AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हे झाड म्हणजे सापांचं दुसरं घरच; तरीही अनेक जण मोठ्या हौसेने लावतात, साप घरात आलाच म्हणून समजा

काही झाडं ही अशी असतात जे आपल्या विशिष्ट गुणधर्मांमुळे सापांना आपल्याकडे आकर्षित करतात. त्यामुळे अशी झाडं लावताना काही काळजी घेणं गरजेचं असतं, अशी झाडं तर तुमच्या घरात असतील तर साप तुमच्या घरात येऊ शकतो.

हे झाड म्हणजे सापांचं दुसरं घरच; तरीही अनेक जण मोठ्या हौसेने लावतात, साप घरात आलाच म्हणून समजा
snake Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Mar 22, 2026 | 10:15 PM
Share

अनेकांना आपल्या घरात किंवा घराच्या परिसरात झाडं लावण्याची आवड असते, मात्र अशी झाडं लावताना देखील काही काळजी घेणं गरजेचं असतं. काही झाडं ही अशी असतात की ज्यांच्या विशिष्ट गुणधर्मांमुळे साप त्या वनस्पतींकडे आकर्षित होतो. जेव्हा अशी झाडं आपण आपल्या बागेत किंवा घरात लावतो, तेव्हा साप घरात घुसण्याची भीती वाढते, जर तुमच्याही परिसरात वारंवार साप दिसत असेल किंवा घरात आढळून येत असेल तर ही झाडं तुमच्या परिसरात असण्याची शक्यता असते. आज आपण अशाच काही झाडांबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. त्यापूर्वी या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, तुम्हाला कुठेही साप आढळला तर त्याला पकडू किंवा मारू नका, तर त्याची माहिती ही सर्पमित्रांना द्या. ते सापांना त्यांच्या सुरक्षित अधिवासात मुक्त करतील.

सापांबद्दल आजही आपल्या मनात अनेक गैरसमज आहेत. प्रत्येक साप हा विषारीच असतो हा त्यातील मोठा गैरसमज मात्र सर्वच साप हे काही विषारी नसतात, तर काही हाताच्या बोटावर मोजण्या एतकेच साप हे विषारी आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने घोणस, नाग, मण्यार आणि फुरसे या जातीच्या सापांचा समावेश होतो. मात्र साप कोणताही असू द्या त्याला पकडण्याचा प्रयत्न करू नका. कारण त्यामुळे तुम्हाला सर्पदंश देखील होऊ शकतो.

आता उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले आहेत. उन्हाळांच्या दिवसांमध्ये साप बिळातून बाहेर येऊन थंड हवेची जागा निवाऱ्यासाठी शोधतो, अशा परिस्थितीमध्ये कधी -कधी तो तुमच्या घरात देखील घुसण्याची शक्यता असते. त्यामुळे कुठेही अडचणीच्या ठिकाणी जात असाल तर सावधानता बाळगावी.

अशी काही झाडं असतात, ज्यामुळे साप तुमच्या घराकडे आकर्षित होतात, त्यातील सर्वात महत्त्वाची वनस्पती म्हणजे बांबू ही आहे. बांबूचं झाड हे थंडगार असतं, त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये साप अशा झाडांचा आसारा घेतात. तसेच बांबूच्या झाडांमध्ये लपण्यासाठी त्यांना मोठ्या प्रमाणात जागा मिळते. साप अनेकदा पक्षांची शिकार करतात. हे पक्षी बांबुचे कवळे कोंब खाण्यासाठी आल्यानंतर तिथे दबा धरून बसलेले साप त्यांच्यावर हल्ला करतात. त्यामुळे बांबुच्या झाडांखाली साप असण्याची शक्यता वाढते.

Follow Us
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?