Fitness Tips: 52 व्या वर्षीही करिश्मा कपूर इतकी फिट कशी? सेलिब्रिटी न्यूट्रिशनिस्टने सांगितलं फिटनेसचं रहस्य

Karishma Kapoor Fitness Secret: वयाच्या 52 व्या वर्षीही अभिनेत्री करिश्मा कपूर आपल्या फिटनेस आणि सौंदर्यामुळे चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहे. तिच्या फिटनेसचं रहस्य काय आहे, याबाबत सेलिब्रिटी न्यूट्रिशनिस्ट ऋजुता दिवेकर यांनी काही महत्त्वाच्या टिप्स शेअर केल्या आहेत. जाणून घेऊया

Fitness Tips: 52 व्या वर्षीही करिश्मा कपूर इतकी फिट कशी? सेलिब्रिटी न्यूट्रिशनिस्टने सांगितलं फिटनेसचं रहस्य
Karisma Kapoor
Image Credit source: Instagram
| Edited By: | Updated on: Oct 23, 2026 | 11:26 AM

वाढत्या वयाबरोबर चेहऱ्यावर सुरकुत्या येणे किंवा शरीरात बदल होणे ही सामान्य गोष्ट आहे. मात्र, वयाच्या ५२ व्या वर्षीही अभिनेत्री करिश्मा कपूर आपल्या फिटनेस आणि तरुण दिसण्यामुळे चर्चेत आहे. नुकतीच ती करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’ या शोच्या ९ व्या सीझनच्या प्रीमियर एपिसोडमध्ये खास पाहुणी म्हणून सहभागी झाली होती. या शोमधील तिचा लूक पाहिल्यानंतर तिच्या फिटनेसची चर्चा सुरू झाली. सेलिब्रिटी न्यूट्रिशनिस्ट ऋजुता दिवेकर यांनी करिश्माच्या फिटनेसचं रहस्य सांगताना, वाढत्या वयातही फिट आणि निरोगी राहण्यासाठी महिलांनी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात, याबाबत महत्त्वाच्या टिप्स शेअर केल्या.

करिश्मा कपूरच्या फिटनेसचं रहस्य काय?

सेलिब्रिटी न्यूट्रिशनिस्ट ऋजुता दिवेकर यांनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत करिश्मा कपूरच्या फिटनेसचं रहस्य सांगितलं आहे. करिश्माच्या फिटनेसचं रहस्य केवळ दही-भात खाण्यात नाही, तर अनेक वर्षांपासून अंगीकारलेल्या चांगल्या सवयींमध्ये आहे.तिच्या फिटनेसचं श्रेय कोणत्याही एका गोष्टीला देता येणार नाही.

Loading...

तिशीनंतर शरीरात होतात हार्मोनल बदल

वयाच्या तिशीनंतर महिलांच्या शरीरात हळूहळू हार्मोनल बदल होऊ लागतात. वयाच्या २० मध्ये फिट राहणं अनेकांना तुलनेने सोपं वाटतं. मात्र, तिशीनंतर काही महिलांचं वजन वाढू शकतं, कंबरेच्या आसपास चरबी जमा होऊ शकते किंवा शरीराच्या ठेवणीत बदल जाणवू शकतात. त्यामुळे या वयापासूनच आरोग्याची काळजी घेणं महत्त्वाचं आहे.

वजन कमी करण्याऐवजी आठवड्यात करा हे काम

ऋजुता दिवेकर यांनी महिलांना केवळ वजन कमी करण्यावर लक्ष केंद्रित न करण्याचा सल्ला दिला आहे. त्याऐवजी शरीर मजबूत आणि सक्रिय ठेवण्यावर भर द्यावा. यासाठी आठवड्यातून किमान तीन तास व्यायाम करण्याबद्दल त्यांनी सांगितले. वेगाने चालणं, स्ट्रेंथ ट्रेनिंग आणि आपल्या क्षमतेनुसार इतर शारीरिक हालचाली दिनचर्येत समाविष्ट करता येतात. नियमित व्यायामामुळे हाडांचं आरोग्य चांगलं राखण्यास मदत होते.

तिशीत या गोष्टी खाणं बंद करू नका

फिट राहण्यासाठी अनेक महिला आहारातून भात, पोळी, कार्बोहायड्रेट्स किंवा साखर पूर्णपणे वगळतात. काही जणी वजन कमी करण्यासाठी रात्रीचं जेवणही टाळतात. मात्र, गरज नसताना आहारावर इतकी बंधनं घालणं टाळावं, असं ऋजुता दिवेकर सांगतात.
त्यांच्या मते, भात, कार्बोहायड्रेट्स किंवा साखर पूर्णपणे बंद करण्याऐवजी संतुलित आहार घ्यावा आणि खाण्याचा आनंदही जपावा. आहारावर अतिप्रमाणात निर्बंध घातल्यास व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन बी१२, लोह आणि कॅल्शियम यांसारख्या सूक्ष्म पोषक घटकांची कमतरता निर्माण होऊ शकते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us