AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पावसाळ्यात चुकूनही या प्रकारचे मासे खाऊ नका, अन्यथा फूड पॉइझनिंगचा धोका

जर तुम्ही देखील पावसाळ्यात मासे खात असाल तर सावधान. पावसाळ्यात या प्रकारचे मासे खाणे टाळा, अन्यथा फूड पॉइझनिंगचा धोका. जाणून घ्या सविस्तर

पावसाळ्यात चुकूनही या प्रकारचे मासे खाऊ नका, अन्यथा फूड पॉइझनिंगचा धोका
| Updated on: Jul 16, 2026 | 4:50 PM
Share

पावसाळा सुरू होताच आहाराबाबत विशेष काळजी घेण्याचा सल्ला आरोग्यतज्ज्ञांकडून दिला जातो. या काळात वातावरणातील आर्द्रता आणि तापमानातील सतत होणारे बदल यामुळे जिवाणू आणि इतर सूक्ष्मजीव झपाट्याने वाढतात. त्यामुळे अन्न दूषित होण्याची तसेच फूड पॉइझनिंगचा धोका वाढतो. मासे हे प्रथिने, ओमेगा-3 फॅटी अॅसिड, जीवनसत्त्वे आणि खनिजांनी समृद्ध असलेले पौष्टिक अन्न असले तरी पावसाळ्यात केवळ ताजे, योग्य पद्धतीने साठवलेले आणि पूर्णपणे शिजवलेले मासेच खावेत. काही प्रकारच्या माशांबाबत या काळात विशेष सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. कोणते आहेत ते मासे? जाणून घेऊयात सविस्तर

उघड्यावर दीर्घकाळ ठेवलेले मासे टाळा

पावसाळ्यात मासे योग्य तापमानात ठेवणे अत्यंत महत्त्वाचे असते. जर मासे बर्फाशिवाय किंवा रेफ्रिजरेशनशिवाय बराच वेळ उघड्यावर ठेवले गेले, तर त्यामध्ये जिवाणू वेगाने वाढू शकतात. असे मासे खाल्ल्यास फूड पॉइझनिंग, उलट्या, जुलाब आणि पोटदुखीचा त्रास होऊ शकतो.

शिळे मासे खाऊ नका

ताज्या माशांना तीव्र किंवा कुबट वास येत नाही. जर माशातून सडका वास येत असेल, त्याचा रंग बदललेला असेल किंवा तो चिकट वाटत असेल, तर तो मासा खरेदी करणे आणि खाणे टाळावे.

अर्धवट शिजवलेले मासे खाणे टाळा

पावसाळ्यात कच्चे किंवा अर्धवट शिजवलेले मासे खाल्ल्यास संसर्गाचा धोका वाढतो. त्यामुळे मासे नेहमी पूर्णपणे शिजवूनच खावेत. योग्य प्रकारे शिजवल्यास बहुतेक हानिकारक जिवाणू आणि परजीवी नष्ट होतात, त्यामुळे आरोग्याचा धोका कमी होतो.

दीर्घकाळ फ्रीझरमध्ये ठेवलेले मासेही टाळा

मासे बराच काळ फ्रीझरमध्ये ठेवले असल्यास किंवा वारंवार वितळवून पुन्हा गोठवले असल्यास त्यांची गुणवत्ता कमी होते. अशा माशांची चव, पौष्टिकता आणि सुरक्षितता या तिन्ही गोष्टींवर परिणाम होतो. त्यामुळे असे मासे खाणे टाळणेच योग्य ठरते.

(डिस्क्लेमर : वरील माहिती ही आरोग्यतज्ज्ञांच्या मार्गदर्शनावर आधारित सामान्य माहिती आहे. ही वैयक्तिक वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय नाही. कोणताही आरोग्यविषयक निर्णय घेण्यापूर्वी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

Follow Us
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा...
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा थेट सवाल, नेमकं प्रकरण काय?
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी बांधवांसाठी...
मनोज जरांगे दसरा मेळाव्यात संतापले! समर्थकांना खडसावत म्हणाले...
मनोज जरांगे दसरा मेळाव्यात संतापले! समर्थकांना खडसावत म्हणाले...
एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची तयारी? बड्या नेत्याचं विधान
एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची तयारी? बड्या नेत्याच्या विधानाने चर्चांना उधाण
एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी खास संदेश! त्या बॅनरची..
एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी खास संदेश! 'त्या' बॅनरची तुफान चर्चा
पुण्यातील महालक्ष्मी देवीचे राजेशाही रूप! 16 किलो सोन्याची साडी
पुण्यातील महालक्ष्मी देवीचे राजेशाही रूप! दसऱ्यानिमित्त नेसवली 16 किलो सोन्याची साडी, दर्शनासाठी भाविकांची गर्दी
जितेंद्र आव्हाडांनाच वारंवार धमक्या का? प्रताप सरनाईकांचा सवाल,
जितेंद्र आव्हाडांनाच वारंवार धमक्या का? प्रताप सरनाईकांचा सवाल, Z सुरक्षेची...
फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार उद्या दिल्ली दौऱ्यावर; मोठं कारण समोर
फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार उद्या दिल्ली दौऱ्यावर; मोठं कारण समोर
उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यासाठी शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह;
उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यासाठी शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह; सोलापूरचा शिवसैनिक सर्वात आधी दाखल!
टायगर श्रॉफला सुरक्षा, सामान्य नागरिकांचं काय? संजय राऊतांचा सरकारला..
टायगर श्रॉफला सुरक्षा, सामान्य नागरिकांचं काय? संजय राऊतांचा सरकारला थेट सवाल!