AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सापाचं बीळ आहे की उंदराचं हे कसं ओळखायचं? दोन्हीमधील नेमका फरक काय? वाचा…

Snake : उन्हाळा सुरू झाला की बागेत छोटे-मोठे खड्डे दिसू लागतात. हे पाहताच अनेकांच्या मनात विचार येतो की, हे सापाचे बीळ तर नाही ना? सापाचे बीळ कसे ओळखायचे ते जाणून घेऊयात.

सापाचं बीळ आहे की उंदराचं हे कसं ओळखायचं? दोन्हीमधील नेमका फरक काय? वाचा...
Snake HoleImage Credit source: Meta AI
| Updated on: Apr 15, 2026 | 10:21 PM
Share

तुमच्या घराच्या अंगणात जर बाग असेल तर त्यात अनेकजण वेगवेगळी झाले लावतात. या बागेची निगा राखणे खूप गरजेचे असते. या बागेची देखभाल करणे, पाणी देणे, छाटणी करणे हा त्यांच्या दैनंदिन जीवनाचा भाग बनतो. मात्र, उन्हाळा सुरू झाला की बागेत छोटे-मोठे खड्डे दिसू लागतात. हे पाहताच अनेकांच्या मनात विचार येतो की, हे सापाचे बीळ तर नाही ना? मात्र प्रत्येक बीळ हे सापाचेच असते असे नाही. ते उंदीर किंवा इतर प्राण्यांचे असू शकते. आज आपण सापाचे बीळ कसे ओळखायचे ते जाणून घेऊयात.

साप स्वतः बिळ खोदतात का?

तज्ज्ञांच्या मते सापांना पंजे नसतात, त्यामुळे ते स्वतः बिळ किंवा खड्डे खोदू शकत नाहीत. ते नेहमी तयार असलेल्या बिळांचा वापर करतात. बहुतेक वेळा ते उंदीर, खार किंवा इतर लहान प्राण्यांनी बनवलेल्या जुन्या बिळांमध्ये राहतात.

बिळाचा आकार आणि रचना

सापाचे बिळ साधारणतः गोल आणि नीटस दिसते, तर उंदराचे बिळ थोडे ओबड-खाबड असू शकते. उंदराच्या बिळाचा व्यास साधारण 1 ते 3 इंचांदरम्यान असतो. जर बीळ खूप मोठे असेल, तर तिथे एखादा मोठा साप असण्याची शक्यता असते. तर उंदराच्या बिळाजवळ दातांनी कुरतडल्याचे चिन्ह किंवा लहान पायवाटा दिसू शकतात, मात्र सापाच्या बिळाजवळ अशी चिन्हे नसतात.

मातीच्या ढिगाऱ्यावरून असं ओळखा

उंदीर किंवा खार बीळ खोदताना माती बाहेर फेकतात, त्यामुळे बिळाभोवती मातीचा छोटा ढिगारा तयार होतो. पण साप माती खोदत नाहीत. त्यामुळे बिळाभोवती मातीचा ढिगारा नसेल तर तिथे साप असण्याची शक्यता जास्त असू शकते.

बिळाजवळील चिन्हे

बिळाजवळ साप असल्याचा सर्वात मोठा पुरावा म्हणजे त्याने टाकलेली कात आणि त्याची विष्ठा. सापाची विष्ठा गडद रंगाची असते आणि त्यात हाडांचे किंवा केसांचे अंश असू शकतात. मात्र या ठिकाणी उंदीर असेल तर तिथे गवताचे तुकडे, बियांचे कवच किंवा त्यांची लहान विष्ठा दिसू शकते.

कोळ्याची जाळी

जर एखाद्या बिळाच्या तोंडाशी कोळ्याचे जाळे किंवा सुकलेली पाने असतील, तर ते बिळ बऱ्याच काळापासून रिकामे असण्याची शक्यता आहे. पण जर बिळ स्वच्छ आणि गुळगुळीत दिसत असेल, तर तिथे एखाद्या प्राण्याची सतत ये-जा करत असतो. जर ते सापाचे बीळ असेल, तर साप रांगत असल्यामुळे आसपासची माती सपाट आणि दाबलेली दिसू शकते. या सोप्या फरकांद्वारे तुम्ही सापाचे बीळ ओळखू शकता.

Follow Us
मुंबईत ठाकरे गटाची भव्य दहीहंडी! शिवसेना भवनासमोर गोविंदांचा जल्लोष
Thackeray Group Dahihandi | मुंबईत ठाकरे गटाची भव्य दहीहंडी! शिवसेना भवनासमोर गोविंदांचा जल्लोष बघाच
जरांगेंच्या उपोषणाचा 8वा दिवस! अंतरवली सराटीत आंदोलकांची मोठी गर्दी
Manoj Jarange | मनोज जरांगेंच्या उपोषणाचा 8वा दिवस! अंतरवली सराटीत मराठा आंदोलकांची मोठी गर्दी
कृष्ण जन्मला गं बाई! देशभर कृष्णजन्माष्टमीचा उत्साह बघाच
कृष्ण जन्मला गं बाई! देशभर कृष्णजन्माष्टमीचा उत्साह; मध्यरात्री बाळकृष्णाचा जन्मसोहळा, मंदिरांमध्ये भाविकांची अलोट गर्दी
मोठी बातमी, ठाकरे गटाला मुंबईत धक्का, विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द
मोठी बातमी, ठाकरे गटाला मुंबईत धक्का, विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द
मतदार यादीतील फेरफारवरून उद्धव ठाकरेंनी शिंदे गटावर साधला निशाणा
उद्धव ठाकरेंचा गंभीर आरोप: महाराष्ट्रातून दोन कोटी मतदार वगळले, भविष्यात बनावट मतदारांचा धोका
डीजे परवानगीशिवाय वाजवला, पुण्यातील मंडळाला कोर्टाकडून दोषी ठरवून दंड
पुण्यात जुलूसदरम्यान अनधिकृत डीजे; अल मदिना यंग बॉईज सर्कलला कोर्टाचा दणका
जोरदार पावसामुळे दिल्लीतील प्रमुख मार्गांवर पाणी साचले, वाहतूक मंदावली
दिल्लीत मुसळधार पाऊस: सुब्रतो पार्क परिसरात भीषण वाहतूक कोंडी, जनजीवन विस्कळीत
सोनिया गांधी आत्मचरित्र बिलॉन्गिंग हार्परकॉलिन्स इंडिया प्रकाशित करणार
सोनिया गांधींच्या बिलॉन्गिंग: अ जर्नी ऑफ लव आत्मचरित्राचा मार्ग मोकळा, हार्परकॉलिन्स करणार प्रकाशन
नागपूरनंतर आता सोलापूर आणि संभाजीनगरात डीजे आणि लेझर लाईटवर बंदी
नागपूरनंतर आता सोलापूर आणि छत्रपती संभाजीनगरात डीजे आणि लेझर लाईटवर बंदी
गद्दार कोण आणि... हे जनतेनं दाखवलं, सरनाईकांचा विरोधकांना टोला
Pratap Sarnaik | गद्दार कोण आणि खुद्दार कोण हे जनतेनं दाखवलं, प्रताप सरनाईकांचा विरोधकांना टोला