठाकरेंचा फोटो काढा! सदावर्तेंचं ठाकरेंना आव्हान
Gunratna Sadavarte | 15 दिवसांत बाळासाहेब ठाकरेंचा फोटो काढा! गुणरत्न सदावर्तेंचं उद्धव-राज ठाकरेंना थेट आव्हान; नाहीतर...
सुशिक्षितांपेक्षा त्या भागातून 92% मतदान! नितीन गडकरींचं मोठं वक्तव्य
Nitin Gadkari On Matdar | सुशिक्षितांपेक्षा त्या भागातून 92% मतदान! नितीन गडकरींचं मोठं वक्तव्य; राजकीय वर्तुळात चर्चा