AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

घरच्या घरी तयार करा ‘फेस मिस्ट’, 2 मिनिटांत मिळेल चमकदार त्वचा!

सध्याच्या धावपळीच्या जीवनामध्ये महिलांना आपल्या त्वचेकडे विशेष लक्ष देण्याासाठी वेळ मिळत नाहीये.

घरच्या घरी तयार करा 'फेस मिस्ट', 2 मिनिटांत मिळेल चमकदार त्वचा!
| Updated on: Apr 26, 2021 | 10:49 AM
Share

मुंबई : सध्याच्या धावपळीच्या जीवनामध्ये महिलांना आपल्या त्वचेकडे विशेष लक्ष देण्याासाठी वेळ मिळत नाहीये. अशा सर्व परिस्थितीमध्ये आपली त्वचा चांगली आणि हायड्रेट ठेवण्यासाठी आज आम्ही तुम्हाला खास टिप्स सांगणार आहोत. यामध्ये तुमचा वेळ देखील जास्त जाणार नाही. चालता चालता हे हर्बल स्प्रे तुम्ही वापरू शकता. यामुळे तुमची त्वचा चांगली राहण्यास मदत होईल. (Extremely beneficial for face mist skin)

काकडी आणि लिंबू फेस मिस्ट घरगुती फेस मिस्ट तयार करण्यासाठी काकडी, पाणी आणि लिंबू घ्या. या तीन गोष्टी एकत्रित वापरल्याने तुमची त्वचा हायड्रेटेड दिसेल. यासाठी प्रथम आपल्याला काकडीचा रस तयार करावा लागेल आणि त्यामध्ये थोडासा लिंबाचा रस घाला. ही पेस्ट चांगली मिक्स करा, त्यामध्ये पाणी घाला. यानंतर फेस मिस्ट एका स्प्रेच्या बाॅटलमध्ये काढा आणि काही वेळासाठी फ्रिजमध्ये ठेवा. ज्यावेळी आपण घराच्या बाहेर पडणार त्यावेळी फेस मिस्ट हे सोबत ठेवा.

गुलाब पाणी फेस मिस्ट गुलाब पाणी घरी करण्यासाठी सर्वात अगोदर एका पॅनमध्ये गुलाबाची पाने घाला आणि उकळण्यासाठी सोडा. मिश्रण थंड झाल्यावर स्प्रे बाॅटलमध्ये ठेवा आणि ते फ्रीजमध्ये ठेवा. गुलाबाच्या पाण्यात बरेच अँटीऑक्सिडेंट असतात जे त्वचेचे पीएच संतुलित करण्यास मदत करतात.

कोरफड फेस मिस्ट कोरफड आपल्या त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. लिंबामध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडेंट्स भरपूर प्रमाणात असतात जे त्वचेचे रक्षण करतात. यासाठी, आपल्याला कोरफडीचा गर आणि लिंबू लागणार आहे. कोरफडीचा गर आणि लिंबूचे चार ते पाच थेंब मिक्स करा. यामध्ये पाणी घाला फेस मिस्ट फ्रीजमध्ये थंड होण्यासाठी ठेवा.

ग्रीन टी फेस मिस्ट ग्रीन टी आपल्या त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर असते. ग्रीन टीची बॅग, गरम पाणी आणि व्हिटॅमिन ईचा कॅप्सूल घ्या. या तिन्ही गोष्टी चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्या आणि हे थंड होऊ द्या. नंतर हे मिश्रण एका स्प्रे बाटलीमध्ये ठेवा आणि ते फ्रिजमध्ये ठेवा.

संबंधित बातम्या : 

(Extremely beneficial for face mist skin)

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...