गुडघ्यातून येणाऱ्या कट- कट आवाजाकडे दुर्लक्ष करताय? होऊ शकतो ‘हा’ गंभीर आजार!

डॉ. देवाशीष चंदा यांच्या मते जर तुम्ही संधिवात (अर्थराइटीस) या आजारला वेळीच रोखले तर त्यापासून भविष्यात निर्माण होणाऱ्या समस्यांना रोखण्यास मदत होते.

गुडघ्यातून येणाऱ्या कट- कट आवाजाकडे दुर्लक्ष करताय? होऊ शकतो ‘हा’ गंभीर आजार!


मुंबई : आज कालच्या धकाधकीच्या आयुष्यात बदललेल्या राहाणीमानामुळे आपण अनेक आजारांनी त्रस्त आहोत. पण काही आजार वाढत्यावयानुसार आपल्याला होतात यामध्ये ‘संधिवात’ या आजराचा समावेश आहे. वयाच्या 40 वर्षानंतर हा आजर उद्भवतो. संधिवातपासून काळजी घेण्यासाठी आम्ही ऑर्थोपेडिक सर्जन डॉ. देबाशीष चंदा यांच्याशी संवाद साधला. चला तर मग जाणून घेऊया संधिवातापासून तुम्ही कसा बचाव करालं ?

40 ते 45 वर्षांपासून सुरू होतो संधिवाताचा त्रास

डॉ. देबाशीष चंदा यांनी सांगितले की, वयाच्या 40 ते 45 वर्षांपासून सुरू होतो संधिवाताचा त्रास सुरू होतो. सोप्या शब्दात सांगायच झालं तर संधिवाताच्या त्रासामध्ये गुडघ्यांना सुज येते. संधिवात हे अनेक प्रकारचे असतात. पण वयोमाननुसार गुडघ्यांची झीज होणे आणि त्यांना सूज येणे हा प्रकार मोठ्या प्रमाणात आढळला जातो. संधिवातचा सर्वात जास्त त्रास गुडघ्यांना होतो. त्यानंतर हा त्रास कंबर आणि सांध्यांमध्ये अढळतो. ४० ते ४५ वयामध्ये महिलांना संधिवाताचा आधिक त्रास देतो.

महिलांना होतो सर्वात जस्त त्रास

डॉ. देबाशीष याच्या मते संधिवाताचा जास्त त्रास महिलांना होतो. शरिरीत निर्माण व्हिटॅमीन- डीच्या कमतरतेमुळे संधिवात हा आजार होतो. मुलांना जन्म दिल्यानंतर महिलांमध्ये व्हिटॅमीन- डीची कमतरता जाणवू लागते अशी माहीती डॉ. देबाशीष यांनी दिली. त्याप्रमाणे याच वेळी महिलांच्या हाडांच्या हालचालींमध्ये कमतरता जाणवते. याच कारणामुळे महिलांमध्ये संधिवाताचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. या व्यतिरिक्त व्यायामच्या कमतरतेमुळे ही संधिवाताची समस्या जाणवते.

आजारला वेळीच रोखले तर त्यापासून भविष्यात निर्माण होणाऱ्या समस्यांना रोखण्यास मदत

डॉ. देवाशीष यांच्या मते जर तुम्ही अर्थराइटीस म्हणजेच संधिवात या आजारला वेळीच रोखले तर त्यापासून भविष्यात निर्माण होणाऱ्या समस्यांना रोखण्यास मदत होते. डॉ. देवाशीष यांनी सांगितले की बऱ्याच लोकांच्या गुडघ्यामधून कट – कट असा आवाज येत असतो. पण अनेक जण या आवाजकडे दुर्लक्ष करताता. गुडघा दुखून जर हा आवाज येत असेल तर तुम्हाला लागेचच डॉक्टरांना भेटण्याची गरज आहे. गुडघा दुखणे त्यातून आवाज येणे ही संधिवाताची प्राथमिक लक्षणे आहेत .

गुडघा दुखणे, गुडघ्यामधून आवाज येणे या गोष्टींकडे दुर्लक्ष करणे पडू शकते महाग

जर तुमच्या गुडघ्यामधून कट – कट असा आवाज येत असेल. किंवा गुडघा दुखत आलेल तर त्यावर वेळीच उपाय करणे योग्या ठरले. डॉ. देवाशीष यांनी सांगितले की संधिवातापासून लांब राहण्यासाठी नियमीत व्यायाम आणि आहारात व्हिटॅमीन- डी चा समावेश पुरेसा असतो. परंतू दिर्घकाळासाठी जर तुमचा गुडघा दुखत असेल तर त्यागोष्टी कडे दुर्लक्ष करू नका.

(टीप : कोणत्याही उपचारापूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या.)

 

इतर बातम्या
Corona Cases In India | देशात नव्या कोरोनाग्रस्तांमध्ये पुन्हा वाढ, मात्र सक्रिय रुग्णसंख्या अडीच लाखांच्या खाली

Weight Loss : वजन कमी करण्यासाठी आहारात समाविष्ट करा हे 7 उच्च प्रथिनेयुक्त पदार्थ

Home Remedies : मळमळची समस्या दूर करण्यासाठी ‘हे’ नैसर्गिक घरगुती उपाय ट्राय करा!

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI