‘आयब्रो’ला फरफेक्ट शेप द्यायचाय?, तर या टिप्स फॉलो करा

शितल मुंडे, Tv9 मराठी

|

Updated on: Mar 14, 2021 | 3:28 PM

स्त्रिया त्यांच्या चेहऱ्यावर विविध उपचार घेत असतात. आपली त्वचा आणि चेहरा सुंदर दिसावा, यासाठी महिला विशेष काळजी घेत असतात.

'आयब्रो'ला फरफेक्ट शेप द्यायचाय?, तर या टिप्स फॉलो करा

मुंबई : स्त्रिया त्यांच्या चेहऱ्यावर विविध उपचार घेत असतात. आपली त्वचा आणि चेहरा सुंदर दिसावा, यासाठी महिला विशेष काळजी घेत असतात. अशा परिस्थितीत महिला त्यांच्या भुवयांकडे अर्थात आयब्रोंकडे विशेष लक्ष देतात. भुवयांचा अचूक आकार आपल्याला एक वेगळाच लूक देतो. भुव्यांचा परिपूर्ण आकार मिळवण्यासाठी अर्थात आयब्रो थ्रेडिंग करण्यासाठी त्या पार्लरमध्ये जातात. हे केवळ आपल्या चेहर्‍याला चांगला आकार देत नाही, तर चेहर्‍यावरील अनावश्यक केसांपासून देखील सुटका होते. (Follow these tips to give your eyebrows a perfect shape)

-आपल्या दोन्ही भुवया वेगळ्या आकारामध्ये असतात. यामुळे दोन्ही भुव्यांना एक सारखा आकारल दिला पाहिजे. यासाठी दरवेळी आपल्याला पार्लरमध्ये जाण्याची काही गरज नाहीये. आपण घरीच आपल्या भुवयांना आकार देऊ शकतो.

-थ्रेडिंगनंतर आपल्या त्वचेची रोम छिद्र उघडली जातात. त्यामुळे कमीतकमी 24 तास मेकअप किंवा क्रीम लावू नका. मेकअप केल्यास त्वचेच्या समस्या वाढतील. जर तुम्हाला पार्टी किंवा फंक्शनमध्ये जायचे असेल तर एक ते दोन दिवस आधी थ्रेडिंग करा.

-थ्रेडिंग केल्यानंतर अजिबात ब्लीचचा वापर करू नका. असे केल्याने आपणास जळजळ आणि खाज सुटण्याची समस्या वाढू शकते. जर आपण ब्लीच केले, आणि त्या जागी खाज आल्यामुळे वारंवार हाताने खाजवले, तर मुरूमं येतात आणि त्वचेच्या इतर समस्या उद्भवू शकतात.

-थ्रेडिंग पूर्ण झाल्यानंतर थेट सूर्यप्रकाशात बाहे पडू नका. सूर्यप्रकाशामुळे त्वचेवर खाज सुटणे आणि जळजळ होणे वाढते. लालसरपणा देखील सामान्य समस्या आहे. जर तुम्हाला काही कामासाठी उन्हात बाहेर पडायचे असेल, तर मग सूती कापडाने चेहरा झाकून घ्या

संबंधित बातम्या : 

(Follow these tips to give your eyebrows a perfect shape)

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI