शरीर देतंय ही ५ संकेत, असू शकते Vitamin D ची कमतरता, आहारात घ्या ‘हे’ पदार्थ

Foods for Vitamin D: शरीरासाठी व्हिटॅमिन डी हे महत्त्वाचे पोषकद्रव्य आहे. हे केवळ सूर्यप्रकाशातूनच मिळते असे नाही, तर रोजच्या आहारातील काही पदार्थांमधूनही शरीराला व्हिटॅमिन D मिळू शकते. शरीरात याची कमतरता झाल्यास कोणती लक्षणे दिसतात आणि व्हिटॅमिन D वाढवण्यासाठी कोणते पदार्थ खावेत, जाणून घेऊया.

शरीर देतंय ही ५ संकेत, असू शकते Vitamin D ची कमतरता, आहारात घ्या ‘हे’ पदार्थ
Vitamin d
Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Edited By: | Updated on: Oct 03, 2026 | 2:50 PM

Vitamin D चा सर्वात सोपा आणि नैसर्गिक स्रोत म्हणजे सूर्यप्रकाश, हे आपण अनेकदा ऐकतो. मात्र, व्हिटॅमिन D नेमके काय आहे आणि शरीरासाठी ते इतके महत्त्वाचे का मानले जाते, याबद्दल अनेकांना माहिती नसते. व्हिटॅमिन डी हे शरीरासाठी आवश्यक असलेले फॅट-सोल्युबल जीवनसत्त्व असून, शरीरात कॅल्शियम आणि फॉस्फरसचे शोषण होण्यासाठी त्याची महत्त्वाची भूमिका असते. त्यामुळे हाडे आणि दात मजबूत ठेवण्यासाठी व्हिटॅमिन D आवश्यक आहे. यासोबतच स्नायूंचे कार्य आणि रोगप्रतिकारक शक्तीलाही ते आधार देते. शरीरात व्हिटॅमिन D ची कमतरता झाल्यास कॅल्शियमचे शोषण योग्य प्रकारे होण्यास अडथळा येऊ शकतो आणि त्याचा परिणाम हाडांच्या आरोग्यावर होऊ शकतो. त्यामुळे व्हिटॅमिन D ची योग्य पातळी राखणे महत्त्वाचे ठरते. सूर्यप्रकाशासोबतच काही पदार्थांमधूनही व्हिटॅमिन D मिळवता येते. शरीरात व्हिटॅमिन D ची कमतरता झाल्यास कोणती लक्षणे दिसू शकतात आणि ती भरून काढण्यासाठी आहारात कोणत्या पदार्थांचा समावेश करावा, जाणून घेऊया.

व्हिटॅमिन D ची कमतरता असल्यास ही लक्षणे दिसू शकतात :

Loading...

शरीरात व्हिटॅमिन D कमी झाल्यास सतत थकवा आणि अशक्तपणा जाणवणे, सांधे व स्नायूंमध्ये वेदना होणे, वारंवार सर्दी-खोकला होणे म्हणजेच रोगप्रतिकारक शक्ती कमजोर होणे, मूड स्विंग्स, स्ट्रेस, डिप्रेशन आणि केस गळणे यांसारखी लक्षणे दिसू शकतात.

आहारात समाविष्ट करा हे पदार्थ

व्हिटॅमिन डीची कमतरता दूर करण्यासाठी आपल्या आहारात काही पदार्थांचा समावेश करू शकता. हे पदार्थ तुमची व्हिटॅमिन डीची पातळी वाढवण्यास मदत करू शकतात.

फॅटी फिश

नॉनव्हेज खाणाऱ्या व्यक्तींसाठी सॅल्मन, सार्डिन आणि मॅकेरल यांसारख्या फॅटी फिश व्हिटॅमिन D चा चांगला स्रोत ठरू शकतात. या माशांमध्ये व्हिटॅमिन D सोबत ओमेगा-३ फॅटी अॅसिड्सही असतात. त्यामुळे संतुलित आहाराचा भाग म्हणून अशा माशांचा समावेश करता येतो.

अंड्याचा बलक 

अंड्याच्या पिवळ्या बलकामध्ये व्हिटॅमिन D सोबत प्रोटीन, व्हिटॅमिन B12 आणि इतर पोषक घटक मिळतात. त्यामुळे आहारात अंड्याचा समावेश करणाऱ्यांसाठी त्याचा बलक हा व्हिटॅमिन D मिळवण्याचा एक पर्याय ठरू शकतो.

फोर्टिफाइड दूध

सामान्य दुधाव्यतिरिक्त व्हिटॅमिन D मिसळलेले म्हणजेच फोर्टिफाइड दूधही उपलब्ध असते. अशा दुधाचा आहारात समावेश केल्याने व्हिटॅमिन D चे सेवन वाढवण्यास मदत होऊ शकते.

मशरूम 

मशरूममध्येही व्हिटॅमिन D मिळू शकते. विशेषतः अल्ट्राव्हायोलेट (UV) प्रकाशाच्या संपर्कात आलेले मशरूम व्हिटॅमिन D2 चे उत्तम स्रोत ठरू शकतात.

डेअरी प्रोडक्ट्स 

चीज, बटर, दही आणि पनीर यांसारख्या दुग्धजन्य पदार्थांमध्ये काही प्रमाणात व्हिटॅमिन D आणि इतर पोषक घटक आढळतात. मात्र, या पदार्थांमधील व्हिटॅमिन D चे प्रमाण उत्पादनानुसार बदलू शकते. त्यामुळे संतुलित आहाराचा भाग म्हणून त्यांचे सेवन करणे योग्य ठरते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us