AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Hair Care | केस वाढवण्यासाठी करा ‘हे’ घरगुती साधे सोपे उपाय

मुंबई : लांब सडक केस सर्वच महिलांना आवडतात पण आजच्या व्यस्त जीवनशैली, अस्वास्थ्यकर आहार, ताण यामुळे हे शक्य नाही. बहुतांश लोकांना केसांची काळजी घेण्यास वेळ नसतो, अशा स्थितीत केस गळणे, केस तुटणे, केसांमधील कोंडा इत्यादी समस्या वाढतात. या व्यतिरिक्त दिवसेंदिवस आपले केस कमकुवत होतात. पण जर तुम्हाला निरोगी आणि जाड केस हवे असतील तर आम्ही तुमच्यासाठी […]

Hair Care | केस वाढवण्यासाठी करा 'हे' घरगुती साधे सोपे उपाय
| Edited By: Mrunal Patil | Updated on: Oct 07, 2021 | 4:38 PM
Share

मुंबई : लांब सडक केस सर्वच महिलांना आवडतात पण आजच्या व्यस्त जीवनशैली, अस्वास्थ्यकर आहार, ताण यामुळे हे शक्य नाही. बहुतांश लोकांना केसांची काळजी घेण्यास वेळ नसतो, अशा स्थितीत केस गळणे, केस तुटणे, केसांमधील कोंडा इत्यादी समस्या वाढतात. या व्यतिरिक्त दिवसेंदिवस आपले केस कमकुवत होतात. पण जर तुम्हाला निरोगी आणि जाड केस हवे असतील तर आम्ही तुमच्यासाठी काही टिप्स घेऊन आलो आहोत, ज्याचा वापर करून तुम्हीही समस्या कमी करू शकता.

केस वाढण्यासाठी काही हेल्दी टिप्स (Hair Care Simple and easy ways to grow hair)

केसांना तेलाने मालिश करा

केसांना तेलाने नियमितपणे मालिश करणे केसांसाठी फायदेशीर असते. केसांना केलेल्या मालिशमुळे ब्लड सर्कुलेशन चांगल्या प्रकारे होते. डोक्याला केलेल्या मालिशमुळे तणावापासून मुक्तता देखील मिळते. मालिशमुळे केसांचे गळणे मोठ्या प्रमाणात थांबते. आठवड्यातून एक दोन दिवस केसांना मालिश करणे फायद्याचे ठरते. मालिश केल्याने चांगली झोप देखील येते, त्याचप्रमाणे केसांची वाढ मोठ्या प्रमाणात होते.

नियमित ट्रिमिंग

केसांच्या नियमित वाढीसाठी त्यांना ट्रिम करणे गरजेचे असते. केसांच्या वाढीसाठी केस महिन्यातून एकदा ट्रिम करणे गरजेचे असते.

योग्य प्रकारे करा शॅम्पू

केसांमध्ये जमा झालेला मळ काढण्यासाठी योग्य प्रकारे शॅम्पू करणे गरजेचे असते. योग्य प्रकारे शॅम्पू करण्यासाठी कोमट पाण्यामध्ये केस स्वच्छ धुवून घ्या. जास्त गरम पाण्यामध्ये केस धुवू नका त्यामुळे केसांना इजा पोहचू शकते.

तांदळाच्या पाण्यामध्ये केस स्वच्छ धुवा

अनेक वर्षांपासून केसांच्या वाढीसाठी तांदळाच्या पाण्याचा वापर केला जातो. तांदळाच्या पाण्यामध्ये असणाऱ्या अमीनो एसिड आणि कार्बोहाइड्रेटमुळे केसांना उत्तम वॉल्यूम मिळतो.

प्रथिन्यांचे सेवन वाढवा

प्रथिने आपल्या आरोग्यासाठी खूप महत्वाचे असतात. या व्यतिरिक्त, आपल्या केसांच्या वाढीसाठी हे खूप महत्वाचे आहे. आहारात संतुलित आहार घ्या जेणेकरून केसांना पुरेसे प्रथिने मिळतील. कारण पोषक घटक तुमच्या टाळूला बळकट करण्यात मदत करतात. बायोटिन, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन डी, ई, ओमेगा -3 असलेल्या या गोष्टी खा.

कॅफीन असलेली उत्पादने वापरा

कॅफीन असलेली उत्पादने पुरुष आणि स्त्रिया दोघांच्या केसांसाठी फायदेशीर असतात. आपण केसांना दररोज कॅफीनशी संबंधित घटक वापरू शकता. ज्यामुळे आपल्या केसांच्या अनेक समस्या दूर जाण्यास मदत मिळते.

(टीप : कोणताही उपचार करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

इतर बातम्या

Healthy Breakfast | वजन कमी करण्यासाठी नाश्त्यामध्ये करा ‘या’ गोष्टींचा समावेश

गुडघ्यातून येणाऱ्या कट- कट आवाजाकडे दुर्लक्ष करताय? होऊ शकतो ‘हा’ गंभीर आजार!

Weight Loss : वजन कमी करण्यासाठी आहारात समाविष्ट करा हे 7 उच्च प्रथिनेयुक्त पदार्थ

Follow Us
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती;
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती; पहा खास व्हिडीओ