AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Cleaning Hacks : मळकट स्विच बोर्डने आणलाय वात ? या टिप्सनी झटक्यात होईल स्वच्छ

काळानुसार घरातील स्विच-बोर्ड खराब होणं, तो पिवळा पडणं खूप सामान्य आहे. अशा परिस्थितीत सफाई करताना, तो स्वच्छ करताना फार कष्ट घ्यावे लागताता. इलेक्ट्रिक स्विच-बोर्ड साफ करण्याची योग्य पद्धत घ्या जाणून.

Cleaning Hacks : मळकट स्विच बोर्डने आणलाय वात ?  या टिप्सनी झटक्यात होईल स्वच्छ
| Updated on: Oct 21, 2026 | 6:00 PM
Share

Ghar ke Switch Board Kaise Saaf Karen : दिवाळी जवळ येऊ लागली असून, घराघरांत साफ-सफाईला सुरूवात होत आहे. दिवाळीपूर्वी घराचा कानातोपरा स्वच्छ करून, धूळ-माती झटकून, घरं नव्यासारखं चमकवायची प्रत्येकाची इच्छा असते. घरातील स्विचबोर्ड्स ही अशी गोष्ट आहे, की ज्याला वारंवार हात लावला जातो, पण त्याची नेहमी स्वच्छता होतेच असं नाही. बोटांचा घाम, किचनमधील चिकटपणा किवा वारंवार धूळ बसल्यामुळे स्विच बोर्ड अगदी कळकट्ट होतात. विशेषत: किचनमधील स्विच बोर्ड असेल तर त्यावर चिकटपरणा आणि पिवळेपणा फार लौकर बसतो. त्यामुळे घराला रंगा लावून भिंती जरी नव्या केल्या तर स्विच बोर्ड मात्र घाण असतील तर घर सुंदर दिसत नाही ना. इलेक्ट्रिक स्विच बोरड साफ करण्यासाठी योग्य पद्धत आज जाणून घेऊया. या टिप्सच्या मदतीने तुम्ही स्विच बोर्डावरील पिवळेपणा आणि हट्टी डाग सहज घालवू शकता.

कोरड्या कापडाने करा साफ

कोणत्याही प्रकारचा द्रव पदार्थ वापरण्यापूर्वी स्विचबोर्डची कोरडाच स्वच्छ करणं आवश्यक आहे. यासाठी मऊ मायक्रोफायबर कापड किंवा मऊ ब्रिसल्स असलेल्या ब्रशच्या मदतीने स्विचबोर्डवर साचलेली धूळ, जाळी आणि कोपऱ्यांमध्ये अडकलेली घाण स्वच्छ करा. असं करणं महत्त्वाचं कारण धूळ साचलेल्या ठिकाणी थेट ओला कपडा फिरवल्यास घाण चिकट थर तयार होऊ शकतो. त्यामुळे स्वच्छता करणे आणखी कठीण होते. तसेच, घरात व्हॅक्यूम क्लीनर असल्यास त्याच्या बारीक नॉझल असलेल्या अटॅचमेंटचाही तुम्ही वापर करू शकता.

व्हिनेगर आणि पाण्याचा वापर करा

धूळ स्वच्छ केल्यानंतर स्विचबोर्डवर साचलेला तेलकटपणा, हट्टी डाग आणि घाण काढण्यासाठी व्हिनेगर आणि पाणी यांचा वापर करू शकता. यासाठी दोन्ही घटक समान प्रमाणात मिसळून द्रावण तयार करा. मात्र, हे द्रावण कधीही थेट स्विचबोर्डवर फवारू नका. कारण द्रव स्विच किंवा सॉकेटच्या आत गेल्यास विद्युत बिघाड होण्याचा धोका असतो. त्याऐवजी स्वच्छ कापडावर थोडे द्रावण घ्या आणि स्विचबोर्डचा बाहेरील पृष्ठभाग, स्विचच्या आजूबाजूचा भाग आणि कडा स्वच्छ करा. त्यानंतर लगेच कोरड्या कापडाने संपूर्ण स्विचबोर्ड पुसून घ्या, जेणेकरून ओलावा शिल्लक राहणार नाही. विशेष म्हणजे ही सफाई करण्यापूर्वी स्विच बोर्ड नीट बंद आहे ना, विद्युत सप्लाय नाही ना हेही नीट तपासून घ्या, अन्यथा शॉक लागण्याचा धोका असतो. स्विचबोर्ड पूर्णपणे कोरडा होईपर्यंत वीज पुन्हा सुरू करू नका.

स्विचबोर्डवरील पिवळेपणा कसा कराल दूर ?

तुमच्या घरातील स्विचबोर्डवर पिवळेपणा असेल, तर बेकिंग सोड्याची पेस्ट वापरण्याचा पर्याय काही भागांसाठी उपयुक्त ठरू शकतो. यासाठी थोड्या बेकिंग सोड्यामध्ये पाण्याचे काही थेंब घालून घट्ट पेस्ट तयार करा. मात्र, बेकिंग सोडा खरखरीत असल्यामुळे प्लास्टिकवर ओरखडे पडू शकतात किंवा त्याचा पृष्ठभाग खराब होऊ शकतो. त्यामुळे तो थेट स्विचबोर्डवर घासण्याऐवजी आधी उत्पादकाच्या स्वच्छतेविषयक सूचना नीट वाचा. शक्य असल्यास प्लास्टिकसाठी सुरक्षित असलेले क्लीनर वापरा.

या गोष्टींची घ्या काळजी

– सफाई करण्यापूर्वी मेन स्वीच बंद करा, पॉवर ऑफ करा. त्याने शॉक लागण्याचा धोका कमी होतो.

– स्वच्छतेसाठी जे कापड वापराल ते पूर्ण ओलं नसावं, तर थोडंसं भिजवून पिळून घ्या.

– कोणतंही क्लिनींग सोल्यूशन किंवालिक्विड स्विचबोर्डावर थेट स्प्रे करू नका.

– स्विचबोर्डाच्या आसापास असलेल्या भेगा किंव सॉकेटमध्ये पाणी जाणारा नाही याची काळजी घ्या

– स्विचबोर्ड तुटलेला किंवा खूप जुना असेल अथ्वा वायरिंग दिसत असेल, तर त्याची तुम्ही सफाई करू नका.

Follow Us
टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली....
Tiger Shroff : टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली 14 दिवसांची कोठडी
दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची ठाकरे- राऊतांवर बोचरी टीका
Navnath Ban on Uddhav Thackeray : दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची उद्धव ठाकरे-संजय राऊतांवर बोचरी टीका, पुढे म्हणाले...
उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...
Gunratna Sadavarte : उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...; गुणरत्न सदावर्तेंचा जोरदार हल्लाबोल
सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
Sangli Bank Election : सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, सांगलीच्या राजकारणात चर्चांना उधाण; पडद्यामागे नेमकं काय घडलं?
मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात शिंदे आयोजकांवर..
Eknath Shinde : मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे आयोजकांवर संतापले; नेमकं काय घडलं?
जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी...
Jio IPO : जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी काय लक्षात ठेवावं?
एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर
MHT-CET Exam Update : एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर दिलं मोठं स्पष्टीकरण
मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटियासह 29 X अकाउंट...
PM Modi Documentry : मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटिया यांच्यासह 29 X अकाउंटधारकांना थेट...
मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे, सुनेत्रा पवार दिल्लीत; द्रौपदी मुर्मूंची...
Delhi : मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार दिल्लीत; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची घेणार भेट, कारण काय?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा चौकशीसाठी हजर, तपासात काय उघड होणार?